पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुसर्‍यांच्या अपप्रचारामुळे आपल्याच धर्मावर प्रश्न उभे?

इमेज
  मुस्लिम: उर्दू येते आणि कुराण वाचतात इसाई: इंग्रजी येते आणि बायबल वाचतात हिंदू: ना संस्कृत येते ना वेदांबद्दल माहिती  फक्त दुसर्‍यांच्या अपप्रचारामुळे आपल्याच धर्मावर प्रश्न उभे करतात. कटू आहे पण सत्य आहे. *मुस्लिम:*  मुळात कुराण हे उर्दू भाषेत नव्हे तर जुन्या *अरेबिक* भाषेत लिहिले गेले आहे, *उर्दूत नव्हे.* ते उर्दूत (आणि जगातील विविध भाषांमध्ये, आता अगदी मराठीत सुद्धा उपलब्ध आहे) अनुवादीत केलेले असू शकते. आणि हा त्यांचा एकमात्र पवित्र ग्रंथ आहे.   *इसाई:*  बायबल हे मुळात *हिब्रू, अर्माईक आणि ग्रीक* भाषेत लिहिले गेले आहे, *इंग्रजीत नव्हे.* ते नंतर जगभरातील विविध भाषांमध्ये अनुवादीत केले गेले (मराठीत सुद्धा उपलब्ध आहे). इसाई किंवा ख्रिस्ती लोकांसाठी बायबल हा एकमात्र ग्रंथ आहे.  *हिंदू:*  १)वेद हे *संस्कृत भाषेत* आहेत. भारतात सुमारे १२१ भाषा (२२ अधिकृत भाषा धरून) आहेत तसेच २७० मायबोली आहेत. त्या भाषांमध्ये वेद कधीही उपलब्ध नव्हते.    २) संस्कृत भाषा ही फक्त ब्राह्मण जातीची, फक्त अध्ययन-अध्यापनाची भाषा होती. त्यांची बोली भाषा नव्हती. त्या भाषेला देववाणी असेही  म्हणतात. भारत देशाची सामान

समजून घ्यायचे असेल तर...

समजून घ्यायचे असेल तर... जेट जगदीश  आम्ही जेव्हा देवाधर्मातील कर्मकांड, अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी-परंपरा,नास्तिक्य तसेच धर्मसुधारणेच्या बाबत आमचे विचार मांडतो तेव्हा अनेकदा अंधभक्त हा प्रश्न विचारतात की, 'तुम्ही तुमच्या घरातल्या किती लोकांचे विचार बदलले आहेत, किती लोकांना नास्तिक केले आहे?' वरवर पाहता हा प्रश्न अगदी बिनतोड वाटतो, पण विचार केल्यावर त्यातील फोलपणा सिद्ध होतो. कसा तो खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल... यासंदर्भात मला ल. रा. पागारकरांना सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकरांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. आगरकर हे पांगारकरांचे शिक्षक होते. एक दिवशी वर्गात पांगारकरांनी आगरकरांना प्रश्न विचारला, "सर तुम्हाला एक प्रश्न विचारू काय?"  आगरकर म्हणाले, "विचार की, त्यात परवानगीची काय गरज?"  पांगारकर म्हणाले, "काल श्रीमती आगरकरांना मी देवळात नाकदुऱ्या काढताना पाहिले."  आगरकर म्हणाले, "मग?"  पांगारकर म्हणाले, "नाही, पण सर तुम्ही देव मानत नाही ना."  त्यावर आगरकर म्हणाले, "अरे मी म्हणजे माझी बायको नाही ना." (म्हणजे तिला तिचे स्वात

तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की खून?

तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की खून?(^m^)(^j^)(मनोगते)                जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंग व किर्तनातून समाजाची जनजागृती करायचे. त्यांनी पुराणातील खोट्या कर्मकांडावर प्रचंड प्रमाणात टिका केली. अनिष्ट चालीरीती रुढी परंपरेला विरोध केला. अंधश्रद्धा निर्मूलन केले. तुकाराम महाराजांच्या किर्तनातून गावोगावी सुधारणा होऊ लागली. वर्णभेद, जातीभेद कमी होऊ लागला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या किर्तनातुन नुसते जन जागृतीच करत नव्हते तर ते आपल्या किर्तनातून तयार झालेल्या युवकांना स्वराज्यासाठी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती करत होते. शिवाजी महाराजांचे मावळे घडवत होते. त्यांना आर्थिक मदत पुरवत होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात गुरु-शिष्याचे नाते तयार झाले होते. त्यामुळे भटांचे मनुवाद्यांचे लोकमनातील वर्चस्व कमी होत चालले होते. लोक अंधश्रद्धेतून बाहेर पडू लागले होती. या गोष्टीचा भटांना जास्तच त्रास झाला. परिणामी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज भटांना नकोसे वाटू लागले. म्हणून त्यांनी धुळवडीच्या खेळाचा गैरफायदा घेतला. रामेश्वर भ