पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?

इमेज
हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का? १) *लग्नात मांडव कशासाठी ???* = मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!! २) *विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???* = माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !!! ३) *नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???* =माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !!!+++ ४) *मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???* = मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !!! ५) *लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???* = प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही  हे सांगण्यासाठी !!! ६) *लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी???* = तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !!!+++ ७) *लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???* = तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची ला...

गायत्री मंत्रात किती सामर्थ्य आहे?

 "गायत्री मंत्र हा जगातला एकमेव पाॅवरफुल मंत्र आहे असे डॉ. हाॅवर्ड स्टेनरेजिल यांनी जाहीर केले आहे...त्यांनी जगातील सर्व मंत्र गोळा केले असून त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत चाचणी घेतली आहे... त्यांना असे आढळले की फक्त गायत्री मंत्र हाच एकमेव सर्वोच्च शक्तिशाली  मंत्र आहे... हिंदूंचा हा मंत्र एका सेकंदात एक लाख दहा हजार ध्वनी लहरी निर्माण करतो असे त्यांना आढळले.... एवढ्या प्रचंड ध्वनी लहरींमुळे व तरंगलांबी मुळे अध्यात्मिक क्षमता प्रचंड वाढते....गायत्री मंत्राचे शारीरिक व मानसिक फायदे खूप आहेत... अमेरिकेतील एका राज्यात व हॉलंड मध्ये रेडिओ स्टेशन वरून रोज गायत्री मंत्र म्हटले जातात..."  अशा आशयाची पोस्ट फिरत असते...!!  वास्तवात जगातील कोणत्याही धर्माच्या वा संस्कृतीच्या मंत्रांमध्ये कोणतेही सामर्थ्य नसते.  कारण मंत्र-तंत्राने जर रोग बरे झाले असते व समाज सुखी झाला असता तर, राजकारण अस्तित्वात आले नसते आणि शासन यंत्रणा निर्माण करण्याची गरजच उरली नसती !  मग वरील पोस्टमध्ये जे दावे करण्यात आलेले आहेत त्यात तथ्य किती आहे याचा धांडोळा आपण घेऊ या...  गायत्री मंत्र...

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

इमेज
चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..!   म्हणून  गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...! 🤔 मित्रांनो, शिवजयंती बंद पडणारे व गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक. यांनी गणपती बसविला. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली. दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून वाजत गाजत मिरवणुक निघाली. त्यात दर्शन खुले होते.           एका चर्मकाराने (चांभार) गणपती जवळ जाऊन चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले..! मिरवणुकीतील सर्व ब्राम्हणांनी एकच बोभाटा केला... गणपती बाटला, गणपति बाटला म्हणून टिळकांवर खेकसायाला लागले. "हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर हे असे होते. धर्म बुडाला, चांभाराने धर्म बुडविला..!"   तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती. टिळक म्हणाले - "ओरडू नका. धर्म कशाला बुडू द्यायचा. त्यापेक्षा  आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू  (म्हणजे पाण्यात फेकून बुडवून टाकू...) अश्याप्रकारे तो चांभाराच्या स्पर्शाने बाटलेला गणपती बुडवला गेला आणि तेंव्हापासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली! ✍🏻 - डॉ. नरेंद्र दाभोळकर *या दाभोळकरांच्या बदनाम...

कृष्णाच्या पदस्पर्शाने पाणी हटले? काय आहे वसुदेव प्याल्याचे रहस्य?

इमेज
‘काय विचित्र कारागिरी आहे … या 250 वर्षांच्या पितळी भांड्यात भगवान कृष्णाजी वासुदेवाजींच्या मांडीवर बसले आहेत. हा वाडगा पाण्याने भरल्याने ते कोठूनही सांडत नाही परंतु जेव्हा पाणी भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या तळव्यांना स्पर्श करते तेव्हा सर्व पाणी तळाच्या छिद्रातून सांडते.’ या मजकुरासोबत हे व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहेत. यामध्ये कृष्णमूर्तीच्या पायाला पाण्याचा स्पर्श होताच प्याल्यात जमा झालेले सर्व पाणी वाहून जाते. याला काही लोक चमत्कार म्हणत आहेत. पहिल्यांदा हे व्हिडीओ पहा. या व्हिडीओंंला दिलेले उत्तर वाचा. द्रव पदार्थ हा नेहेमी उच्च पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहतो हे वैज्ञानिक तत्व आहे. पाण्याची पातळी वाढतवाढत सर्वोच्च पातळीला पोचली की कमी पातळीकडे वाहू लागते आणि ते पूर्ण रिकामे होईपर्यंत वाहत राहते. याला Siphon असे म्हणतात. एक वैज्ञानिक तत्व, एक अख्यायिका आणि एक पौराणिक कथा यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेली एक अनोखी वस्तू म्हणजे 'वसुदेव प्याला'! एखाद्या उंच ठिकाणी ठेवलेल्या पिंपातून अथवा टाकीतून आपल्याला पाणी (किंवा इतर एखादा द्रव पदार्थ) खाली काढायचे असेल तर वक्रनलिका (Siphon) वि...

