पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*विज्ञान हमें कहां से कहां ले आया* *पहले :-* वो कुँए का मैला कुचला पानी पीकर भी 100 वर्ष जी लेते थे *अब :-* RO का शुद्ध पानी पीकर 40 वर्ष में बुढ़े हो रहे हैं *पहले :-* वो घानी का मैला सा तेल खाके बुढ़ापे में भी मेहनत कर लेते थे। *अब :-* हम डबल-ट्रिपल फ़िल्टर तेल खा कर जवानी में भी हाँफ जाते हैं *पहले :-* वो डले वाला नमक खाके बीमार ना पड़ते थे। *अब :-* हम आयोडीन युक्त खाके हाई-लो बीपी लिये पड़े हैं *पहले :-* वो नीम-बबूल कोयला नमक से दाँत चमकाते थे और 80 वर्ष तक भी चबा चबा के खाते थे *अब :-* कॉलगेट सुरक्षा वाले रोज डेंटिस्ट के चक्कर लगाते हैं *पहले :-* वो नाड़ी पकड़ कर रोग बता देते थे *अब :-* आज जाँचे कराने पर भी रोग नहीं जान पाते हैं *पहले :-* वो 7-8 बच्चे जन्मने वाली माँ 80 वर्ष की अवस्था में भी खेत का काम करती थी। *अब :-* पहले महीने से डॉक्टर की देख-रेख में रहते हैं | फिर भी बच्चे पेट फाड़ कर जन्मते हैं *पहले :-* काले गुड़ की मिठाइयां ठोक-ठोक के खा जाते थे *अब :-* खाने से पहले ही शुगर की बीमारी हो जाती है *पहले :-* बुजुर्गों के भी घुटने नहीं दुखते थे *अब :-* जवान भी

Don’t be Apologetic about Diwali - Enjoy it

Don’t be Apologetic about Diwali - Enjoy it In my city of Bengaluru alone - 4 lakhs Animals are Killed on Eid which includes 10000 Large animals like Cattle and Camels It generates 300 tonnes of animal waste which is just buried in pits near Kogilu on the city outskirts For 14 lakh Muslims in Bengaluru - 4 lakh Animals killed Even if one Animal weighs 10 kg then can an average person eat 3 kg meat on single day ? And mind you this includes kids and infants also So most of the meat goes waste though people might claim we give it to poor If you conflate this number to whole of India then imagine the number of Animals killed on the single day ? For 200 millon it must be at least 20 millon Animals And 200 millon kgs of Meat and staggering 8 billon kgs of Green House gases or Carbon dioxide and we are not even calculating the lakhs of tonnes of bio waste generated And now conflate this number to the whole world It is 200 millon Animals 80 billon kgs of CO2 Now let us come t
इमेज
लग्नात ‘फक्त’ तांदूळ वापरतात हे साफ खोटे आहे. मराठवाड्यात ज्वारी वापरतात, तांदूळ नव्हे. अक्षता हा शब्द अ आणि क्षत या पासून बनलेला आहे. लग्नात एकदल पदार्थ वापरतात. द्विदल (चणे, तूर, मूग, उडीद, मसूर, मटकी, हुलगे) पदार्थांचे आत दोन तुकडे (म्हणजे डाळ, दल) असतात म्हणजे ते क्षत असतात (म्हणजे मूग क्षत होऊन त्याची डाळ बनते), म्हणून ते वापरत नाहीत. तांदूळ ज्वारी हे अ क्षत या प्रकारात मोडतात. हा आतून कीडीचा शोध कुणी लावला? कुठलाही किडा किंवा जीव बाहेरूनच आत शिरतो ना? तांदूळाचे रोप दुसरीकडे लावतात हे खरे. पण ज्वारीचे तसे अजिबात नाही. मग मराठवड्यातील लग्नाचे काय? आणि ‘समजा’ तांदूळ आतून किडतो आणि एकीकडे पेरून दुसरीकडे वाढवला जातो, मग त्याचा नवरा नवरी किंवा त्यांचे नातेवाईक यांच्यावर शारीरिक, मानसिक असा काय परिणाम होणार? आणि किती जणांनी टाकलेले हे तांदूळ उर्फ अक्षता वर वधू दोघांपर्यंत पोहोचतात. गेल्या चार पाच वर्षांपासून एका विशिष्ट प्रवृत्तीच्या बुद्धीला नुसता बहर आलाय. त्यातून अशा काही भन्नाट आयडिया प्रसवल्या आहेत. त्यातीलच ही एक.

