डॉ. मांडके यांच्याबाबत पसरत असलेली पोस्ट

दिशाभूल करणारे लोक सतत नवनवीन खोट्या पोस्ट तयार करून पसरवत आहेत. तशीच एक पोस्ट डॉ. मांडके यांच्याबाबत पसरवली जात आहे. पहिल्यांदा ती मूळ पोस्ट वाचा आणि नंतर त्यातील खोटेपणा उघड करणारी पोस्ट वाचा.

मूळ पोस्ट
*🔆 ज्यांचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा ...🔆*

भारतातील प्रख्यात *हार्ट - स्पेशालिस्ट डाॅ. मांडके* आज खूप आनंदात होते.

त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता.

त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते *विमानाने*  दिल्लीला जायला निघाले होते.

ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले.

*डाॅ. मांडके* विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात....

इतक्यात ....

अचानक ...विमानाचे *आपातकालीन लँडींग* करण्यात आले.

*डाॅ. मांडके* समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले...

विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे.

त्यामुळे डाॅक्टरांनी *एक कार*  भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.

जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता.

त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता.

पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले....

प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता ..इतक्यात ..वातावरण अचानक बदलले आणि खूप *जोराचा पाऊस* सुरु झाला..

रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते.
बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते *रस्ता चुकले* आहेत...

पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने *आसरा* शोधून थांबावेच लागणार होते...

सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे *कौलारु घर* दिसले.

कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा *दरवाजा ठोठावला.*

एका *तरुण स्त्रीने* दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले.

तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या.

त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी *चहा आणि काही बिस्किट आणले.*

जरा वेळाने ती म्हणाली ..

माझी *प्रार्थनेची वेळ* झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का?

डाॅक्टरांचा फक्त *कर्मयोगावर* विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला!

ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या *मुर्तिसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली*...

प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा *पाळणा* हलवत होती.

डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते!

काही वेळाने तिची *प्रार्थना संपली.* ...

डाॅ. नी तिला विचारले ...

या सगळ्यांचा तुम्हाला *काही उपयोग झाला का कधी?*

देवाने कधी तुमची *हाक ऎकली आहे का?*

आणि तुम्ही तो *छोटासा पाळणा का हलवत होतात?*

....

त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली...

खोल आवाजात ती म्हणाली ...

*माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे*..
मुंबईतील प्रख्यात *डाॅ. मांडके* सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ *पुरेसे पैसे नाहीत..*

*मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल*..."

...

*पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली*...

*डाॅ. मांडके*अगदी स्तब्ध झाले ...
काय बोलावे ते कळेनाच त्यांना ...

*त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला*.

कोणतेच लक्षण नसताना *हवामान खराब* होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही....

गाडीने जाताना पावसाने *रस्ता चुकला ...*

याच घरात *आसरा घ्यावा लागला* ...

आणि ...आता त्या स्त्रीने सांगितलेली *वस्तुस्थिती*....

...

काय अद्भूत् .. *चमत्कारच* जसा ..

काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची *ओळख सांगितली* आणि वातावरण ठीक झाल्यावर *तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले ...!*

...

*सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी ....*

*देवावरची अपार निष्ठा !*

...

*कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना..!!*

*या जगात कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही, प्रत्येक धर्मात वेग वेगळी तत्व सांगितली आहेत,पण *देव आहे एवढे मात्र नक्की*......!!!!
🙏🙏☺

या पोस्टला उत्तर

एका इंगजी "कहाणी" मध्ये मूळ माणसाचे नाव व ठिकाण बदलून त्या जागी डॉ मांडके यांचे नाव व भारतीय पार्श्वभूमी घुसडून बनवलेली ही काल्पनिक भिक्कार स्टोरी आहे.

