*धर्मांध भक्त उवाच* - आत्मा ही एक कंसेप्ट आहे. मास आणि एनर्जी यासारखी! मास दिसतं पण एनर्जी दिसत नाही. म्हणून एनर्जी अस्तित्वात नाही असं तर नसतं ना! शरीरात असणार्या या एनर्जीला वा चैतन्यालाच आत्मा हे नाव दिलं आहे. as energy can neither be created nor be destroyed but it can be converted in another form.... हा जसा उर्जा अक्षय्यतेचा नियम आहे त्याचं हे चौर्यांशी लक्ष योनी रूपक आहे. *माझे उत्तर* - पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जा म्हणजे चैतन्य नाही. कारण ऊर्जा ही निर्जीव भौतिक राशी आहे तर चैतन्य हा सजीवाचा अंगभूत गुणधर्म आहे. सबब ऊर्जा म्हणजे चैतन्य असे समजणे चुकीचे आहे. दुसरे असे की, ऊर्जा दिसत नसली तरी तिचे परिणाम दिसत असतातच ना? जसे की, उष्णता ऊर्जेने पदार्थ तापणे, विद्युत ऊर्जेने अनेक उपकरणे चालवणे, वाऱ्याच्या ऊर्जेने हवामानात बदल होणे, नाक दाबले की गुदमरणे हा हवेचा परिणाम, रासायनिक ऊर्जेने अन्नाचे पचन होणे... अशी यादी खूप लांबवता येईल. तसा आत्म्याचा एखादा तरी परिणाम दाखवू शकाल काय? मग फक्त न दिसणे हा निकष कसा काय होऊ शकतो? वैज्ञानिक नियम चुकीच्या पद्धतीने वापरणे याला तर छद्मविज्ञान म्हण
खोट्या, दिशाभूल करणाऱ्या, अवैज्ञानिक पोस्ट्सना उत्तरे देणारा ब्लॉग