पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
विठ्ठलाचा वारकरी,चालून चालून थकलाय रस्त्याच्याच कडेला पदपथावर झोपलाय पायात नाही चप्पल त्याच्या... हजला मात्र विमान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत बैलपोळा झाला, बैलाची तब्येत मस्त आहे वसुबारसेला सवत्स धेनु , धन्यासवे स्वस्थ आहे एका सणात मात्र तिची... सुऱ्याखाली मान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाऊस यंदा चांगला झाला ,हिरवगार गवत आहे बाळुमामांची मेंढरं ,जिकडे तिकडे चरत आहेत बकरी ईदला मात्र त्यांचा ... कसाया हाती कान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाच वेळा नमाज पडून मुल्ला देतो आहे बांग चार पत्नी मिळून त्याच्या ,मुलांची लावत आहेत रांग आयुष्यभर त्यांच्या नशिबी... बाळंतपणाची घाण आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत शबरीमलात रजस्वलांना ,घुसवण्यास सर्व आतूर आहेत मशीदबंदीवर ''तिच्या" मात्र , गप्प सारे फितूर आहे रणरणणाऱ्या उन्हामध्ये ... काळ्या बुरख्यात जनान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत फटाके मुक्त दिवाळी, न्यायदेवतेचा आदेश आहे परंपरांची लाज बाळगा, कारण आपलाच स्वदेश आहे डिसेंबरच्या रात्री मा

रक्षाबंधनाचा मुहूर्त??

 रक्षाबंधनाचा मुहूर्त??          अगदी गेल्यावर्षापर्यत रक्षाबंधनासाठीही मुहूर्त असतो हे माहित नव्हते, गेल्यावर्षी कुजबूज होती. यावर्षी आवाज वाढलाय, याबाबतीत आपली प्रगती पाहता पुढीलवर्षी पेपरमध्ये /कॕलेंडरवर याची नोंद येवू शकते. एवढा बिनडोकपणा येतो कुठून?  काही दिवसांपूर्वी चांद्रयान 3चे कौतुकसोहळे करणारे आज रक्षाबंधनाचा मुहूर्त शोधत आहेत, असं असेल तर अशी हजारो चांद्रयान सोडली तरी आपण तिथेच राहणार आहोत. अशा गोष्टीमागे नक्की लॅाजीक काय? असं विचारलं तर "असेल कायतरी...आपला एवढा अभ्यास नाही, कशाला उगा रिस्क घ्या, उगाचच एवढी लोकं सांगतात का?" "असेल कायतरी" या वाक्याने आपण कितीतरी अंधश्रद्धा अगोदरच बळकट केल्या आहेत आणि त्याच कारणाने कितीतरी अंधश्रद्धा  नव्याने जन्माला घालत आहोत. विज्ञानाने अज्ञानाचा अंधःकार दूर होण्याऐवजी आपण त्यातच अडकत चाललो आहोत. इतिहास, विज्ञानाचा फार मोठा अभ्यास करण्याची गरज नाही. प्राथमिक शाळेतील सामान्य विज्ञान आणि चौकस बुद्धीतून साधेसाधे प्रश्नआठवून बघा कि. या आधी कधी रक्षाबंधनसाठी मुहूर्त शोधले होते का? इतरांचे सोडा आपल्या लहापणाचं आठवून बघा असे क

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

 *राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत.* _राजीव दीक्षित यांच्या आवाजात व्हायरल होत असलेल्या  व्हिडीओबाबतची सत्यता_ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्याच्या अवघ्या नऊच दिवसांत राजीव दीक्षित यांच्या आवाजातील जवळपास साडेतीन तासांचा एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड झाला. ते ऑडिओ स्वरूपातील भाषण आहे. त्याला अगदी व्यवस्थित एडिट करून, ॲनिमेशन समाविष्ट करून हा व्हिडीओ युट्युबवर अपलोड केलेला आहे. (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूची ते वाटच पाहत होते का?) त्यापूर्वी कुणालाही माहीत नसलेला व्हिडिओ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतरच युट्युबला अपलोड झाला, यालाही एक कारण आहे. व्हिडिओ पाहताना पहिल्या काही मिनिटांत हे कारण उघड होते. ते कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये असलेली  धादांत खोटी विधाने. त्या खोट्या विधानांना उत्तर देऊ शकणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात नसल्याचा फायदा घेण्यासाठीच जणू हा व्हिडिओ त्यांच्या मृत्यूनंतर युट्युबवर अपलोड केला असावा. खरे तर त्याचवेळी काही अंनिस कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आली होती. परंतु विरोधकांना उत्तरे देण्यात वेळ न घालवता कामावर लक्ष केंद्रित करणे