खडे टाकणारा देव

इंजिनिअर व मजूर

आपल्या देशातील जवळपास 99 टक्के देवभक्तांचा व देवाला गुंड ठरवून त्याचा अपमान करणारी ही वरील पोस्ट तर्कदुष्ट सुद्धा आहे. कारण :

1) यात इंजिनियरला ‘देव’ व मजुराला देवाकडे लक्ष न देणारा ‘भक्त’ असे कल्पिले आहे. ही कल्पनाच मुळात तर्कदुष्ट व गैरलागू आहे. इथे इंजिनियरला मजुराकडून काही काम करून घेण्यासाठी त्याचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. खरे तर अशा ठिकाणी एक घंटा लावलेली असतांना (जिचा दोर किंवा बटन वरती असते व त्याची गरज नेहमी भासते) ती वाजवायचे सोडून नाणी व नंतर खडा फेकणारा इंजिनियररूपी ‘देव’ मूर्ख व बिनडोक वाटतो. त्याने आधीच खडा फेकायचा होता ना! इथे मजूर शहाणा वाटतो. कारण लक्ष वेधून घेण्यासाठी कोणी पैसे फेकत नाही हे ज्ञान त्याला आहे व म्हणून तो पैसे उचलतो व खडा पडल्यावर लक्ष देतो.
2) देवाला सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, दयाळू, ‘चोच दिली आहे तर चारा देणारा’, वगैरे मानले जाते. परंतु, आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी देव, माणसाच्या आयुष्यात संकटाचा खडा टाकतो असे पोस्ट मध्ये लिहलेले आहे. असे असेल तर, ‘माझ्याकडे लक्ष दे, नाहीतर घालतोच तुला संकटात!’ अशी प्रवृत्ती असलेला देव म्हणजे ‘मला खंडणी दे नाहीतर घालतोच तुला गोळ्या’ अशी धमकी देणार्‍या गुंडासारखा दहशतवादीच ठरत नाही का? *का त्या प्रेमळ देवाला आपण इतक्या खालच्या पातळीवर आणुन ठेवतो?*
3) देशातील सुमारे 99 टक्के लोकांच्या घरात देव्हारा असतो व तिथे देवाची पूजा रोज केली जाते. शिवाय देशातील लाखो देवळांना रोज करोडो लोक भेट देऊन देवाची पुजा करतात व दान देऊन प्रचंड धन देवळांना देतात. या लोकांत नोकरी करणारे, धंदा करणारे, व्यावसायिक, बेरोजगार, गरीब, भिकारी, रुग्ण, वगैरे सर्व प्रकारचे लोक असतात. अशा सर्व लोकांवर अविश्वास दाखवून त्यांना अवमानित करणारी व त्यांच्यावरील देवाची दहशत वाढविणारी ही पोस्ट आहे. सरकारच्या धोरणांमुळे आज देशात करोडो लोक बेरोजगार आहेत, ते जवळपास सगळे देव’भक्त’ आहेत. मग त्यांना नोकरी का मिळत नाही? रोजगाराच्या संधीच उपलब्ध नसतील तर कितीही पुजा केली तरी देव नोकरी कोठून आणून देईल? प्रमोशन मध्ये दोनच जागा असल्यास त्यासाठी पाचशे लायक देवभक्त लोक स्पर्धा करत असतील तर प्रमोशन दोघांनाच मिळेल ना? बाकीच्या 498 भक्तांना (देवाची पुजा करून सुद्धा) प्रमोशन मिळत नाही, ही त्यांची फसवणूक नाही काय? तीर्थयात्रेला जाणारे अनेक भक्त लोक अपघातात मरतात, जखमी होतात, अपंग होतात ते कसे? जास्तीत जास्त नास्तिक लोकसंख्या असलेल्या देशातील लोक जास्त सुखी कसे? 

 सुंदर संदेश च्या नावाखाली पाठवलेला *'तो'* बकवास संदेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य