पाण्यावर पेटणारी पणती: किती खरे? किती खोटे?

      सोशल मीडियातून पाण्यावर पेटणाऱ्या पणतीचे व्हिडीओ सध्या पसरत आहेत. व्हिडीओमध्ये तेजस खरे नावाचा तरुण या पणतीची माहिती देताना दिसत आहे. पणतीमध्ये पाणी ओतताच पणतीची ज्योत आपोआप प्रज्वलित होताना दिसते. तरुणही त्या प्रकाशाला 'पणतीची ज्योत' पेटलेली आहे असेच म्हणताना दिसत आहे. आपण तो व्हिडीओ खाली पाहू शकता.  या व्हिडीओसोबतच एक मेसेजही पसरवला जात आहे. त्यामध्ये या पणतीची जाहिरात केलेली आहे. या मेसेजमध्ये ' विद्युत उर्जे शिवाय उत्कृष्ट रोषणाई करा' असे म्हटले आहे. याचा अर्थ विद्युत ऊर्जेशिवाय ही पणती प्रज्वलित होते असा तेजस खरेचा दावा दिसतो. याच मेसेजमध्ये या पणतीला तेल आणि वातीचीही गरज नसल्याचे म्हटले आहे. आणि सर्वात कहर म्हणजे साई बाबांनी पाण्यावर पणती पेटवण्याचा चमत्कार केला होता, त्याच आधारावर आपण ही पणती तयार केली असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. एकंदरीत ही पणती चमत्कारिक असल्याचा आभास निर्माण केलेला आहे. यामागील तथ्य काय आहे?        पहिली गोष्ट म्हणजे या पणतीला विद्युत उर्जा लागत नाही, ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. या पणतीची ज्योत म्हणजे LED बल...

हा भक्त प्रल्हादाचा अवतार आहे का? व्हायरल व्हिडीओमागचे सत्य काय?

इमेज
      हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये एका चुलीवर एक कढई ठेवली आहे. आणि त्या कढईमध्ये द्रव पदार्थ उकळत ठेवलेला आहे. तो द्रवपदार्थ पाणी आहे की तेल आहे, हे व्हिडिओ बघून समजत नाही. त्या उकळत्या द्रवामध्ये एक मुलगा हात जोडून बसलेला आहे. त्या मुलाच्या अंगावर कपडे नाहीत. फक्त खांद्यावर भगव्या रंगाचे एक उपरणे घेतलेले दिसत आहे. पाठीमागे लावलेल्या बॅनरवर 'भक्त प्रल्हाद' असे लिहिलेले दिसत आहे. लोक जयघोष करत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. यावरून एकंदरीत एक चमत्कार घडत असल्याचेचे भासवण्यात आलेले आहे. हा व्हिडीओ आपण खाली बघू शकता. एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे जगामध्ये चमत्कार घडत नसतात. चमत्कारसदृश वाटणाऱ्या घटनांमध्ये काही हातचलाखी असते किंवा माहीत नसलेला कार्यकारण भाव असतो. तो कार्यकारण भाव माहित करून घेतला की अशा घटनांमागचे चमत्काराचे वलय गळून पडते. सदर व्हिडिओ पाहिला असता असे लक्षात येते की इथेही हातचलाखीचा आधार घेतलेला आहे. पाणी/तेल उकळताना चारही बाजूने उकळताना दिसायला हवे होते. परंतु कढाईमध्ये फक्त एकाच ठिकाणी बुडबुडे येताना दिसत आहेत. चमत्...

भगवद्गीता पाण्यात भिजली नाही?

