पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महालक्ष्मी कॅलेंडर मधील भाकीत

घरात महालक्ष्मी कॅलेंडर असेल तर जुलै 2021 महिन्याचं पान उघडा, उजव्या हाताला 'पर्जन्य अंदाज' चा रकाना बघा.  8-9 महिन्यांपूर्वी सूर्याची स्थिती 22 जुलैला कोणत्या नक्षत्रात असेल, त्यावरून त्यांनी पावसाचा अंदाज लावला आहे. त्यात भरीस भर म्हणजे पूर येणार हे भाकीतही केलं आहे. त्यानुसार 22 जुलैला झालेल्या पावसामुळे कोकणात बहुतेक सर्वच ठिकाणी पूर आलेला आहे.  आता महत्वाचा मुद्दा, काही पुढारलेली लोकं, ज्यांचं मस्तिष्क अभिनव शैक्षणिक पद्धतीने तासून घेतलेलं आहे असे वास्तववादी लोक या हिंदू ज्योतिष शास्त्राला आणि पंचांगाला थोतांड म्हणून हिणवतात आणि हे पंचाग बघणाऱ्या विशारदांना किडमिडे गुरुजी म्हणून टोपण नावे ठेवतात.  मला अशा सो-कॉल्ड सुधारलेल्या लोकांना एवढंच सांगावस वाटत की ब्रिटिशांच्या मार्गदर्शनाच्या आणि शिक्षणपद्धतीचा कुबड्या घेऊन तुम्हाला वाटत असेल की तुमचा सर्वांगीण विकास झाला आहे तर खरं म्हणजे ते तुमचं वैचारिक अध:पतन आहे. हिंदू संस्कृती ही विश्वगुरु होती आणि भविष्यातही राहील, कुणी परकीय शक्तीने तिच्या बद्दल कितीही वाईट गोष्टींचा प्रचार केला तरी तिचे सत्व तुसभरही कमी होणार नाही. ======

*ईद आणि अंनिस* या विषयावरील पोस्टला उत्तर

*ईद आणि अंनिस* या विषयावरील पोस्टला उत्तर: –  उत्तम जोगदंड. बकरी ईद निमित्त अंनिसला टार्गेट करणारी आणि मुस्लिम विद्वेष ओकणारी एक पोस्ट आज समाज-माध्यमांवर फिरत आहे. ही पोस्ट वाचून, काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी हिंदू धर्माला किती इस्लामावलंबी केलंय, इस्लामची सावली बनवले आहे याची जाणीव होते आहे. विशेष म्हणजे स्वतःत कसलीही हिम्मत नसलेले हे लोक आपला मुस्लिम द्वेष व्यक्त करण्यासाठी अंनिसचा आधार घेत आहेत आणि एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता त्या पोस्टमधील एक एक मुद्द्यावर विचार करू या:  पोस्ट:  देवीपुढे कोंबड्याचा बळी देणे अंधश्रद्धा म्हणणारी 'अंनिस' आज बकरी ईदला आपल्या बायकोच्या पदरात लपून बसणार आणि एकदम २३ जुलैला बाहेर येणार! उत्तर :  *याचा अर्थ असा होतो की हिंदू लोक देवीपुढे कोंबडे/बकरे कापतात ही अंधश्रद्धा आहे हे अंनिसचे म्हणणे लेखकास मान्य आहे. तसे नसेल तर ईदला बकरी कापतात म्हणून हिंदू लोक देवीपुढे कोंबडे/बकरे कापतात असा तर्क लेखक करू इच्छित आहेत काय?  दुसरे म्हणजे, मुसलमानांच्या ईदला बकरी कापतात त्या प्रकाराला अंनिसवाले घाबरून जाऊन अंधश्रद्धा म्हणत नाहीत अस

परधर्म द्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या चुकीच्या प्रश्नांना खरी उत्तरे...

परधर्म द्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या चुकीच्या प्रश्नांना खरी उत्तरे... – उत्तम जोगदंड. सुशिक्षीत हिंदु मित्रानो खालील प्रश्न गांभीर्याने वाचा व त्यांची उत्तरे शोधा या धर्मांध  पोस्टला उत्तर :  1. आज जगामधे 56 देश अधिकृत इस्लामीक देश आहेत. 112 देश अधिकृत ख्रिस्तीयन देश आहेत. 11 देश अधिकृत बौध्द धर्मीय देश आहेत. वीस लक्ष लोकसंख्या असणारा इस्त्राइल अधिकृत ज्यु धर्मीय देश आहे. एक ते दोन लक्ष लोकसंख्या असणारे व तालुक्याएवढे क्षेत्रफळ असणारे मुस्लिम व ख्रिस्ती यांचे जगात अनेक देश आहेत, पण 100 कोटी हिंदु धर्मीयांसाठी संपुर्ण पृथ्वीतलावर एकही हिंदुराष्ट्र का अस्तित्वात नाही ? मुस्लिम व ख्रिस्ती यांच्या लहान देशाना देखील आदर व सन्मान मिळतो मग 100 कोटी हिंदुंसाठी हिंदुराष्ट्र का असु नये ? भविष्यात जगामधे धर्माच्या आधारावर तिसरे महायुध्द होण्यची शक्यता आहे अशा वेळी हिंदुंनी कोणाकडे मदतीच्या अपेक्षेने पहायचे ? उत्तर:  1. एक तर अधिकृत धर्म असलेल्या देशांची आकडेवारी चुकीची आहे. अधिक महितीसाठी पुढील लिंक पहावी (https://simple.wikipedia.org/wiki/State_religion#Hindu_countries)  एक हिंदू देश होता नेपाळ तो