लग्नात ‘फक्त’ तांदूळ वापरतात हे साफ खोटे आहे. मराठवाड्यात ज्वारी वापरतात, तांदूळ नव्हे.
अक्षता हा शब्द अ आणि क्षत या पासून बनलेला आहे. लग्नात एकदल पदार्थ वापरतात. द्विदल (चणे, तूर, मूग, उडीद, मसूर, मटकी, हुलगे) पदार्थांचे आत दोन तुकडे (म्हणजे डाळ, दल) असतात म्हणजे ते क्षत असतात (म्हणजे मूग क्षत होऊन त्याची डाळ बनते), म्हणून ते वापरत नाहीत. तांदूळ ज्वारी हे अ क्षत या प्रकारात मोडतात.
हा आतून कीडीचा शोध कुणी लावला? कुठलाही किडा किंवा जीव बाहेरूनच आत शिरतो ना?
तांदूळाचे रोप दुसरीकडे लावतात हे खरे. पण ज्वारीचे तसे अजिबात नाही. मग मराठवड्यातील लग्नाचे काय?
आणि ‘समजा’ तांदूळ आतून किडतो आणि एकीकडे पेरून दुसरीकडे वाढवला जातो, मग त्याचा नवरा नवरी किंवा त्यांचे नातेवाईक यांच्यावर शारीरिक, मानसिक असा काय परिणाम होणार? आणि किती जणांनी टाकलेले हे तांदूळ उर्फ अक्षता वर वधू दोघांपर्यंत पोहोचतात.
गेल्या चार पाच वर्षांपासून एका विशिष्ट प्रवृत्तीच्या बुद्धीला नुसता बहर आलाय. त्यातून अशा काही भन्नाट आयडिया प्रसवल्या आहेत. त्यातीलच ही एक.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य