मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहिल्या शिक्षिका कोण?

  पुढील अर्थाची एक पोस्ट प्रसारित होत आहे:  *‘भारताला स्त्री शिक्षणाची प्राचीन परंपरा आहे’,*  *‘गंगाबाई पहिल्या शिक्षिका’*   ‘अमेरिकन मराठी मिशन’च्या १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या १८१३ ते १८८१च्या रिपोर्टचा संदर्भ देऊन या पोस्टमध्ये दावा केला आहे की, इंग्रज राजवटीत अनेक शिक्षिका कार्यरत होत्या.  गंगाबाई या इ.स. १८२४ दरम्यान मुलींची शाळा चालवत होत्या. गंगाबाई या मुंबईच्या मूळ रहिवासी होत्या. आगरी कोळी हे मुंबईचे मूळ रहिवासी होत. Native=मूळ रहिवासी, भूमिपुत्र. (म्हणून गंगाबाई या आगरी कोळी होत्या आणि त्या पहिल्या शिक्षिका होत्या असे म्हणायचे असावे!)  अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे काय, संदर्भ सोडून (out of context) कसे लिहावे याचे  वरील पोस्ट हे उदाहरण आहे. तसेच महात्मा फुले आणि सवित्रिमाई फुले यांच्यावरील राग, द्वेष, तिरस्कार  दर्शविण्यासाठी आणि त्यांचे कर्तृत्व कमी लेखण्यासाठी आगरी -कोळी समाजाचे  कार्ड वापरुन  हिंदुत्ववादी जाणीवपूर्वक  किती खालच्या थराला जाऊ शकतात, किती केविलवाणा प्रयत्न करू शकतात  याचेही वरील पोस्ट हे उदाहरण आहे. आता कसे ते पाहूया:  १) ही पोस्ट बनवणार्‍यांना ‘अमेर

ऋषी सुनक यांनी दिवाळी साजरी केली पण...

      ज्या देशाने १५०वर्षे हिंदुस्थानावर राज्य केले. त्याच देशाचा पंतप्रधान आज हिंदू आहे. व हिंदू सणाचा आनंद पतंप्रधान निवासात साजरा करत आहेत.              *हिंदू धर्माची ताकद  आज  जगाला दिसत आहे .यापेक्षा दीपावलीचा आनंद असू शकत नाही.*     तिकडे धर्म-आचरणाचे मुक्त स्वातंत्र्य असल्याने आणि अन्य अल्पसंख्यक धर्मांचा आदर केला जात असल्याने हे शक्य होत आहे. ख्रिस्ती बहुमतात आहेत म्हणून तिथल्या ख्रिस्ती लोकांवर ख्रिस्ती धर्माची जबरदस्ती केली जात नाही. "जय श्रीराम" बोल नाही तर मार खा, असा प्रकार तिकडे नाही.     बसता उठता इथे जसे अल्पसंख्यक धर्मीयांविरुद्ध गरळ ओकले जाते तसे तिथे नाही. म्हणून तिथे हिंदू असल्पसंख्यक व्यक्ति प्रधान मंत्री बनू शकते. मुसलमान देखील बनू शकेल.  आता तिथे हिंदू पंतप्रधान म्हणून 10 डाउनिंग स्ट्रीट या अधिकृत निवासात दिवाळी साजरी केली जात असेल आणि त्यासाठी इथले तथाकथित हिंदू हुरळून जात असतील तर त्यांनी पुढील व्हीडीओ पहावा. यामध्ये हे हिंदू पंतप्रधान चक्क ख्रिसमस ट्रीची लाइट पेटवून ख्रिसमस साजरा करीत आहेत. ( https://www.youtube.com/watch?v=KEln48SuHmE )  तसेच याच

