₹585,00,00,00,000 इतकी रक्कम प्राविडंट फंड अनक्ल्मेड सरकारी खाते मध्ये जमा- । आधार कार्डचे जनक नंदन निलकेणी सुद्धा असंच म्हणतात। फक्त ते काँग्रेसचं नाव न घेता असं म्हणतात-"मोदी सरकारने हि इतकी प्रचंड रक्कम आधार कार्डला जोडल्यामुळे ती फ्रॉड लोकांच्या हातात गेली नाही आणि सरकारी खजिन्यात शिल्लक राहिली।"
निलकेणी हि राजकारणी व्यक्ती नाही, तर इन्फोसिसचे सह संस्थापक आहेत। त्यामुळे त्यांच्या शब्दांना खूप गांभीर्याने घ्यायला हवे।
देशातील 80% लोकांना हे आकडे पाहून हि किती रक्कम आहे हे सांगताही येणार नाही। हि रक्कम आहे 58500 कोटी (585 अब्ज), म्हणजे अर्धा लाख कोटीहूनही अधिक। सामान्य माणसाला यात काही कळत नाही आणि मग ही रक्कम अगदी सहजपणे *चोरांच्या खिशात जात राहिली आणि आम्हाला त्याचा कधी पत्ताही लागला नाही!
मोदींनी सगळीकडे आधार जोडणी करून ह्यांची पुरती नाकाबंदी करून टाकलीय। आज देशातील 100 कोटी लोक आधारने जोडले गेलेत। शिवाय 50 कोटी लोक बँकांशी आधारने जोडले गेलेत। त्यामुळे सरकारने सबसिडीच्या रुपात तब्बल 75 हजार कोटी जनतेच्या खात्यात जमा केलेत, हा डिजिटल इकॉनॉमिमधला विश्व विक्रम आहे। नंदन निलेकणी जागतिक बँक आणि आंतर राष्ट्रीय नाणे निधीच्या मिटिंगसाठी सध्या वॉशिंग्टनला आहेत। तिथे त्यांनी मोठ्या अभिमानाने नरेंद्र मोदी सरकारचं कौतुक केलंय।
आम्हीच कपाळ करंटे- मोदींनी अर्थ व्यवस्था खड्यात नेलीय म्हणून जगाला ओरडून सांगतोय। आपण शाळा कॉलेजमध्ये जाऊन उच्य शिक्षण घेतलं पण देशाच्या अर्थ व्यवस्थेचा मात्र कधी अभ्यास करत नाही तरीही असे बेछूट आरोप करायला कसे काय धजावतो? एक माणूस जीवाचं रान करून अर्थ व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही त्याची चेष्टा करतोय। गॅस सिलिंडर, पासपोर्ट, बँक खाती, सरकारी पगार, त्यांची पेन्शन, करोडो लोकांचा पीएफ आधाराला जोडले गेल्यामुळे डिजिटल क्रांतीची सुरुवात झालीय। क्रीप्टो करन्सीची जगात सुरुवात होऊन 8 वर्ष झाली। येत्या काळात देशात त्याची सुरुवात झाली तर भ्रष्टाचार आणि काळे व्यवहार 70% कमी होतील। असं काही होऊ नये म्हणून सगळे विरोधक एक होऊन मोदींच्या हात धुवून मागे पडलेत।
बात जब राष्ट्र और राष्ट्रभक्ति की आती है
तो एक बात सोच लेना-
उस पार्टी को गलती से भी
वोट मत देना जिसकी जीत का जश्न पाकिस्तानी मनाएं।।
।।वंदे मातरम।।
पांडुरंग थोरात
अर्थतज्ज्ञ भारत सरकार
*___________________________*
======================================
या पोस्टला उत्तर
*पांडुरंग थोरात अर्थतज्ज्ञ भारत सरकार यांच्या नावाने प्राविडंट फंड अनक्ल्मेड खाते, या विषयावरील पोस्टला उत्तर*
पांडुरंग थोरात यांची पोस्ट वाचल्यावर भारतीय अर्थशास्त्रज्ञांची सूची शोधली तेंव्हा त्यांचे नाव काही सापडले नाही. म्हणून हे नाव नकली असावे असे वाटते. तसेच पोस्ट मधील कंटेंट वाचल्यावर यांची डिग्री “एंटायर इकॉनॉमिक सायन्स” मधील असावी तसेच ते ठार अंधभक्त असावेत असे वाटते. त्याची कारणे पुढील प्रमाणे:
१) प्राविडंट फंड अनक्ल्मेड सरकारी खात्यात ५८५०० कोटी रुपये जमा आहेत असे थोरात म्हणतात. ही रक्कम टाइम्स ऑफ इंडिया मधील बातमीनुसार (Rs 40k cr unclaimed amount lying with PF office: PIL | Nagpur News - Times of India (indiatimes.com) खरे तर सुमारे ४०००० कोटी आहे. असो, मुद्दा तो नाही. पण ते म्हणतात “ही रक्कम अगदी सहजपणे चोरांच्या खिशात जात राहिली आणि आम्हाला त्याचा कधी पत्ताही लागला नाही!” आता प्रश्न असा आहे की ती रक्कम जर चोरांच्या खिशात जात राहिली असेल तर ती अजून जमा कशी आहे? ही रक्कम ज्याची आहे त्यालाच कायद्याने मिळत असताना, ती चोराच्या खिशात कशी जाऊ शकते? याचे काही डिटेल्स सुद्धा दिलेले नाहीत. एवढे मोठे अर्थतज्ञ एका छोट्या पोस्टमध्ये एवढी विसंगत विधाने कशी काय करू शकतात?