दसरा-दिवाळी आणि श्रीलंका-अयोध्या अंतर

*प्रत्येक वर्षी दसरा नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते ? विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 515 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 515 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.45 म्हणजे 21 दिवस* मला ही आश्चर्य वाटले . काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले *श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 2,589 व वेळ 515 पाहून मला धक्काच बसला !!!!* गुगल मॅप हे हल्ली आलेय  पूर्ण विश्वसनीय आहे . आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे . तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा व लाईक करुन शेअर करा व इतरांना ही माहीती सांगा . आणी वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवली आहे तर त्यांच भविष्यात घडणारे गोष्टींचा अंदाज किती अचुक होता *आपली हिंदु संस्कृती किती महान आहे.* *गर्व असु द्या हिंदुसंस्कृतीत* *जन्म झाल्याचा...!* ।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।। या पोस्टला उत्त

बोकडांची कातडी नदीत फेकत असल्याचा व्हिडीओ

या व्हिडीओ सोबतचा मजकूर असा आहे. ईद के बाद जानवरो की खाल को नदी में फेंका जा रहा है ! मूर्ति विसर्जन के समय पाबंदियां लगाने वाले अब चुप क्यो है ? __________________________ या मजकुराला दिलेले उत्तर या व्हीडीओ मध्ये कथित ‘बळी’ दिलेल्या बोकडाची कातडी नदीत फेकतांना काही लोक दिसत आहेत. (कदाचित एखाद्या रविवारी दिवसभरात खाटकाने कापलेल्या बोकडांची सुद्धा ती कातडी असू शकते.)   ते लोक इकडे तिकडे पाहून हे कृत्य चोरून करीत आहेत हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे ते कोणतेही धार्मिक कृत्य करीत नसून जल प्रदूषणाचे भयंकर अपराधी कृत्य करीत आहेत हेही स्पष्ट दिसून येते. त्यांच्या धर्मग्रंथात असे कुठेही लिहल्याचे आढळत नाही की बळी दिलेल्या बोकडाच्या कातडीचे विसर्जन नदीत वाहत्या पाण्यात करावे. कारण इस्लाम जन्मला तिथे अशा वाहत्या नदयाच अस्तीत्वात नाहीत.  तसेच ही कातडी नदीत विसर्जित करावी अशी त्यांची परंपरा आहे व दर वर्षी नियमितपणे ते कातडी नदीत विसर्जित करतात असे आधी ऐकले किंवा पाहिलेले नाही.  असे असतांना त्यांच्या कुठल्या तरी एका गुन्हेगारी स्वरुपाच्या कृत्याला धर्माशी जोडून त्याची तुलना सरळ गणपतीशी करणे

सगुण-निर्गुणामागील छद्म विज्ञान

सगुण-निर्गुणामागील छद्म विज्ञान - जेट जगदीश. (^j^) राजेंद्र वैशंपायन नावाचा ज्ञानोबांचा श्रद्धाळू भक्त एकदा मला म्हणाला, 'ज्ञानदेवांच्या खालील ओवीवर मी एक कथा लिहिली आहे, त्यावरून हे सिद्ध होते की, ज्ञानोबा हे किती महान वैज्ञानिक होते! एक ती कथा'....... 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे अनुमाने ना अनुमाने ना श्रुती नेती म्हणती गोविंदू रे'... ही ओवी माधवराव आजोबा गुणगुणत होते. ते ऐकून त्यांचा नातू शंतनूने त्यांना छेडले. त्याच्यातला भौतिकशास्त्रज्ञ जागा झाला. 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे' या अभंगावर माधवरावांना म्हणाला, "आजोबा, तुम्ही म्हणता की ज्ञानेश्वर महाराज हे आत्मज्ञानी आणि अत्यंत बुद्धिमान संत होते. मग देवाला सगुण म्हणायचं की निर्गुण असा प्रश्न पडून स्वतः इतके कन्फ्युज कसे झाले आणि मग पळवाट म्हणून 'सगुण निर्गुण एकू गोविंदू रे' असं काहीतरी गुळमुळीत उत्तर दिलं.  त्यांनापण देव नक्की कसा आहे हे उत्तर मिळालं नाही बहुतेक. तुम्ही सांगा देव नक्की सगुण की निर्गुण ?" त्यावर माधवराव मंद स्मित करून म्हणाले, "म

