पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रह आणि राशी यांची खोटी भीती

ग्रह आणि राशी यांची खोटी भीती : –य.ना.वालावलकर     आपली सूर्यमाला आहे. तिला ग्रहमाला असेही म्हणतात. या मालेत सूर्य हा एकच तारा आहे. त्याच्या प्रकाशात मालेतील सर्व ग्रह, उपग्रह, लघुग्रह, उल्का, धूमकेतू्, चमकतात. सूर्याभोवती फिरतात.        चंद्र स्वत:भोवती, पृथ्वीभोवती आणि पृथ्वीसोबत सूर्याभोवती फिरतो. सर्व उपग्रह असेच फिरतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे महासागर, पर्वत, वृक्ष, इमारती, प्राणी, पशु-पक्षी सर्व सूर्याभोवती फिरतात. आकाशात उडणारे विमानही सूर्याभोवती फिरत असतेच. सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून असे ग्रह आहेत.       कुंडलीतील ग्रह :-  सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, युरेनस, हर्षल, प्लुटो, राहू आणि केतू. खरेतर सूर्य तारा. चन्द्र उपग्रह. राहू-केतू हे काल्पनिक बिंदू. असे हे ज्योतिषांचे बारा ग्रह !      खगोलशास्त्रानुसार पृथ्वीपासून अंतरे (किलो मिटर) :--- (1)चंद्र :- 40 लक्ष..(2)सूर्य:- 15 कोटी..(3)बुध:- 10 कोटी..(4)शुक्र :- 5 कोटी ..  (5)मंगळ:- 8 कोटी..(6)गुरू:- 65 कोटी..(7)शनी :- 130 कोटी .. (8) हर्षल:- 270कोटी..(9)नेपच्युन:- 440 कोट

पितृपक्षात कावळ्यासच का खाऊ घातले जाते?

मूळ पोस्ट अशी आहे श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते...🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया. जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ वड व पिंपळ हे दोन वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लाऊ शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा कावळे खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात. या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घरोघरी पोषक आहार या काळात प्रत्येकाने दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते. आपल्या संस्कृतीतील ऋषि-मुनि हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते