दिमाग की मेणबत्ती जलाव

*🕯दिमाग की मेणबत्ती जलाव🕯*

*"मेणबत्तीला करा राम राम" ही पोस्ट भक्तांकडून सगळीकडे व्हायरल करण्यात येत आहे*

गम्मत पहा स्वतः आयुष्यभर दुसऱ्या धर्माचा दुस्वास करायचा आणि मेणबत्ती शिवाय का होईना, पण *ख्रिसमस साजरा करा* असे आवाहनही करायचे. आम्ही हिंदू आहोत  आणि म्हणे ख्रिसमस साजरा करा. *किती हा वैचारिक गोंधळ.🤥*

मेणबत्ती वापरू नका हे सांगताना भक्तांनी एक फार मोठा अवैज्ञानिक शोधही लावला.
म्हणे *"फटाक्यांपेक्षा मेणबत्ती जास्त प्रदूषण करते"* किती धडधडीत खोटं बोलू शकतात ही भक्त मंडळी. सध्या भ्रामक विज्ञानाचीच चलती आहे. 
फटाका 0.4 gram  व मेणबत्ती 12 gram प्रदूषण करते? फटाका कुठला? कीती मोठा? की छोटा? ध्वनी प्रदूषणहि ग्रॅम मधेच मोजायचं? मेणबत्ती कीती कीलोची? कीती मुळ वजन?? काहीच तपशील नाही? *वैज्ञानिक दृष्टिकोन नसला की अश्या अर्थहीन पोस्ट फाॅरवर्ड होतात.*

मेणबत्त्या घरात लावु शकतो. पण फटाके घरात वाजवु शकत नाही. यावरूनच प्रदूषण कशाने जास्त होते, हे स्पष्ट आहे. *शिवाय फटाक्यांचा कचरा होऊन माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या चिंधड्या उडतात ते वेगळेच.*

मेणबत्तीमुळे खूप प्रदूषण होते असे एकीकडे म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्याच मेणबत्त्या गरिबांना द्यायला सांगत आहेत. *गरिबांच्या घरात मेणबत्ती जळल्यास फटाक्यांपेक्षा कमी प्रदूषण होईल का?* 
*की गरिबांकडे प्रदूषण झाले तरी चालेल, गरीबांशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही असे म्हणायचे आहे??😢*

आणि ज्यांच्याकडे वीज पोहोचली नाही त्यांच्याकडे विजे ऐवजी मेणबत्त्या पोहोचवायला सांगताहेत.  विविध देशात मेणबत्त्या  पोहोचवायचा, पॅकिंग, हमाली इत्यादी खर्च, त्याचे नियोजनकसे करणार? 
*300 कोटी मेणबत्त्या 8 कोटी लोकांना वर्षभर कशा पुरणार? प्रत्येकी सुमारे 37 मेणबत्त्या वर्षभर कशा वापरणार? काय गणित आहे !!!*

या दिवाळीत योगीने पाच लाख दिवे लावून, अकलेचे दिवे लावले हे यांना दिसत नाही. *पण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून असे चालले आहे.*

*—चला ऊत्तरे देऊया टिम*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?