प्रल्हाद जानी

पंचाहत्तर वर्षे अन्नपाणी न घेणाऱ्या आजही जीवित असलेल्या साक्षात्कारी महात्म्याची सत्यकथा श्री प्रल्हाद जानी उर्फ माताजी, एक योगी सत्पुरुष. राहणार अहमदाबाद. सध्याचे वय ८६ वर्षे. माउंट अबू आणि गिरनार येथे वयाच्या अकराव्या वर्षी त्यांना अंबामातेचा साक्षात्कार झाला आणि तेंव्हापासून अन्न पाणी यांचा संबंध कायमचा सुटला. मागील पंचाहत्तर वर्षे... होय, पंचाहत्तर वर्षे अन्नग्रहण नाही, पंचाहत्तर वर्षे पाणी सुद्धा पिले नाही. त्यामुळे मलमूत्र विसर्जनही नाही. तरीसुद्धा प्रकृती तुमच्या आमच्या सारखीच ठणठणीत. श्री प्रल्हाद जानी आजही आधुनिक विज्ञानासाठी एक चालते बोलते रहस्य बनले आहेत. या सर्व तपासण्यांमध्ये श्री प्रल्हाद जानी यांनी बिनशर्त सहकार्य केले आहे. ते सहजपणे सांगतात की साक्षात्कारामुळे सूर्यप्रकाशापासून उर्जा निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झाली आहे. यात काही विशेष नसून वनस्पती सुद्धा याच पद्धतीने आपले अन्न मिळवतात. त्यामुळे मला बाहेरून अन्न-पाणी घ्यावे लागत नाही. पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेता त्यांच्या मुत्रापिंडामध्ये लघवी तयार होते आणि ती परत शरीरामध्ये शोषली जात अस

ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता

मूळ पोस्ट विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते. सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो). माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. उदय-अस्ताचे प्रमाणे | जैसे न चालता सूर्याचे चालणे | तैसे नैष्कर्म्यत्व जाणे | कर्मींचि असता || सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध  आहे. मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात, शुक्र-शोणिताचा सांधा | मिळता पाचांचा बांधा | वायुतत्व दशधा | एकचि झाले ||   शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.

डॉ. मांडके यांच्याबाबत पसरत असलेली पोस्ट

दिशाभूल करणारे लोक सतत नवनवीन खोट्या पोस्ट तयार करून पसरवत आहेत. तशीच एक पोस्ट डॉ. मांडके यांच्याबाबत पसरवली जात आहे. पहिल्यांदा ती मूळ पोस्ट वाचा आणि नंतर त्यातील खोटेपणा उघड करणारी पोस्ट वाचा. मूळ पोस्ट *🔆 ज्यांचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा ...🔆* भारतातील प्रख्यात *हार्ट - स्पेशालिस्ट डाॅ. मांडके* आज खूप आनंदात होते. त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता. त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते *विमानाने*  दिल्लीला जायला निघाले होते. ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले. *डाॅ. मांडके* विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात.... इतक्यात .... अचानक ...विमानाचे *आपातकालीन लँडींग* करण्यात आले. *डाॅ. मांडके* समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले... विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे. त्यामुळे डाॅक्टरांनी *एक कार*  भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.

वटपौर्णिमा !!! काय आहे ७ जन्माचे रहस्य?

