देशी गायीचे महत्व
देशी गाईचे महत्व पटवून देणारा खणखणीत लेख. भारतीय वंशाच्या वळुंची सक्तीने कत्तल करण्यात आली. परदेशातुन प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या घाणेरड्या प्राण्यांचे वीर्य आयात करुन त्या वीर्यामार्फत देशी गायी भरवुन त्याना नासविण्यात आले. खेडोपाडी असे वीर्य पाठविण्यासाठी एसटी बसेस ची मदत घेण्यात आली. खाजगी पशुवैद्यक डॉक्टराना देशी गायीला एका वेळी जर्सी प्राण्याच्या विर्याने भरविण्यासाठी पाचशे रुपये व संकरीत (नासविलेले) वासरु जन्मल्यावर एक हजार रुपये देण्यात आले. संबंधीत शेतकरयाना देखील पैश्याचे अमिष दाखविण्यात आले. हा सर्व पैसा परदेशी कंपन्यांचा होता. हा प्रकार अजुनदेखील सुरु आहे. सर्व बाजुनी प्रयत्न करुन भारतामधुन देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रीत केले गेले. दुर्देवाने हा कट 99% यशस्वी झाला असुन आता फक्त आपल्या देशात 1% देशी गायी शिल्लक आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राचे कधीही भरुन न येणारे आतोनात नुकसान झाले आहे. संकरीकरण थांबले नाहीतर पुढील 5 वर्षात शिल्लक असलेल्या देशी गायी देखील नामशेष होतील व त्याना फोटोमधे पाहण्याची वेळ येइल. बाहेरुन देखावा करण्यासाठी देशी गायी...