*“डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे?* *या पोस्टला उत्तर:* देव किंवा भगवंत किंवा गॉड किंवा अल्ला यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, कोणत्या देवावर ठेवावा, की विश्वास ठेऊच नये *हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.* कारण, श्रद्धेचा, विश्वासाचा (Faith) अधिकार संविधांनानेच आपल्याला दिला आहे. परंतु वरील पोस्ट प्रमाणे श्रद्धा ‘लादण्याचा’ प्रयत्न, तो ही अत्यंत चुकीच्या, अतार्किक, अवैज्ञानिक गृहितकांवर, केल्यास त्याची चिकित्सा होणे क्रमप्राप्त ठरते. त्यानुसार पुढीलप्रमाणे विश्लेषण करीत आहे. 1) मुळात व्हायरस आणि भगवंत/देव यांची तुलना करणे अत्यंत हास्यास्पद आहे. कोणीही समजदार भक्त देवाला व्हायरसच्या रांगेत बसवणार नाही. 2) व्हायरस डोळ्याला दिसत नसला तरी सूक्ष्मदर्शकातून दिसू शकतो. म्हणजेच त्याचे फिजिकल अस्तित्व सिद्ध झालेले आहे. त्यामुळे व्हायरस असणे/नसणे हा मुद्दा विज्ञानाने सप्रमाण सिद्धा केलेला आहे. 3) देवाचे अस्तित्व ज्ञानेंद्रिये किंवा वैज्ञानिक साधनांनी
खोट्या, दिशाभूल करणाऱ्या, अवैज्ञानिक पोस्ट्सना उत्तरे देणारा ब्लॉग