वटपौर्णिमा !!! काय आहे  ७ जन्माचे रहस्य? या पोस्टला उत्तर: मुळात या पुंडांनी लावलेला हा अचाट शोध या आधी लावायचे गेल्या हजारो वर्षात आतापर्यंतच्या महापुरुषांना, विद्वानांना, ऋषींना, योग्यांना का बरे सुचले नसावे असा एक साधा प्रश्न ही पोस्ट वाचून उद्भवतो. सात जन्म ही जीवशास्त्रीय भूमिका नसून आध्यात्माला तोडून मोडून विज्ञानाला जोडाण्याचा केवीलवाणा आणि निष्फळ प्रयत्न आहे. त्यावेळच्या ज्ञानाला पेशी व तिचे जिवन याची आजिबात माहिती नव्हती. पूर्वी साथीचे  आजार आले की माणसे पटापट मरायची. साध्या साध्या रोगाने देखील लोक मरायचे.  त्यामुळे १००वर्षे जगणे शक्यच नव्हते. तसेच एकूण एक पेशी बदलायला १२ वर्षे लागतात हा जावईशोध कोणत्या आधारावर लावला? शरीरातील विविध पेशींचे आयुष्य ३-४ दिवसांपासून ३-४ महीने एवढेच असतांना ही १२ वर्षाची बिनबुडाची भानगड कुठून आणली. १२ वर्षांनी अशा पेशी बदलत असतील तर माणूस कायम तरुण राहायला हवा, तो वृद्ध का होतो? तसेच त्या काळी पती पत्नीचे वय कधीही समान नसायचे. व लग्ने अगदी लहानपणी होत. म्हणून १२ x७ वगैरे आकडेवारी हे सरळ सरळ थोतांड आहे हे दिसून येते. वड फक्त आँक्सिजन

खडे टाकणारा देव

इंजिनिअर व मजूर आपल्या देशातील जवळपास 99 टक्के देवभक्तांचा व देवाला गुंड ठरवून त्याचा अपमान करणारी ही वरील पोस्ट तर्कदुष्ट सुद्धा आहे. कारण : 1) यात इंजिनियरला ‘देव’ व मजुराला देवाकडे लक्ष न देणारा ‘भक्त’ असे कल्पिले आहे. ही कल्पनाच मुळात तर्कदुष्ट व गैरलागू आहे. इथे इंजिनियरला मजुराकडून काही काम करून घेण्यासाठी त्याचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. खरे तर अशा ठिकाणी एक घंटा लावलेली असतांना (जिचा दोर किंवा बटन वरती असते व त्याची गरज नेहमी भासते) ती वाजवायचे सोडून नाणी व नंतर खडा फेकणारा इंजिनियररूपी ‘देव’ मूर्ख व बिनडोक वाटतो. त्याने आधीच खडा फेकायचा होता ना! इथे मजूर शहाणा वाटतो. कारण लक्ष वेधून घेण्यासाठी कोणी पैसे फेकत नाही हे ज्ञान त्याला आहे व म्हणून तो पैसे उचलतो व खडा पडल्यावर लक्ष देतो. 2) देवाला सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, दयाळू, ‘चोच दिली आहे तर चारा देणारा’, वगैरे मानले जाते. परंतु, आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी देव, माणसाच्या आयुष्यात संकटाचा खडा टाकतो असे पोस्ट मध्ये लिहलेले आहे. असे असेल तर, ‘माझ्याकडे लक्ष दे, नाहीतर घालतोच तुला संकटात!’ अशी प्रवृत्ती अस

विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक

......... || जय हरी || .........   " विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक" *या पोस्टला उत्तर (कंसात)* 1. विज्ञान प्रयोगातून विकसित होते, अध्यात्म योगातून प्राप्त होते. (विज्ञान केवळ प्रयोगातूनच नाही तर निरीक्षणातून, चिकित्सेतून निर्माण होते, अध्यात्म काल्पनिकतेतून निर्माण होते.) 2. विज्ञानासाठी साधने वापरली जातात, अध्यात्मासाठी साधना वापरली जाते. (विज्ञानसाठी केवळ साधनेच नाही तर डोकेही वापरले जाते, अध्यात्मात डोके अजिबात वापरले जात नाही.) 3. विज्ञानामध्ये शोध आहे, अध्यात्मामध्ये बोध आहे. (विज्ञानात शोध आहे तसेच शोधाची चिरफाड ही आहे, अध्यात्मामध्ये बाळबोधपणा आहे.) 4. विज्ञानामध्ये तत्त्वपरिक्षा आहे, अध्यात्मामध्ये सत्त्वपरिक्षा आहे. (विज्ञानात केवळ तत्व परिक्षाच नाही तर समग्र चिकित्सा आहे, अध्यात्मामध्ये सत्व-परीक्षेचे व्यक्ति-सापेक्ष ढोंग आहे.) 5. विज्ञानामध्ये व्यासंग आहे, अध्यात्मामध्ये सत्संग आहे. (विज्ञानात व्यासंग आणि शोधाचा ध्यास आहे, अध्यात्मामध्ये सम-दांभिकांचा सत्संग नावाचा सहवास आहे.) 6. विज्ञानामध्ये कर्तृत्व आहे, अध्यात्मामध्ये दातृत्व आ