'पुराच्या पाण्यात रात्रभर तंरगुन ही श्रीभगवतगीता ओली झाली नाही. हीच परमेश्वराची लीला' अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यासोबत खालील व्हिडीओ पसरवला जात आहे. हा खरोखरच चमत्कार आहे का? यामागील नेमके सत्य काय आहे? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संदीप गोवळकर त्यांनी ते खालील  व्हिडीओमध्ये सांगितले आहे. यावरून हेच दिसून येते की सर्वच पुस्तकांबाबत घडत असलेल्या गोष्टीला इथे चमत्कार म्हणून सांगितले जात आहे.  या व्हिडीओची सत्यता 'चेकपोस्ट मराठी'ने सुद्धा तपासली आहे. आपण इथे क्लिक करून त्यासंबंधी माहिती पाहू शकता.

पुणेकर आणि शास्त्रज्ञ

*एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ* - तुम्ही मला देव दाखवा *पुणेकर* - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा *शास्त्रज्ञ* - थोड्यावेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल *पुणेकर* - तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल 😂😂 ============================= याला उत्तर  *शास्त्रज्ञ* - तुम्ही मला देव दाखवा. *पुणेकर* - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा. *शास्त्रज्ञ* - थोड्यावेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल. *पुणेकर* - तुम्ही आणखी थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल. *शास्त्रज्ञ*- मी सांगितलेल्या पद्धतीने ऑक्सिजनचे अस्तित्व  समजून घेतलेली लाखो उदाहरणे आहेत...  पण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने देव दिसल्याचे एकही उदाहरण नाही.😂😜😂 (अग्रेषित)
 *राखी विकत त्यांच्याकडूनच घ्या* *जे रक्षाबंधन साजरे करतात* *वाक्य लहान अर्थ महान* 🙏 *हिंदू धर्मरक्षक* 🙏 ======================== या पोस्टला उत्तर *राखी विकत त्यांच्याकडूनच घ्या* *जे रक्षाबंधन साजरे करतात आणि त्यांचाकडून सुद्धा घ्या जे साजरे करीत नाही…* *त्यांनाही कळू द्या रक्षाबंधनाचा खरा अर्थ...* *वाक्य लहान पण मानवतेचा अर्थ महान* 🙏 *जय संविधान* 🙏

महालक्ष्मी कॅलेंडर मधील भाकीत

घरात महालक्ष्मी कॅलेंडर असेल तर जुलै 2021 महिन्याचं पान उघडा, उजव्या हाताला 'पर्जन्य अंदाज' चा रकाना बघा.  8-9 महिन्यांपूर्वी सूर्याची स्थिती 22 जुलैला कोणत्या नक्षत्रात असेल, त्यावरून त्यांनी पावसाचा अंदाज लावला आहे. त्यात भरीस भर म्हणजे पूर येणार हे भाकीतही केलं आहे. त्यानुसार 22 जुलैला झालेल्या पावसामुळे कोकणात बहुतेक सर्वच ठिकाणी पूर आलेला आहे.  आता महत्वाचा मुद्दा, काही पुढारलेली लोकं, ज्यांचं मस्तिष्क अभिनव शैक्षणिक पद्धतीने तासून घेतलेलं आहे असे वास्तववादी लोक या हिंदू ज्योतिष शास्त्राला आणि पंचांगाला थोतांड म्हणून हिणवतात आणि हे पंचाग बघणाऱ्या विशारदांना किडमिडे गुरुजी म्हणून टोपण नावे ठेवतात.  मला अशा सो-कॉल्ड सुधारलेल्या लोकांना एवढंच सांगावस वाटत की ब्रिटिशांच्या मार्गदर्शनाच्या आणि शिक्षणपद्धतीचा कुबड्या घेऊन तुम्हाला वाटत असेल की तुमचा सर्वांगीण विकास झाला आहे तर खरं म्हणजे ते तुमचं वैचारिक अध:पतन आहे. हिंदू संस्कृती ही विश्वगुरु होती आणि भविष्यातही राहील, कुणी परकीय शक्तीने तिच्या बद्दल कितीही वाईट गोष्टींचा प्रचार केला तरी तिचे सत्व तुसभरही कमी होणार नाही. ...

