पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वटपौर्णिमा !!! काय आहे ७ जन्माचे रहस्य?

वटपौर्णिमा !!! काय आहे  ७ जन्माचे रहस्य? या पोस्टला उत्तर: मुळात या पुंडांनी लावलेला हा अचाट शोध या आधी लावायचे गेल्या हजारो वर्षात आतापर्यंतच्या महापुरुषांना, विद्वानांना, ऋषींना, योग्यांना का बरे सुचले नसावे असा एक साधा प्रश्न ही पोस्ट वाचून उद्भवतो. सात जन्म ही जीवशास्त्रीय भूमिका नसून आध्यात्माला तोडून मोडून विज्ञानाला जोडाण्याचा केवीलवाणा आणि निष्फळ प्रयत्न आहे. त्यावेळच्या ज्ञानाला पेशी व तिचे जिवन याची आजिबात माहिती नव्हती. पूर्वी साथीचे  आजार आले की माणसे पटापट मरायची. साध्या साध्या रोगाने देखील लोक मरायचे.  त्यामुळे १००वर्षे जगणे शक्यच नव्हते. तसेच एकूण एक पेशी बदलायला १२ वर्षे लागतात हा जावईशोध कोणत्या आधारावर लावला? शरीरातील विविध पेशींचे आयुष्य ३-४ दिवसांपासून ३-४ महीने एवढेच असतांना ही १२ वर्षाची बिनबुडाची भानगड कुठून आणली. १२ वर्षांनी अशा पेशी बदलत असतील तर माणूस कायम तरुण राहायला हवा, तो वृद्ध का होतो? तसेच त्या काळी पती पत्नीचे वय कधीही समान नसायचे. व लग्ने अगदी लहानपणी होत. म्हणून १२ x७ वगैरे आकडेवारी हे सरळ सरळ थोतांड आहे हे दिसून येते. वड फक्त आँक्सिजन