Uniform Civil Code समान नागरी कायदा

मूळ पोस्ट  #UniformCivilCode  समजून घेऊया... समजा एका हिं*दू 40 वर्षीय इसमाने 10 वर्षांच्या बालिकेशी विवाह केला तर तो बालविवाह कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र आहे, कारण ??- हिंदू कोड बिल, हिंदू विवाह कायदा = संविधान . पण,... समजा एका मु$लीम 40 वर्षीय इसमाने 10 वर्षांच्या बालिकेशी विवाह केला तर तो बालविवाह कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र नाही,कारण ?? मु$लीम लॉ बोर्ड,शरीया कायदा ? = No संविधान एकाच गुन्ह्यासाठी, एकाच सेक्युलर देशात दोन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ?? एकाच सेक्युलर देशात एकाच वेळी एक जण संविधान पाळणार आणि दुसरा पाळणार नाही ? ऐसा कैसे चलेगा मियां? हिंदू बालिकेसाठी जो अन्याय आहे तो मु$सलमान बालिकेसाठीपण अन्यायच असला पाहिजे ना ? इथे येतो UCC Uniform Civil Code सगळ्यांना समान कायदा,समान नियम म्हणजेच #UCC #शिवानी गोखले ======== या पोस्टला उत्तर #UniformCivilCode  UCC जरूर हवा पण अफवा आणि दिशाभूल यापासून दूर रहा: उदा. शिवानी गोखले यांची पोस्ट  १) उदाहरण देतांना १० वर्षे असे मुस्लिम मुलीचे वय गृहीत धरून ते लग्न शरियानुसार योग्य गृहीत धरले आहे. हे चूक आहे. शरियानुसार आणि न्यायालयांच्या निर

ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता(?)

 📖 *ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता(?)* 📖 (^m^) (^j^) (मनोगते) सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीने 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.विज्ञान युगाचा अभिमान धरणार्या मंडळींना ज्ञानेश्वरीने विज्ञानावर कशी मात केली आहे हे त्यातील काही ओव्यांवरून लक्षात येईल.अलीकडच्या काही शतकांमध्ये जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्यांचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते. _ही सगळी विधाने दिशाभूल करणारी असून त्यातून अंधभक्तांचे अर्धवट ज्ञानच दिसते. सर्वात पहिली गोष्ट कुठल्याही ओव्याचें संदर्भ क्रमांक दिलेले नाहीत. त्यामुळे त्या ओव्यांबद्दल साशंकतेला वाव राहातो. दुसरे म्हणजे ओव्यांचा अर्थ आपल्याला हवा तसा तोडून मोडून लावलेला दिसतो._ म्हणून खाली अंधभक्तांनी दिलेली मूळ ओवी आणि त्याचा त्यांनी लावलेला अर्थ देऊन नंतर त्याचे आम्ही योग्य स्पष्टीकरण  देत आहोत. 1) "उदय-अस्ताचे प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे

गोदी मीडिया

 *घटना एक बातम्या दोन. दोन्ही व्हिडीओ बघा आणि विचार करा* खोटी बातमी https://youtu.be/t1O4zzde8yU खरी बातमी https://youtu.be/dDTpzwxEYHo
विठ्ठलाचा वारकरी,चालून चालून थकलाय रस्त्याच्याच कडेला पदपथावर झोपलाय पायात नाही चप्पल त्याच्या... हजला मात्र विमान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत बैलपोळा झाला, बैलाची तब्येत मस्त आहे वसुबारसेला सवत्स धेनु , धन्यासवे स्वस्थ आहे एका सणात मात्र तिची... सुऱ्याखाली मान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाऊस यंदा चांगला झाला ,हिरवगार गवत आहे बाळुमामांची मेंढरं ,जिकडे तिकडे चरत आहेत बकरी ईदला मात्र त्यांचा ... कसाया हाती कान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाच वेळा नमाज पडून मुल्ला देतो आहे बांग चार पत्नी मिळून त्याच्या ,मुलांची लावत आहेत रांग आयुष्यभर त्यांच्या नशिबी... बाळंतपणाची घाण आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत शबरीमलात रजस्वलांना ,घुसवण्यास सर्व आतूर आहेत मशीदबंदीवर ''तिच्या" मात्र , गप्प सारे फितूर आहे रणरणणाऱ्या उन्हामध्ये ... काळ्या बुरख्यात जनान आहे कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत फटाके मुक्त दिवाळी, न्यायदेवतेचा आदेश आहे परंपरांची लाज बाळगा, कारण आपलाच स्वदेश आहे डिसेंबरच्या रात्री मा

रक्षाबंधनाचा मुहूर्त??