एका रेषेतील मंदिरे

एक विचित्र मेसेज फिरतो आहे। मंदिराचे महत्व सांगताना काही मंदिरे एकाच longitude वर येतात त्याला आश्चर्य म्हटले आहे। तो परिच्छेद असा- "हिमालयातील केदारनाथ ते दक्षिणेतील रामेश्वरम, श्री कलाशक्ती कांचीपुरम, थीलाई नटराजन, चिदंबरम हि सगळी शंकरांची देवळे किंवा मंदिर एका सरळ रेषेत आहेत. एकदम विज्ञानाच्या भाषेत सांगायच झाल तर 79 Deg E 41 min. 54 sec. Longitude." । वास्तविकत: ही माहिती खोटी आहे। कोणी शोधत नाही त्यामुळे फेकू लोकांचे फावते। खरी माहिती अशी- केदारनाथ 30°44′N 79°04′E । रामेश्वरम 9.288°N 79.313°E । कलाशक्ती कांचीपुरम 13°44′58″N 79°41′54″E । नटराजन चिदंबरम 11°23′58″N 79°41′36″E । यावरून लक्षात येईल की ही मंदिरे एका रेषेत नाहीत। एक longitude म्हणजे सुमारे 111 किमी अंतर होते हेही लक्षात घ्यावे। । पण 2-4 हजार किमी ची सरळ रेषा काढली तर 2-4 तरी सारख्या गोष्टी सापडतील। स्मशान पण सापडतील, स्वच्छता गृहे पण, दवाखाने पण। मग त्याचे पण असले कुचट अर्थ लावत बसणार काय? । बदमाश फेकू लोकांपासून अज्ञानी लोकांना वाचवले पाहिजे।

जगन्नाथ पुरीच्या कथित रहस्यांमागचे अज्ञान

जगन्नाथ पुरी येथील चमत्कारांबाबत उत्तर देत आहे.  जगन्नाथ पुरीच्या कथित रहस्यांमागचे अज्ञान  जगन्नाथ पुरी येथील तथाकथित ‘न उलगडणार्‍या रहस्यांची’ पोस्ट सध्या फिरत आहे, त्यास हे उत्तर:   पुरी येथील हे मंदिर जुन्या काळातील अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमूना आहे याबादधल शंकाच नाही. परंतु अशा या भव्य वास्तूला बिनबुडाच्या ‘चमत्कारांची’ जोड देऊन त्या काळातील मानवांनी केलेल्या अफाट कर्तृत्वाला खुजे करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो मात्र योग्य वाटत नाही.     या पोस्ट मधील भगवान श्रीकृष्णाच्या न जळालेल्या हृदयाच्या लगद्याची कहाणी ऐकून सहज उत्सुकता म्हणून नेटवरील विविध साइट्सचा धांडोळा घेतला. त्यांची लिंक देत आहे. त्यावरून पुढील निष्कर्ष निघतात:  1) जगन्नाथ पुरीचे प्रसिद्ध मंदिर हे खरे तर विष्णुचे आहे व त्यातील मुख्य मूर्ति विष्णूची आहे.  भगवान श्रीकृष्णाच्या न जळालेल्या हृदयाच्या लगद्याची कहाणी काही कुठे सापडली नाही.  इंद्रद्युम्न विषयी वाचायला मिळालेली कथा पूर्णतः वेगळी आहे.  2) जगन्नाथाची मूर्ति दर 12 वर्षांनी नाही तर 8 ते 19 वर्षांनी, अधिक मास वगैरे अनेक बाबी पाहून मग ब