पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तथाकथित संतांचे प्रकटीकरण

तथाकथित संतांचे प्रकटीकरण - डॉ प्रकाश कोयाडे 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असं म्हणण्यापाठीमागचा अर्थ हाच की, 'तु भित्रा आहेस!' ही पोस्ट वाचून एखाद्याच्या भावना दुखावत असतील तर दुखू देत, पायताणाशेजारी मेंदु ठेवून मंदिरात प्रवेशनाऱ्या लोकांसाठीच ही पोस्ट आहे. एकीकडे देश महासत्ता होणार अशी स्वप्न पहायची आणि दुसरीकडे साईबाबाचा जन्म कुठे झाला अशा वांझोट्या प्रश्नावर वाद घालायचा हे भारताशिवाय कुठेच होत नसेल. हे बाबालोक प्रकट कुठे झाले, कधी झाले, कसे झाले यापेक्षा ते प्रकट 'का' झाले... हा सर्वात मोठा प्रश्न आहे. संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज या चारशे पाचशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या संतमंडळींच्या जन्मतारखा किंवा जन्मवर्ष तरी उपलब्ध आहेच. एवढंच नाही तर तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांच्या जन्ममृत्युबद्दल, त्यांचे आई-वडील,गाव, कुळ सर्व माहिती उपलब्ध आहे. मग हे दीडशे वर्षांपूर्वी अगदी इंग्रज असताना उपजलेल्या (प्रकटलेल्या) बाबा लोकांचं मुळ का सापडू नये?  स्वामी समर्थ, साईबाबा आणि गजानन महाराज... या तिघांचा इतिहास जवळपास सारखाच आहे. विना घडविता 'माठ&#

नास्तिकांचं संघटन...

नास्तिकांचं संघटन... - डॉ सचिन लांडगे. संघटना म्हणली की नियम आले... नियम असले की बंधने आली... बंधनं म्हणलं की विचार खुंटले... आणि विचार खुंटला म्हणजे तर्कबुद्धीचा अस्त!! (तर्कबुद्धी म्हणजे रॅशनालिटी किंवा बुद्धिप्रामाण्यवाद..)  खूप जणांचं म्हणणं असतं की नास्तिकांनी संघटन करू नये कारण, नास्तिकता ही रॅशनालिटीचं (बुद्धिप्रामाण्यवादाचं) बायप्रॉडक्ट असतं आणि कोणतंही संघटन तुमच्या फ्रीथिंकिंग वर घाला घालतं.. पर्यायानं तुमची रॅशनालिटी अफेक्ट होते.. आणि हे बरोबरही आहे.. 'धर्माला विरोध करता करता आपण पण 'नास्तिक्य' नावाच्या दुसऱ्या धर्माला आमंत्रण तर देत नाही ना?' ही अनेकांच्या मनात भीती आहे..  मुळात 'नास्तिक' म्हणजे प्रचलित देवधर्म न मानणारी व्यक्ती, अशी साधी सरळ व्याख्या केली तर त्यात अनेक उपप्रकार पडतात..  'देवाने माझ्यावर खूप अन्याय केला म्हणून मी देवाला मानत नाही', हि देवविद्वेषातून आलेली नास्तिकता अगदीच उथळ नास्तिकता आहे... यांना 'अपॉर्च्युनिस्टीक नास्तिक' म्हणतात... त्याचा विचार आपण इथे करणार नाहीत. कारण अशा स्थितीला तर्कबुद्धीची अथवा कुठल्याही वैचा
आज भल्या पहाटे,गाढ स्वप्नाळू झोपेत होतो..... लांबून एक मनुष्यवजा आकृती माझ्याकडे येताना पुसटशी दिसु लागली.... लाल रंगाचा ठिपका आकार घेत घेत मोठा झाला....... तो सांताक्लॉज होता... मला म्हणाला, "वेक अप माय डिअर चाईल्ड, आय ह्याव ब्रॉट मेनी गिफ्ट्स अँड केक्स, आइस्क्रीम्स, चॉकलेट्स फॉर यु"... मी :(मराठीत) मला भेटवस्तु आणि खाऊ का देतोयस? आपली काय ओळख? सांता:   (थोडा विचार करुन इंग्रजीत)...'जीसस लव्हस् यु माय चाईल्ड, ही सेंट मी हिअर फॉर यु'... 'हि केअर्स यु',.. हि इज व्हेरी काइन्ड' मी: "बरं बरं असेल ब्वा तो जीसस मामा दयाळु"... "मग मला आवडेल ती खेळणी देशील?"... सांता: (मी भुललोय हे बघून आनंदाने मराठीत)..हो हो का नाही? सांग तुला कुठली खेळणी हवी आहे.... मी: मला ना आमच्या शाखेत असतो ना तसा छानसा मजबूत 'दंड' (काठी) दे, ज्याने मी दंडप्रहार करत असतो आणि शाखेतील खेळ खेळत असतो... सांता:(कपाळावर आठ्या आणून)...."बाळा, माझ्याकडे दंड नाहीये," तु दुसरे काही माग, मी देईल".. मी: बरं खेळणी जाऊदे, मला पुस्तक वाचायला
खरा हिंदू तोच... जो गुढीपाढव्याढव्याला नवे वर्षे साजरे करतो... जो स्वतःच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शकेची तारीख टाकतो... आधार कार्डावर शकेने जन्म तारीख टाकतो... तो केवळ हिंदुंनी तयार केलेल्याच वस्तु व सेवा वापरतो... ख्रिश्चन इंग्रजांनी शोध लावलेल्या बस, रेल्वे, कार, मोटरसायकलचा वापर अजिबात करत नाही... ख्रिश्चन इंग्रजांनी शोध लावलेला टिव्ही आजिबात घरी ठेवत नाही... ख्रिश्चन इंग्रजांनी शोध लावलेली इलेक्ट्रीसिटी वापरत नाही.. ख्रिश्चन इंग्रजांनी शोध लावलेले फोन, मोबाईल अजिबात वापरत नाही..... जो सतत रामायण, महाभारत, वेद वाचत राहतो.... सिमेंटने बांधलेल्या घरात न राहता झोपडीतच राहतो... रानावनात भटकून कंदमुळे, झाडपाला व फळे खावुन जगतो... नुसता अभिमानच नाही तर माज आहे हिंदू असण्याचा... 🕉जय श्रीराम🕉 - संत शम्माबाबा _______________