पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोमनाथ मंदिर

*सोमनाथ मंदिर ते उत्तर ध्रुव या सरळ रेषेत एकही भूभाग येत नाही व म्हणून आपले पूर्वज किती ज्ञानी होते अशा अर्थाची पोस्ट फिरते आहे त्यास हे उत्तर.* हिंदुत्वाचा उदो उदो करतांना व आपले जुने ते सर्व काही विज्ञानच आहे हे सिद्ध करण्यासाठी खोटेपणाचा किती आधार घेतला जातो व आपल्याच धर्मबांधवांना किती मूर्ख समजले जाते याची हे पोस्ट म्हणजे ढळढळीत उदाहरण आहे. अशी पोस्ट लिहिणारे तथाकथित हिंदुत्ववादी जर हिंदुत्वाची धुरा खांद्यावर वाहत असतील तर हिंदू धर्माची वाट लावायला ते स्वतःच समर्थ आहेत. कुठल्या शत्रूची गरज नाही. आता हे कसे ते पाहू या. *1) सोमनाथ मंदिर हे हिंदूंचे पवित्र, पूज्य स्थळ आहे व ज्योतिर्लिंग आहे या बद्दल दुमत नसावे. हा श्रद्धेचा विषय आहे.* *2) सोमनाथ मंदिर किती वेळा लुटले गेले तरी ते दर वेळी तश्याच वैभवाने उभे राहत होते अशी सुरुवात या पोस्ट मध्ये केली आहे. याचा लेखकाला अभिमान वाटतोय काय? प्रत्येक वेळेस हे वैभव मंदिरात कुठून येत होते? हे वैभव तिथे आहे हे शत्रूला कसे कळत होते? ते लुटतांना देवाच्या कोपाने शत्रूचे हात पाय झडून का नाही गेले? इथले शासनकर्ते ही लूट होतांना झोपा काढत होत