ज्यो बायडेन यांचा व्हाईट हाऊस प्रवेश हिंदू मंत्रोच्चारात?

 

अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्हाईट हाऊस मध्ये पहिल्या दिवशी प्रवेश करण्यापूर्वी भारतीय श्लोकानी सुरुवात करण्यात आली....

        आपल्या कडच्या बांडगुळांना दाखवा. यालाही अंधश्रद्धा म्हणून हीनवणार का?


=====================================================

या पोस्टला उत्तर


धर्मांध लोकांनी सुरुवातीपासूनच खोटेपणाचा आधार घेतला आहे. कोणत्याही धर्माचे धर्मांध लोक याला अपवाद नाहीत. अलीकडच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर त्यांच्या खोटेपणाला सीमाच राहिली नाही. कुठलेही फोटो आणि कुठलेही व्हिडीओ कुणाच्याही नावे खपवण्याची त्यांनी जणू मोहीमच उघडली आहे. आता या व्हिडीओमध्ये त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारतीय मंत्रोच्चाराच्या गजरात व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्याचे निर्देशित केले आहे. ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. कारण ज्यो बायडेन यांनी अजून व्हाईट हाऊसमध्ये राहायला गेलेलेच नाहीत. त्यांची निकालाची अधिकृत प्रक्रिया अजून पूर्ण झालेलीच नाही. २० जानेवारी रोजी ते शपथ घेणार आहेत. तोवरच खोटारड्या धर्मांध लोकांनी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये पोचवले देखील!! 

मग वरील व्हिडीओचे सत्य काय आहे?सदरील व्हिडीओ २०१४मधील आहे. २०१४मध्ये अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने व्हाईट हाऊसमध्ये म. गांधी जयंती साजरी केली होती. त्या जयंती कार्यक्रमाचा तो व्हिडीओ आहे. पण खोटारड्या धर्मांध लोकांना आम्हीच किती ग्रेट आहोत हे सांगण्यासाठी नेहमीप्रमाणे हा व्हिडीओ कामी आला.

टिप्पण्या

  1. सत्य मांडलेत आपण, या धर्मांध यांचे खोटेपणाने दुकान चालते. हे देवाला खरे मानत असते तर ते देवाला घाबरून तरी यांनी चांगले कर्म केले असते पण असे दिसत नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. समाजात काही कलाकार मंडळी आहेत त्यांना व्हिडिओ एडिटिंग चांगल्या प्रकारे करता येते....इंग्रजी लोकांसोबत भारतीय भाषा जोडता येतात किंवा उलटे सुधा करता येते तेव्हा असे व्हिडिओ तयार होतात....गमत म्हणून बरेच लोक असे करतात तेव्हा हे असे व्हिडिओ फार गांभीर्याने घ्यायचे नसतात...मनोरंजन म्हणून त्याकडे बघायचे असते...खरे खोटे करायचे तर सोडूनच द्या...तसे करायला गेले तर हाती काहीच येत नाही फक्त वेळ वाया जातो....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य