पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगन्नाथ पुरीच्या कथित रहस्यांमागचे अज्ञान

जगन्नाथ पुरी येथील चमत्कारांबाबत उत्तर देत आहे.  जगन्नाथ पुरीच्या कथित रहस्यांमागचे अज्ञान  जगन्नाथ पुरी येथील तथाकथित ‘न उलगडणार्‍या रहस्यांची’ पोस्ट सध्या फिरत आहे, त्यास हे उत्तर:   पुरी येथील हे मंदिर जुन्या काळातील अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमूना आहे याबादधल शंकाच नाही. परंतु अशा या भव्य वास्तूला बिनबुडाच्या ‘चमत्कारांची’ जोड देऊन त्या काळातील मानवांनी केलेल्या अफाट कर्तृत्वाला खुजे करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो मात्र योग्य वाटत नाही.     या पोस्ट मधील भगवान श्रीकृष्णाच्या न जळालेल्या हृदयाच्या लगद्याची कहाणी ऐकून सहज उत्सुकता म्हणून नेटवरील विविध साइट्सचा धांडोळा घेतला. त्यांची लिंक देत आहे. त्यावरून पुढील निष्कर्ष निघतात:  1) जगन्नाथ पुरीचे प्रसिद्ध मंदिर हे खरे तर विष्णुचे आहे व त्यातील मुख्य मूर्ति विष्णूची आहे.  भगवान श्रीकृष्णाच्या न जळालेल्या हृदयाच्या लगद्याची कहाणी काही कुठे सापडली नाही.  इंद्रद्युम्न विषयी वाचायला मिळालेली कथा पूर्णतः वेगळी आहे.  2) जगन्नाथाची मूर्ति दर 12 वर्षांनी नाही तर 8 ते 19 वर्षांनी, अधिक मास वगैरे अनेक बाबी पाहून मग ब