राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत
*राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत.* _राजीव दीक्षित यांच्या आवाजात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबतची सत्यता_ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्याच्या अवघ्या नऊच दिवसांत राजीव दीक्षित यांच्या आवाजातील जवळपास साडेतीन तासांचा एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड झाला. ते ऑडिओ स्वरूपातील भाषण आहे. त्याला अगदी व्यवस्थित एडिट करून, ॲनिमेशन समाविष्ट करून हा व्हिडीओ युट्युबवर अपलोड केलेला आहे. (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूची ते वाटच पाहत होते का?) त्यापूर्वी कुणालाही माहीत नसलेला व्हिडिओ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतरच युट्युबला अपलोड झाला, यालाही एक कारण आहे. व्हिडिओ पाहताना पहिल्या काही मिनिटांत हे कारण उघड होते. ते कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये असलेली धादांत खोटी विधाने. त्या खोट्या विधानांना उत्तर देऊ शकणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात नसल्याचा फायदा घेण्यासाठीच जणू हा व्हिडिओ त्यांच्या मृत्यूनंतर युट्युबवर अपलोड केला असावा. खरे तर त्याचवेळी काही अंनिस कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आली होती. परंतु विरोधकांना उत्तरे देण्यात वेळ न घालवता कामावर लक्ष...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा