दिमाग की मोमबत्ती जलाव
🕯दिमाग की मोमबत्ती जलाव🕯
"मेणबत्तीला करा राम राम" ही पोस्ट भक्तांकडून सगळीकडे व्हायरल करण्यात येत आहे
गम्मत पहा स्वतः आयुष्यभर दुसऱ्या धर्माचा दुस्वास करायचा आणि मेणबत्ती शिवाय का होईना, पण ख्रिसमस साजरा करा असे आवाहनही करायचे. आम्ही हिंदू आहोत आणि म्हणे ख्रिसमस साजरा करा. किती हा वैचारिक गोंधळ.🤥
मेणबत्ती वापरू नका हे सांगताना भक्तांनी एक फार मोठा अवैज्ञानिक शोधही लावला.
म्हणे "फटाक्यांपेक्षा मेणबत्ती जास्त प्रदूषण करते" किती धडधडीत खोटं बोलू शकतात ही भक्त मंडळी. सध्या भ्रामक विज्ञानाचीच चलती आहे.
फटाका 0.4 gram व मेणबत्ती 12 gram प्रदूषण करते? फटाका कुठला? कीती मोठा? की छोटा? ध्वनी प्रदूषणहि ग्रॅम मधेच मोजायचं? मेणबत्ती कीती कीलोची? कीती मुळ वजन?? काहीच तपशील नाही? वैज्ञानिक दृष्टिकोन नसला की अश्या अर्थहीन पोस्ट फाॅरवर्ड होतात.
मेणबत्त्या घरात लावु शकतो. पण फटाके घरात वाजवु शकत नाही. यावरूनच प्रदूषण कशाने जास्त होते, हे स्पष्ट आहे. शिवाय फटाक्यांचा कचरा होऊन माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या चिंधड्या उडतात ते वेगळेच.
मेणबत्तीमुळे खूप प्रदूषण होते असे एकीकडे म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्याच मेणबत्त्या गरिबांना द्यायला सांगत आहेत. गरिबांच्या घरात मेणबत्ती जळल्यास फटाक्यांपेक्षा कमी प्रदूषण होईल का?
की गरिबांकडे प्रदूषण झाले तरी चालेल, गरीबांशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही असे म्हणायचे आहे??😢
आणि ज्यांच्याकडे वीज पोहोचली नाही त्यांच्याकडे विजे ऐवजी मेणबत्त्या पोहोचवायला सांगताहेत. विविध देशात मेणबत्त्या पोहोचवायचा, पॅकिंग, हमाली इत्यादी खर्च, त्याचे नियोजनकसे करणार?
300 कोटी मेणबत्त्या 8 कोटी लोकांना वर्षभर कशा पुरणार? प्रत्येकी सुमारे 37 मेणबत्त्या वर्षभर कशा वापरणार? काय गणित आहे !!!
या दिवाळीत योगीने पाच लाख दिवे लावून, अकलेचे दिवे लावले हे यांना दिसत नाही. पण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून असे चालले आहे.
—चला ऊत्तरे देऊया टिम
देव दिसत नाही,मानत नाही तो नास्तिक, पण मन सुद्धा दिसत नाही म्हणून मन नाहीच असे म्हणतां येईल का
उत्तर द्याहटवा