शिवाय, या कहाणीवर बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात.
1) डॉ मांडके संशोधक नव्हते हार्ट स्पेशलिस्ट होते. हजारो हार्ट शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. शोधनिबंधात नव्हे तर सतत हार्ट सर्जऱ्या करून लोकांना जीवन देण्यात ते मग्न असत.
2) त्यांनी कसला शोध निबंध लिहाला त्याचा रेकॉर्ड कुठेही सापडत नाही. तसेच त्यांना "प्रतिष्ठे"चा कोणता पुरस्कार जाहीर झाला त्याचे नावही सांगितलेले नाही.
3) मुंबईहून निघालेल्या विमानाची इमर्जनसि लॅंडींग कुठल्या विमान तळावर झाली (जे सहा तासाच्या ड्रायविंग अंतरावर होते) ते लिहले नाही.
4) पुढील विमान 10 तासांनी होते व ड्रायविंग करून तिथे जायला 6 तास लागणार होते. त्यात ट्रॅफिक जॅम लागले तर विचारूच नका. म्हणजे त्यांचे सुमारे 4 किंवा कमीच तास वाचणार होते. व तेवढ्यानेच त्यांचा समारंभ लाभणार होता.
6) मुंबई ते दिल्ली या हवाई रेषेत येणारे विमानतळ छोट्या किंवा मध्यम शहरात आहेत. तिथून सहा तासांवर दूर अंतरावर स्वतः चालवत नेण्यासाठी भाड्याने कार मिळण्याची सोय (त्या काळात तरी) असेल असे वाटत नाही. कारण ती कार परत कोण आणणार? पण स्टोरी इंग्रजी लिखाणातून चोरलेली असल्याने हे अपरिहार्य आहे.
7)  सहा तास गाडी चालवणे, ते ही एका "दमलेल्या" डॉक्टर ने, हे खायचे काम नाही. पण पुरस्काराची ओढ!!!
8) त्या प्रवासात धुक्यामुळे महामार्ग सोडून चुकीने ते आडराणातल्या रस्तावर गेले! व्वा!! आडरानात  आगापिछा नसलेले  "एक" लहानसे कौलारू घर दिसले. त्या एक घरात एक तरुणी आणि एक बाळ काय करत होते? तिला नवरा होता की नव्हता? तो कुठे होता? हे विचारायचे नाही! कारण इंग्रजी स्टोरी चे भाषांतर!
9) भारतातील अशा आडरानातील कौलारू घरात थोडेसेच समान बसणार व महागडे सामान नसणारच. परंतु कहाणीचे केवळ नाव बदलून आंधळेपणाने भाषांतर केल्याने असे झाले असावे.
10) अशा आडरानात तिने चहा, बिस्किटे, दूध कोठून आणले असावेत बरे?
11) त्या तरुणीला डॉ मांडके यांची माहिती कुणी दिली? मांडके यांच्या आधी अशा शस्त्रक्रिया होतच नव्हत्या का?
12) त्या वेळेस अनेक गरीब हार्ट पेशंट दूरवरच्या परदेशात असतीलच. त्यांनाही मांडके यांचे नाव माहीत असेलच. जर त्यांनी प्रार्थना केली असती तर पंचाईतच झाली असती. मांडके यांना अनेक शोध निबंध लिहावे लागले असते. त्यांच्या विमानाचे वारंवार इमारजनसी लॅंडींग, नंतर भाड्याने कार घेऊन चालवणे हे सर्व करतांना देवाची व मांडके यांची किती तारांबळ उडाली असती.
13) डॉ मांडके यांच्यासारखा हार्ट क्षेत्रातील महान डॉक्टर हार्ट अटॅकनेच खूप लवकर गेला. खरे तर देवाने त्यांना अजून खूप काळ जिवंत ठेवायला हवे होते.
14) आपल्या मुलाला जीवनदान मिळावे म्हणून ज्या देवाची ती तरुणी प्रार्थना करत होती त्याच देवाने त्या मुलाला जन्मतःच हृदयरोग का बरे दिला असावा? हा साधा विचार ती तरुणी व डाक्टर यांच्या डोक्यात का बरे आला नाही?
15) ज्या पुरस्काराच्या समारंभाला जाण्यासाठी मांडके यांनी एवढी धडपड केली तो मात्र तसाच राहिला.
16) ही कहाणी या लेखकाला मांडके यांनी कधी सांगितली?

शेवटी काय, आपल्या कडे बिनडोकपणे लिहणारे कमी नाहीत व मेंदू लॉकर मध्ये सुरक्षित ठेऊन वाचणारे तर करोडो आहेत. म्हणून असले लिखाण चालते.
आपापली श्रद्धा पाळायचे सोडून अश्रद्ध लोकांना श्रद्धाळू "बनविण्याचे" असे लटके प्रयत्न करतांना बिचारे श्रद्धाळू अक्षरशः तोंडघशी पडताहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?