२) थोरात म्हणतात “मोदींनी सगळीकडे आधार जोडणी करून ह्यांची पुरती नाकाबंदी करून टाकलीय”. परंतु याच आधारला त्यांनी Fraud (Aadhaar flip-flop: When the BJP called it a fraud scheme aimed at legalising illegal immigrants - india news - Hindustan Times ) म्हणून कडाडून विरोध का केला होता, याचे उत्तर थोरात यांनी दिलेले नाही. तसेच ते आता आधारचे श्रेय कोणत्या तोंडाने लाटत आहेत हेही स्पष्ट करावे.
३) ७५ हजार कोटी सबसिडीच्या रूपाने जनतेच्या खात्यात जमा केले असतील तर त्यात नवल ते काय? इकॉनमी डिजिटल नव्हती तेंव्हा सुद्धा सबसिडी रकमा बँक खात्यातच जमा होत असत. आता आधारमुळे नकली खात्यात जाणारे काही कोटी रुपये रोखले गेले असतील, तर त्याचे श्रेय मोदींना का? ते रोखले जावेत म्हणूनच तर आधीच्या सरकारने आधार योजना आणली होती ना? उलट मोदी आणि त्यांचे साथीदार तर आधारलाच fraud समजत होते आणि कडाडून विरोध करत होते ना? आणि हे त्यांचे आधीचे म्हणणे गिळून (म्हणजे थुंकलेले चाटून) वर आधारचे श्रेय स्वतःकडे घ्यायला खरे तर लाज वाटली पाहिजे.
४) थोरात म्हणतात “आम्हीच कपाळ करंटे- मोदींनी अर्थ व्यवस्था खड्यात नेलीय म्हणून जगाला ओरडून सांगतोय”. आता आधारला सर्व काही जोडणे आणि अर्थव्यवस्था खड्ड्यात जाणे याचा काय संबंध? अर्थव्यवस्थेचा विकास झाला की नाही यासाठी जीडीपी, बेरोजगारी, महागाई, चलनाचा विनिमय दर, चलनवाढ, औद्योगिक प्रगति, कृषि प्रगति, आणि अन्य निर्देशांक, निकष वापरले जातात आधार कार्ड नव्हे, हे सामान्य ज्ञान थोरात नावाच्या या तथाकथित अर्थशास्त्रज्ञांना नसेल तर का म्हणून स्वतःला ते अर्थशास्त्रज्ञ म्हणवतात?
५) भारतीय अर्थव्यवस्थेचे जे धिंडवडे निघालेत, जीडीपी अक्षरशः खड्ड्यात गेलाय, कोट्यवधी लोक बेरोजगार झालेत, औद्योगिक उत्पादन थंडावले आहे, रुपया कमजोर झालाय, महागाई वाढते आहे या बाबींकडे वस्तुनिष्ठपणे आणि आर्थिक निकषांच्या माध्यमांतून न पाहता राष्ट्रभक्ती, पाकिस्तानी जीत का जश्न अशा दृष्टिकोनातून जर कोणी असे कुडमुडे अर्थशास्त्रज्ञ तर पहात असतील तर असे लोक देशासाठी धोकादायक आहेत आणि देशाचे खरे शत्रू आहेत. आपल्या घराला लागलेली आग विझवयाच्या ऐवजी पाकिस्तानकडे बोट दाखवणारे आणि आग लागली हे सांगणार्याला तसेच ती विझविण्यासाठी प्रत्यत्न करणार्यांना देशद्रोहि म्हणणारे हे लोकच खरे देशद्रोहि आहेत.
तर या पांडुरंग थोरात आणि त्यांच्या पोस्टचे समर्थन करून देशाला धोका निर्माण करणार्या देशद्रोहि लोकांपासून सावध राहावे.
॥वंदे मातरम॥
*चला उत्तर देऊया टीम*
आजंच एका भक्ताने हि इतकी जुनी पोतेरी परत पोस्ट केली . मी त्यातला खोटेपणा शोधत होतो आणि तुमच्या ब्लॉगवर हे मस्त उत्तर सापडलं. चांगलं काम करताय तूम्ही . Let's keep in touch. My email address is vitthal.patil@gmail.com and @ChessyVith on Twitter.
उत्तर द्याहटवाउतर छान दिलात, अभिनंदन
उत्तर द्याहटवा