पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सगुण-निर्गुणामागील छद्म विज्ञान

सगुण-निर्गुणामागील छद्म विज्ञान - जेट जगदीश. (^j^) राजेंद्र वैशंपायन नावाचा ज्ञानोबांचा श्रद्धाळू भक्त एकदा मला म्हणाला, 'ज्ञानदेवांच्या खालील ओवीवर मी एक कथा लिहिली आहे, त्यावरून हे सिद्ध होते की, ज्ञानोबा हे किती महान वैज्ञानिक होते! एक ती कथा'....... 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे अनुमाने ना अनुमाने ना श्रुती नेती म्हणती गोविंदू रे'... ही ओवी माधवराव आजोबा गुणगुणत होते. ते ऐकून त्यांचा नातू शंतनूने त्यांना छेडले. त्याच्यातला भौतिकशास्त्रज्ञ जागा झाला. 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे' या अभंगावर माधवरावांना म्हणाला, "आजोबा, तुम्ही म्हणता की ज्ञानेश्वर महाराज हे आत्मज्ञानी आणि अत्यंत बुद्धिमान संत होते. मग देवाला सगुण म्हणायचं की निर्गुण असा प्रश्न पडून स्वतः इतके कन्फ्युज कसे झाले आणि मग पळवाट म्हणून 'सगुण निर्गुण एकू गोविंदू रे' असं काहीतरी गुळमुळीत उत्तर दिलं.  त्यांनापण देव नक्की कसा आहे हे उत्तर मिळालं नाही बहुतेक. तुम्ही सांगा देव नक्की सगुण की निर्गुण ?" त्यावर माधवराव मंद स्मित करून म्हणाले, "म

प्रल्हाद जानी

पंचाहत्तर वर्षे अन्नपाणी न घेणाऱ्या आजही जीवित असलेल्या साक्षात्कारी महात्म्याची सत्यकथा श्री प्रल्हाद जानी उर्फ माताजी, एक योगी सत्पुरुष. राहणार अहमदाबाद. सध्याचे वय ८६ वर्षे. माउंट अबू आणि गिरनार येथे वयाच्या अकराव्या वर्षी त्यांना अंबामातेचा साक्षात्कार झाला आणि तेंव्हापासून अन्न पाणी यांचा संबंध कायमचा सुटला. मागील पंचाहत्तर वर्षे... होय, पंचाहत्तर वर्षे अन्नग्रहण नाही, पंचाहत्तर वर्षे पाणी सुद्धा पिले नाही. त्यामुळे मलमूत्र विसर्जनही नाही. तरीसुद्धा प्रकृती तुमच्या आमच्या सारखीच ठणठणीत. श्री प्रल्हाद जानी आजही आधुनिक विज्ञानासाठी एक चालते बोलते रहस्य बनले आहेत. या सर्व तपासण्यांमध्ये श्री प्रल्हाद जानी यांनी बिनशर्त सहकार्य केले आहे. ते सहजपणे सांगतात की साक्षात्कारामुळे सूर्यप्रकाशापासून उर्जा निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झाली आहे. यात काही विशेष नसून वनस्पती सुद्धा याच पद्धतीने आपले अन्न मिळवतात. त्यामुळे मला बाहेरून अन्न-पाणी घ्यावे लागत नाही. पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेता त्यांच्या मुत्रापिंडामध्ये लघवी तयार होते आणि ती परत शरीरामध्ये शोषली जात अस

ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता

मूळ पोस्ट विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते. सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो). माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. उदय-अस्ताचे प्रमाणे | जैसे न चालता सूर्याचे चालणे | तैसे नैष्कर्म्यत्व जाणे | कर्मींचि असता || सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध  आहे. मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात, शुक्र-शोणिताचा सांधा | मिळता पाचांचा बांधा | वायुतत्व दशधा | एकचि झाले ||   शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.

डॉ. मांडके यांच्याबाबत पसरत असलेली पोस्ट

दिशाभूल करणारे लोक सतत नवनवीन खोट्या पोस्ट तयार करून पसरवत आहेत. तशीच एक पोस्ट डॉ. मांडके यांच्याबाबत पसरवली जात आहे. पहिल्यांदा ती मूळ पोस्ट वाचा आणि नंतर त्यातील खोटेपणा उघड करणारी पोस्ट वाचा. मूळ पोस्ट *🔆 ज्यांचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा ...🔆* भारतातील प्रख्यात *हार्ट - स्पेशालिस्ट डाॅ. मांडके* आज खूप आनंदात होते. त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता. त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते *विमानाने*  दिल्लीला जायला निघाले होते. ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले. *डाॅ. मांडके* विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात.... इतक्यात .... अचानक ...विमानाचे *आपातकालीन लँडींग* करण्यात आले. *डाॅ. मांडके* समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले... विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे. त्यामुळे डाॅक्टरांनी *एक कार*  भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.