पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

इमेज
चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..!   म्हणून  गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...! 🤔 मित्रांनो, शिवजयंती बंद पडणारे व गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक. यांनी गणपती बसविला. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली. दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून वाजत गाजत मिरवणुक निघाली. त्यात दर्शन खुले होते.           एका चर्मकाराने (चांभार) गणपती जवळ जाऊन चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले..! मिरवणुकीतील सर्व ब्राम्हणांनी एकच बोभाटा केला... गणपती बाटला, गणपति बाटला म्हणून टिळकांवर खेकसायाला लागले. "हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर हे असे होते. धर्म बुडाला, चांभाराने धर्म बुडविला..!"   तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती. टिळक म्हणाले - "ओरडू नका. धर्म कशाला बुडू द्यायचा. त्यापेक्षा  आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू  (म्हणजे पाण्यात फेकून बुडवून टाकू...) अश्याप्रकारे तो चांभाराच्या स्पर्शाने बाटलेला गणपती बुडवला गेला आणि तेंव्हापासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली! ✍🏻 - डॉ. नरेंद्र दाभोळकर *या दाभोळकरांच्या बदनामीकारक पोस्टला उत्तर... – उत्तम जोगदंड.*

कृष्णाच्या पदस्पर्शाने पाणी हटले? काय आहे वसुदेव प्याल्याचे रहस्य?

इमेज
‘काय विचित्र कारागिरी आहे … या 250 वर्षांच्या पितळी भांड्यात भगवान कृष्णाजी वासुदेवाजींच्या मांडीवर बसले आहेत. हा वाडगा पाण्याने भरल्याने ते कोठूनही सांडत नाही परंतु जेव्हा पाणी भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या तळव्यांना स्पर्श करते तेव्हा सर्व पाणी तळाच्या छिद्रातून सांडते.’ या मजकुरासोबत हे व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहेत. यामध्ये कृष्णमूर्तीच्या पायाला पाण्याचा स्पर्श होताच प्याल्यात जमा झालेले सर्व पाणी वाहून जाते. याला काही लोक चमत्कार म्हणत आहेत. पहिल्यांदा हे व्हिडीओ पहा. या व्हिडीओंंला दिलेले उत्तर वाचा. द्रव पदार्थ हा नेहेमी उच्च पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहतो हे वैज्ञानिक तत्व आहे. पाण्याची पातळी वाढतवाढत सर्वोच्च पातळीला पोचली की कमी पातळीकडे वाहू लागते आणि ते पूर्ण रिकामे होईपर्यंत वाहत राहते. याला Siphon असे म्हणतात. एक वैज्ञानिक तत्व, एक अख्यायिका आणि एक पौराणिक कथा यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेली एक अनोखी वस्तू म्हणजे 'वसुदेव प्याला'! एखाद्या उंच ठिकाणी ठेवलेल्या पिंपातून अथवा टाकीतून आपल्याला पाणी (किंवा इतर एखादा द्रव पदार्थ) खाली काढायचे असेल तर वक्रनलिका (Siphon) वि

पाण्यावर पेटणारी पणती: किती खरे? किती खोटे?

      सोशल मीडियातून पाण्यावर पेटणाऱ्या पणतीचे व्हिडीओ सध्या पसरत आहेत. व्हिडीओमध्ये तेजस खरे नावाचा तरुण या पणतीची माहिती देताना दिसत आहे. पणतीमध्ये पाणी ओतताच पणतीची ज्योत आपोआप प्रज्वलित होताना दिसते. तरुणही त्या प्रकाशाला 'पणतीची ज्योत' पेटलेली आहे असेच म्हणताना दिसत आहे. आपण तो व्हिडीओ खाली पाहू शकता.  या व्हिडीओसोबतच एक मेसेजही पसरवला जात आहे. त्यामध्ये या पणतीची जाहिरात केलेली आहे. या मेसेजमध्ये ' विद्युत उर्जे शिवाय उत्कृष्ट रोषणाई करा' असे म्हटले आहे. याचा अर्थ विद्युत ऊर्जेशिवाय ही पणती प्रज्वलित होते असा तेजस खरेचा दावा दिसतो. याच मेसेजमध्ये या पणतीला तेल आणि वातीचीही गरज नसल्याचे म्हटले आहे. आणि सर्वात कहर म्हणजे साई बाबांनी पाण्यावर पणती पेटवण्याचा चमत्कार केला होता, त्याच आधारावर आपण ही पणती तयार केली असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. एकंदरीत ही पणती चमत्कारिक असल्याचा आभास निर्माण केलेला आहे. यामागील तथ्य काय आहे?        पहिली गोष्ट म्हणजे या पणतीला विद्युत उर्जा लागत नाही, ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. या पणतीची ज्योत म्हणजे LED बल्ब आहे. LED बल्ब विद्यु

हा भक्त प्रल्हादाचा अवतार आहे का? व्हायरल व्हिडीओमागचे सत्य काय?

इमेज
      हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये एका चुलीवर एक कढई ठेवली आहे. आणि त्या कढईमध्ये द्रव पदार्थ उकळत ठेवलेला आहे. तो द्रवपदार्थ पाणी आहे की तेल आहे, हे व्हिडिओ बघून समजत नाही. त्या उकळत्या द्रवामध्ये एक मुलगा हात जोडून बसलेला आहे. त्या मुलाच्या अंगावर कपडे नाहीत. फक्त खांद्यावर भगव्या रंगाचे एक उपरणे घेतलेले दिसत आहे. पाठीमागे लावलेल्या बॅनरवर 'भक्त प्रल्हाद' असे लिहिलेले दिसत आहे. लोक जयघोष करत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. यावरून एकंदरीत एक चमत्कार घडत असल्याचेचे भासवण्यात आलेले आहे. हा व्हिडीओ आपण खाली बघू शकता. एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे जगामध्ये चमत्कार घडत नसतात. चमत्कारसदृश वाटणाऱ्या घटनांमध्ये काही हातचलाखी असते किंवा माहीत नसलेला कार्यकारण भाव असतो. तो कार्यकारण भाव माहित करून घेतला की अशा घटनांमागचे चमत्काराचे वलय गळून पडते. सदर व्हिडिओ पाहिला असता असे लक्षात येते की इथेही हातचलाखीचा आधार घेतलेला आहे. पाणी/तेल उकळताना चारही बाजूने उकळताना दिसायला हवे होते. परंतु कढाईमध्ये फक्त एकाच ठिकाणी बुडबुडे येताना दिसत आहेत. चमत्काराचा

भगवद्गीता पाण्यात भिजली नाही?

'पुराच्या पाण्यात रात्रभर तंरगुन ही श्रीभगवतगीता ओली झाली नाही. हीच परमेश्वराची लीला' अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यासोबत खालील व्हिडीओ पसरवला जात आहे. हा खरोखरच चमत्कार आहे का? यामागील नेमके सत्य काय आहे? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संदीप गोवळकर त्यांनी ते खालील  व्हिडीओमध्ये सांगितले आहे. यावरून हेच दिसून येते की सर्वच पुस्तकांबाबत घडत असलेल्या गोष्टीला इथे चमत्कार म्हणून सांगितले जात आहे.  या व्हिडीओची सत्यता 'चेकपोस्ट मराठी'ने सुद्धा तपासली आहे. आपण इथे क्लिक करून त्यासंबंधी माहिती पाहू शकता.