पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नास्तिकता म्हणजे वैफल्य नव्हे आणि श्रद्धा म्हणजे विवेकवाद नव्हे!

*नास्तिकता म्हणजे वैफल्य नव्हे आणि श्रद्धा म्हणजे विवेकवाद नव्हे! –जगदीश काबरे* अंनिसने रोजगाराच्या किती संधी निर्माण केल्या? नास्तिक माणसे आयुष्याच्या उत्तरार्धात वैफल्यग्रस्त असतात की नाही? त्यांनी आरोग्यासाठी काय केले? शिक्षणासाठी एकाग्रतेचे कोणते कार्य केले? आणि भ्रष्टाचार नियंत्रणासाठी काय चिंतन केले? असे प्रश्न विचारण्यापूर्वी नास्तिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा नेमका अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. नास्तिकता ही रोजगार निर्माण करण्याची संस्था नाही आणि प्रत्येक सामाजिक संस्थेचे मूल्यमापन तिने किती नोकऱ्या निर्माण केल्या, या एकाच निकषावर करता येत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, विवेकनिष्ठ विचार, सामाजिक प्रबोधन आणि संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्याचा प्रसार ही स्वतंत्र सामाजिक कार्यक्षेत्रे आहेत. या कामांचे मूल्यमापन त्यांच्या प्रत्यक्ष योगदानावर करावे, पूर्वग्रहांवर नव्हे.  बहुतांश नास्तिक आयुष्याच्या उत्तरार्धात वैफल्यग्रस्त असतात, हा दावा कोणत्या संशोधनाच्या आधारे केला आहे? नास्तिकांच्या मानसिक आरोग्याविषयी असा सार्वत्रिक निष्कर्ष काढण्यास...

फिंगरप्रिंट्स दैवी नाही तर वैज्ञानिकच

*फिंगरप्रिंट्स दैवी नाही तर वैज्ञानिकच –जगदीश काबरे* खरं सांगायचं तर *फिंगरप्रिंट्स दैवी आहेत* अशी भलामण करणारे विचार “थक्क करणारे तथ्य” या नावाखाली इतक्या आत्मविश्वासाने पसरवले जातात की सामान्य वाचक क्षणभर गोंधळतो. कारण त्या विचारांमध्ये सत्यापलाप करत काही अर्धसत्य वैज्ञानिक निरीक्षणे, काही शब्दांची जादू (DNA, रेडिओ वेव्ह्ज, बायोलॉजिकल मेमरी, सेलुलर इंटेलिजन्स) आणि शेवटी धार्मिक निष्कर्ष असा एक “भावनिक-सायंटिफिक” मसाला मिसळलेला असतो. पण विज्ञान हे भावनेवर नाही, पुराव्यावर चालते. फिंगरप्रिंट्स म्हणजे बोटांच्या त्वचेवरील रेषा हा एक जैविक विकासाचा (biological development) भाग आहे; त्यातून देव, आत्मा, कर्मकथा किंवा दैवी स्क्रिप्ट सिद्ध करणे म्हणजे वैज्ञानिक प्रक्रियेचा गैरवापर करून धार्मिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच ’फिंगरप्रिंट्स दैवी' म्हणत प्रसूत केलेल्या प्रत्येक मुद्द्यांचे चिकित्सक खंडन करणे गरजेचे आहे. १) दावा : मानवाच्या बोटांच्या रेषा गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून तयार होऊ लागतात. त्या वेळी मूल बाह्य जगापासून खूप दूर असते, तरीसुद्धा त्याची ओळख देणारी ...