पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मंदिरांनी पैसा दिला पण दवाखान्यांनी लुटले...

मंदिरांनी पैसा दिला पण दवाखान्यांनी लुटले – *कौस्तुभ शेजवलकर* यांनी संवाद रुपात खालील उत्तर लिहिले आहे. ते जेवढे वाचनीय आहे तेवढेच मनानीयही आहे... मूळ Post: मंदिरांना दान करण्यापेक्षा दवाखान्यांना करा हे सांगणारे हे विसरतात कि संकटात मंदिरांनीच पैसा दिला दवाखान्यांनी मात्र लुटला! ➖➖➖➖➖➖ मी: असं म्हणणारे हे विसरतात की, जीव दवाखान्यांनी वाचवला मंदिरांनी नाही. ➖➖➖➖➖➖ तो: खरं आहे...  जीव दवाखान्यांनी वाचवला पण पैसे घेऊनच ना? ते पण अनेकांच्या आवाक्याबाहेरची बिले वसूल करूनच ना? म्हणजे शुद्ध लाभासाठी ना? अनेकदा मृतदेहाचा ताबा पैसे वसूल केल्याशिवाय न देताच ना?  आमचे म्हणणे दवाखाने नकोच असे नाहीये, तर त्या साठी देवस्थानांची अपकीर्ति नको इतकेच आहे. मंदिरात मात्र जाताना आणि परत येताना कोणत्याही प्रकारच्या बिलाची जबरदस्ती तर नसते ना???  Advance पण भरावा लागत नाही.  शिवाय ज्यांची श्रध्दा मंदिराच्यापेक्षा दवाखान्यांवर आहे त्यांनी नक्कीच मंदीरात न जाता दवाखान्यात जावे आणि शक्य असेल तितके किंबहुना क्षमतेच्या पेक्षा अधिक पैसे दवाखान्यात द्यावेत काहीच हरकत नाही.  _मंदिरात मात्र जाताना आणि परत येताना कोण

“होय निर्भीडच” या शीर्षकाची व ‘खरी अंधश्रद्धा कोणती?’

“होय निर्भीडच” या शीर्षकाची व ‘खरी अंधश्रद्धा कोणती?’ असा प्रश्न करून, अंधश्रद्धेची नवीन बिनडोक व्याख्या करणारी एक पोस्ट समाज-माध्यमांमध्ये फिरते आहे त्यास हे उत्तर... – उत्तम जोगदंड ।। होय बिनडोकच।।  दगडाला देव मानून जो पूजतो त्याने फुले, शाहू, आंबेडकर, तुकाराम यांना ओढून ताणून वेठीस धरणे हाच मुळात असमंजसपणा आहे. तुकारामांनी तर “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखवा, देव तेथेची जाणावा।“ असे सांगून दगडाचा देवच नाकारलेला आहे. तीर्थी धोंडा पाणी | देवरोकडा सज्जनी| असेही तुकोबा म्हणतात.  फुले, शाहू, आंबेडकर हे तर त्या ही पुढे गेलेले आहेत. दगडाची पुजा करायचा लेखकला अधिकार असू शकतो. परंतु त्यासाठी दगडाच्या देवाला नाकारणार्‍यांचे अशा प्रकारे नाव घेण्याचा लेखकाला काहीही अधिकार नाही. माझ्या घामाचे पैसे दानपेटीत टाकतो हे वाक्य केवळ माज व उर्मटपणा दर्शविते. आपल्या घामाचे पैसे दानपेटीत टाकावेत, दारू/डान्स बार वर उधळावेत, जाळून टाकावेत कि सत्कारणी लावावेत हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीचा प्रश्न आहे. त्या बद्दल प्रश्नच नाही. तरीही, असे पैसे, किंवा देवावर ओतले जाणारे तेल, दूध

कोरोना काळात अंनिसने काय काय केले?

 'देव देवळात नसून माणसांत आहे, हे वाक्य हजारदा ऐकवणारी "अंनिस" म्हणजे अंधश्रध्दा निर्मूलन समिती या संकटकाळात कोणाला दिसली आहे का? – Shri Mahant Sudhirdas  या धर्मांधांने लिहिलेली वरील पोस्ट व्हायरल होत आहे; आणि 'अंनिस'द्वेष्टे ती फॉरवर्ड करत आहेत. त्या सगळ्यांसाठी 'अंनिस'तर्फे खालील उत्तर दिले आहे. तेव्हा आपल्याच कोशात मग्न असणाऱ्या दीड दमडीच्या धर्मांधांनो, आपले हुच्च संस्कार दाखवून का उगाच हसे करून घेत आहात? करोनाच्या संकट काळात 'अंनिस'ने खालील प्रमाणे कामे केली आहेत...  हे वाचा आणि आपले थोबाड काळे करा... 1)अंनिसने कोरोनाबाधीत व त्याच्या कुटुंबातील लोकांना मदत म्हणून मानसमित्र आधार देणारी टीम उभी केली. 2)काही ठिकाणी प्रत्यक्ष रुग्णसेवेत अंनिसचे तज्ञ असलेले कार्यकर्तेही कोरोना काळात काम करत आहेत. ३)अंनिसचे शिक्षक सरकारी कर्मचारी प्रशासनाबरोबर काम करत आहेत. ३)वरीष्ठ नागरिकाना औषधे, किराणा माल, दैनदिन वस्तू पुरवायचे काम रत्नागिरी व इतर ठिकाणीही चालू आहे. ४)नगरसारख्या ठिकाणी तर आपण मोबाईल व्हेइकलद्वारे परिसर निर्जुतुकिकरण करण्याचे काम करत आहोत. ५)कोव