विक्रम साराभाई आणि भगवद्गीता

🕉📚📖🌸🙏🏻😔🕉

☸ एक घडलेली  गोष्ट...   

♻ १९७९ सालची सत्यघटना .

सकाळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती.

एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते.
तेवढ्यात एक  उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती.

तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता. 

त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ.

त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे..
पुढे मोठ्या तुसडेपणाने  - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे त्याने बरीच मुक्ताफळे उधळली. तरीही ती व्यक्ती शांतच होती,,, 

थोड्या वेळाने - त्या गीता वाचणाऱ्या व्यक्तीने उठून आसन गुंडाळले तसे एकदम ४ दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले व एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला व आदबीने सलाम करून दार उघडून उभा राहिला.

हे सगळं पाहिल्यावर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला व त्या व्यक्तीची क्षमा याचना करू लागला.

त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली, तेव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की, "ज्या संस्थेत तू  संशोधन करण्यास आला आहेस ना त्या भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे... डॉ. विक्रम साराभाई ."

मग मात्र तो नास्तिक , देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला, माफी मागू लागला...
तरीही डॉ, साराभाई शांतच..

ते म्हणाले, जर या जगात एखादी गोष्ट आहे , तर नक्कीच त्याचा कोणीतरी निर्माता आहे, मग ती आजची असो की महाभारत कालीन असो . 
आणि हे त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते. तेंव्हा - *टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा, सर्व सायन्स देखील यातच आहे .*

ही गोष्ट घडली तेव्हा भारतीय पातळीवरच्या विविध १३ संशोधन संस्था या डॉ. साराभाईंच्या नांवावर होत्या.
तर तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अणू संशोधन मंडळाचेही अध्यक्ष म्हणून डॉ. साराभाई यांची नियुक्ती केली होती.

*चालू वर्ष हे डॉ. विक्रम साराभाई यांचे  100 वे जयंती वर्ष आहे...
म्हणून एक आठवण ... 🌀💤🙏🏻

 त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन ! 👏🏼😍 
 
🙏🏼🌹जय हिंद 🌹🙏🏼

====================

 कृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेचे माहात्म्य सिद्ध करण्यासाठी अशा खोट्या पोस्टसचा आधार घेण्याची गरज आहे का? ही पोस्ट खोटी कशी? तर पुढे पहा: 


१) या पोस्टमधील घटना १९७९ सालची आहे असे म्हटले आहे. परंतु विक्रम साराभाई हे तर ३० डिसेंबर १९७१ सालीच वारले. पुढील लिंक मध्ये त्यांच्या मृत्युची तारीख मिळेल. (https://en.wikipedia.org/wiki/Vikram_Sarabhai) मग ते वारल्यानंतर आठ वर्षांनी - १९७९ साली त्रिवेंद्रमच्या समुद्रकिनार्‍यावर कसे आले?


२) ते भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेचे चेअरमन कधीच नव्हते. पुढील लिंक मध्ये आतापर्यंतच्या बीएआरसी प्रमुखांची यादी दिलेली आहे.  (http://barc.gov.in/leaders/index.html). ते अटॉमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष मात्र होते. (ते वरील पोस्ट मध्येही नंतर आलेले आहे). त्यांचे अंतराळ संशोधन आणि अन्य क्षेत्रातील कार्य प्रचंड आणि अतुलनीय असताना, असा खोटा हुद्दा त्यांना चिकटवायची काय गरज आहे? 


३) कलकत्त्याहून 'मुंबई'च्या भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत शिकण्यासाठी आलेला तो तरुण 'त्रिवेंद्रमच्या' किनार्‍यावर कशाला गेला होता?


४) पोस्टमध्ये लिहल्याप्रमाणे विक्रम साराभाई यांचे हे ९९वे जयंती वर्ष नाही. कारण त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९चा आहे. म्हणजे त्यांची १००वी जयंती २०१९ मध्येच  होऊन गेली आहे. 


खरे तर असल्या खोट्या पोस्ट लिहण्यापेक्षा, वर्तमानातील अनेक घटनांना लागू पडतील अशा गीतेतील श्लोकांचे दाखले (खूप मिळतील) दिले तर त्यातील 'त्रिकालाबाधित' सत्ये लोकांना कळतील, माहात्म्य कळेल आणि गीता आजही किती रिलेव्हंट आहे हे कळेल. वरील प्रकारच्या पोस्टमुळे मात्र त्या लिहणार्‍याचे हसे होते. 





टिप्पण्या

  1. The story above looks highly exaggerated and unrealistic to derogate the atheists.
    1. Dr. Sarabhai died in 1971, so it couldn't have happened 1979 or with Dr Sarabhai.
    2. When he died, he was 52, so he couldn't be too old if this ever happened with Dr Sarabhai some other year.
    3. BARC is in mumbai, the person came from Kolkata and they mate at trivendrum, what all of them were doing there.

    Dr. Sarabhai can be remembered for many things he did for country and science. Salute to him for that.

    उत्तर द्याहटवा
  2. The post is fake and misleading for it is not based on facts..Dr.sarabhai died in 1971 so its impossible to meet the so called youth in 1979!!!
    moreover there is nothing in Gita that can inspire anyone with scientific temper.....All fake ..unrealistic and imaginary things as the immortality of soul ..reincarnation ...miracles are there !!"

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?