पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका रेषेतील मंदिरे

एक विचित्र मेसेज फिरतो आहे। मंदिराचे महत्व सांगताना काही मंदिरे एकाच longitude वर येतात त्याला आश्चर्य म्हटले आहे। तो परिच्छेद असा- "हिमालयातील केदारनाथ ते दक्षिणेतील रामेश्वरम, श्री कलाशक्ती कांचीपुरम, थीलाई नटराजन, चिदंबरम हि सगळी शंकरांची देवळे किंवा मंदिर एका सरळ रेषेत आहेत. एकदम विज्ञानाच्या भाषेत सांगायच झाल तर 79 Deg E 41 min. 54 sec. Longitude." । वास्तविकत: ही माहिती खोटी आहे। कोणी शोधत नाही त्यामुळे फेकू लोकांचे फावते। खरी माहिती अशी- केदारनाथ 30°44′N 79°04′E । रामेश्वरम 9.288°N 79.313°E । कलाशक्ती कांचीपुरम 13°44′58″N 79°41′54″E । नटराजन चिदंबरम 11°23′58″N 79°41′36″E । यावरून लक्षात येईल की ही मंदिरे एका रेषेत नाहीत। एक longitude म्हणजे सुमारे 111 किमी अंतर होते हेही लक्षात घ्यावे। । पण 2-4 हजार किमी ची सरळ रेषा काढली तर 2-4 तरी सारख्या गोष्टी सापडतील। स्मशान पण सापडतील, स्वच्छता गृहे पण, दवाखाने पण। मग त्याचे पण असले कुचट अर्थ लावत बसणार काय? । बदमाश फेकू लोकांपासून अज्ञानी लोकांना वाचवले पाहिजे।