 रक्षाबंधनाचा मुहूर्त??          अगदी गेल्यावर्षापर्यत रक्षाबंधनासाठीही मुहूर्त असतो हे माहित नव्हते, गेल्यावर्षी कुजबूज होती. यावर्षी आवाज वाढलाय, याबाबतीत आपली प्रगती पाहता पुढीलवर्षी पेपरमध्ये /कॕलेंडरवर याची नोंद येवू शकते. एवढा बिनडोकपणा येतो कुठून?  काही दिवसांपूर्वी चांद्रयान 3चे कौतुकसोहळे करणारे आज रक्षाबंधनाचा मुहूर्त शोधत आहेत, असं असेल तर अशी हजारो चांद्रयान सोडली तरी आपण तिथेच राहणार आहोत. अशा गोष्टीमागे नक्की लॅाजीक काय? असं विचारलं तर "असेल कायतरी...आपला एवढा अभ्यास नाही, कशाला उगा रिस्क घ्या, उगाचच एवढी लोकं सांगतात का?" "असेल कायतरी" या वाक्याने आपण कितीतरी अंधश्रद्धा अगोदरच बळकट केल्या आहेत आणि त्याच कारणाने कितीतरी अंधश्रद्धा  नव्याने जन्माला घालत आहोत. विज्ञानाने अज्ञानाचा अंधःकार दूर होण्याऐवजी आपण त्यातच अडकत चाललो आहोत. इतिहास, विज्ञानाचा फार मोठा अभ्यास करण्याची गरज नाही. प्राथमिक शाळेतील सामान्य विज्ञान आणि चौकस बुद्धीतून साधेसाधे प्रश्नआठवून बघा कि. या आधी कधी रक्षाबंधनसाठी मुहूर्त शोधले होते का? इतरांचे सोडा आपल्या लहापणाचं आठवून बघा असे क

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

 *राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत.* _राजीव दीक्षित यांच्या आवाजात व्हायरल होत असलेल्या  व्हिडीओबाबतची सत्यता_ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्याच्या अवघ्या नऊच दिवसांत राजीव दीक्षित यांच्या आवाजातील जवळपास साडेतीन तासांचा एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड झाला. ते ऑडिओ स्वरूपातील भाषण आहे. त्याला अगदी व्यवस्थित एडिट करून, ॲनिमेशन समाविष्ट करून हा व्हिडीओ युट्युबवर अपलोड केलेला आहे. (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूची ते वाटच पाहत होते का?) त्यापूर्वी कुणालाही माहीत नसलेला व्हिडिओ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतरच युट्युबला अपलोड झाला, यालाही एक कारण आहे. व्हिडिओ पाहताना पहिल्या काही मिनिटांत हे कारण उघड होते. ते कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये असलेली  धादांत खोटी विधाने. त्या खोट्या विधानांना उत्तर देऊ शकणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात नसल्याचा फायदा घेण्यासाठीच जणू हा व्हिडिओ त्यांच्या मृत्यूनंतर युट्युबवर अपलोड केला असावा. खरे तर त्याचवेळी काही अंनिस कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आली होती. परंतु विरोधकांना उत्तरे देण्यात वेळ न घालवता कामावर लक्ष केंद्रित करणे
 (१) एकाही नदीला शबनम, शबाना, रुखसाना असे नाव नाही, कारण गंगा यमुना नर्मदा सारख्या अनेक नद्या अनादी काळापासून आहेत.  (२) अब्दुल, सलीम चे नाव  एकाही पर्वताला देता आले नाही, कारण हिमालय, निलगिरी असे अनेक पर्वत अनादी काळापासून आहेत.  (4) पींपळ वड,लिब सारख्या अनेक झाडांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?  (५) तुळशी, अर्जुन ,पळस अशा अनेक वनस्पतींची नावे उर्दूमध्ये का नाहीत?  (६) आयुर्वेदाची औषधी प्रत्येकाला लागते, पण हे वेद नाव उर्दूमध्ये का नाही?  (७) रहीम, अकबर हे नाव एकाही महासागराला  देऊ शकले नाहीत, कारण प्रशांत, हिंदी महासागर सारखे अनेक महासागर अनादी काळापासून आहेत.  (8) चार दिशांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?  (9) नेमक्या औषधाला रामबाण उपाय का म्हणतात, अल्लाबाण, येशूबाण का नाही?  कारण :-  मुघलांनी केवळ मंदिरे पाडून मशिदींची, गावांची आणि शहरांची नावे बदलली आहेत.  नद्या, पर्वत, समुद्र यांची नावे अजूनही चिरंतन आहेत.  हे शाश्वत सत्य आहे... यालाच म्हणतात सनातन...🚩🕉🙏🏻 ।। जय श्रीराम ।। ।। जय हिंदुराष्ट्र ।। ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ उर्दू भाषेत नदी, पर्वत झाडे इत्यादींना नावे नाहीत म्हणून हिणवणार्‍या पोस्टला