प्रल्हाद जानी

पंचाहत्तर वर्षे अन्नपाणी न घेणाऱ्या आजही जीवित असलेल्या साक्षात्कारी महात्म्याची सत्यकथा

श्री प्रल्हाद जानी उर्फ माताजी, एक योगी सत्पुरुष. राहणार अहमदाबाद. सध्याचे वय ८६ वर्षे. माउंट अबू आणि गिरनार येथे वयाच्या अकराव्या वर्षी त्यांना अंबामातेचा साक्षात्कार झाला आणि तेंव्हापासून अन्न पाणी यांचा संबंध कायमचा सुटला. मागील पंचाहत्तर वर्षे... होय, पंचाहत्तर वर्षे अन्नग्रहण नाही, पंचाहत्तर वर्षे पाणी सुद्धा पिले नाही. त्यामुळे मलमूत्र विसर्जनही नाही. तरीसुद्धा प्रकृती तुमच्या आमच्या सारखीच ठणठणीत.

श्री प्रल्हाद जानी आजही आधुनिक विज्ञानासाठी एक चालते बोलते रहस्य बनले आहेत. या सर्व तपासण्यांमध्ये श्री प्रल्हाद जानी यांनी बिनशर्त सहकार्य केले आहे. ते सहजपणे सांगतात की साक्षात्कारामुळे सूर्यप्रकाशापासून उर्जा निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झाली आहे. यात काही विशेष नसून वनस्पती सुद्धा याच पद्धतीने आपले अन्न मिळवतात. त्यामुळे मला बाहेरून अन्न-पाणी घ्यावे लागत नाही. पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेता त्यांच्या मुत्रापिंडामध्ये लघवी तयार होते आणि ती परत शरीरामध्ये शोषली जात असल्याचे विलक्षण अदभूत निदान वैद्यकीय तपासण्यांमध्ये झाले. आधुनिक विज्ञानासाठी हे मोठे अद्याप न सुटलेले कोडे आहे. मानवी शरीराच्या क्षमतांना आव्हान देणाऱ्या या रहस्याची उकल करण्याचा विडा पाश्चात्यांनी उचलला आहे, ते त्यांच्या पद्धतीने सत्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाची जागतिक व्याप्ती किती मोठी आहे हे जाणून घ्यायचे असेल तर गुगल वर फक्त Prahlad Jani अशी सर्च देऊन येणारे रिझल्ट पहा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
याला उत्तर

ही पोस्ट लिहणाऱ्या माणसाला साधा कॉमन सेन्स सुद्धा नाही. त्याला या फ्रॉड बाबावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवावा. त्यासाठी पुरोगामी किंवा अंधश्रद्धाविरोधकांना निराधारपणे ठोकायचे काय कारण?
हा बाबा फ्रॉड कसा आहे हे कुणीही साधारण कुवतीचा माणूस ओळखू शकेल. त्या विरुद्ध पुरोगाम्यांनी आवाज उठवला होता. पण ते सर्व या पोस्ट मध्ये दिलेले नाही.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वाचावी व मग बोलावे.

http://skepdic.com/skeptimedia/skeptimedia90.html

ह्या लिंक मध्ये त्या माणसाचा फ्रॉड उघडा केलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?