*ईद आणि अंनिस* या विषयावरील पोस्टला उत्तर

*ईद आणि अंनिस* या विषयावरील पोस्टला उत्तर: –  उत्तम जोगदंड. बकरी ईद निमित्त अंनिसला टार्गेट करणारी आणि मुस्लिम विद्वेष ओकणारी एक पोस्ट आज समाज-माध्यमांवर फिरत आहे. ही पोस्ट वाचून, काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी हिंदू धर्माला किती इस्लामावलंबी केलंय, इस्लामची सावली बनवले आहे याची जाणीव होते आहे. विशेष म्हणजे स्वतःत कसलीही हिम्मत नसलेले हे लोक आपला मुस्लिम द्वेष व्यक्त करण्यासाठी अंनिसचा आधार घेत आहेत आणि एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता त्या पोस्टमधील एक एक मुद्द्यावर विचार करू या:  पोस्ट:  देवीपुढे कोंबड्याचा बळी देणे अंधश्रद्धा म्हणणारी 'अंनिस' आज बकरी ईदला आपल्या बायकोच्या पदरात लपून बसणार आणि एकदम २३ जुलैला बाहेर येणार! उत्तर :  *याचा अर्थ असा होतो की हिंदू लोक देवीपुढे कोंबडे/बकरे कापतात ही अंधश्रद्धा आहे हे अंनिसचे म्हणणे लेखकास मान्य आहे. तसे नसेल तर ईदला बकरी कापतात म्हणून हिंदू लोक देवीपुढे कोंबडे/बकरे कापतात असा तर्क लेखक करू इच्छित आहेत काय?  दुसरे म्हणजे, मुसलमानांच्या ईदला बकरी कापतात त्या प्रकाराला अंनिसवाले घाबरून जाऊन अंधश्रद्ध...

परधर्म द्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या चुकीच्या प्रश्नांना खरी उत्तरे...

परधर्म द्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या चुकीच्या प्रश्नांना खरी उत्तरे... – उत्तम जोगदंड. सुशिक्षीत हिंदु मित्रानो खालील प्रश्न गांभीर्याने वाचा व त्यांची उत्तरे शोधा या धर्मांध  पोस्टला उत्तर :  1. आज जगामधे 56 देश अधिकृत इस्लामीक देश आहेत. 112 देश अधिकृत ख्रिस्तीयन देश आहेत. 11 देश अधिकृत बौध्द धर्मीय देश आहेत. वीस लक्ष लोकसंख्या असणारा इस्त्राइल अधिकृत ज्यु धर्मीय देश आहे. एक ते दोन लक्ष लोकसंख्या असणारे व तालुक्याएवढे क्षेत्रफळ असणारे मुस्लिम व ख्रिस्ती यांचे जगात अनेक देश आहेत, पण 100 कोटी हिंदु धर्मीयांसाठी संपुर्ण पृथ्वीतलावर एकही हिंदुराष्ट्र का अस्तित्वात नाही ? मुस्लिम व ख्रिस्ती यांच्या लहान देशाना देखील आदर व सन्मान मिळतो मग 100 कोटी हिंदुंसाठी हिंदुराष्ट्र का असु नये ? भविष्यात जगामधे धर्माच्या आधारावर तिसरे महायुध्द होण्यची शक्यता आहे अशा वेळी हिंदुंनी कोणाकडे मदतीच्या अपेक्षेने पहायचे ? उत्तर:  1. एक तर अधिकृत धर्म असलेल्या देशांची आकडेवारी चुकीची आहे. अधिक महितीसाठी पुढील लिंक पहावी (https://simple.wikipedia.org/wiki/State_religion#Hindu_countries)  एक हिंद...

पुराणातील वांगी: ककनमठ मंदिर

⛔ * गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणारे  ककनमठ मंदिर! * — कौस्तुभ शेजवलकर (14 jun 2021) "गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या मंदिराची गोष्ट" ह्या ककनमठ मंदिरासंबंधीच्या संदेशात त्याचे लेखक, विनीत वर्तक, हे अनाहूतपणे किंवा सहेतुकपणे उपायोजित विज्ञान (applied science) आणि मूलभूत विज्ञान (pure science) यांत गल्लत करत आहेत. आधार घेऊन, अडखळत चालणारं लहान मूल, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल ह्या गोष्टी शिकल्यावर मग आधाराशिवाय चालायला लागत नाही तर ते आधी आधाराशिवाय चालायला लागतं आणि नंतर कधीतरी ह्या गोष्टी, न्युटनचे गुरूत्वाकर्षणाचे नियम वगैरे शिकतं. एवढंच कशाला, रस्त्यावर उंच ताणलेल्या दोरावर कसरतीचे खेळ करणारे कित्येक डोंबारी तर बहुधा जन्मात कधीही न्यूटन, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल यातल्या कशाशीही पाला न पडतादेखील न पडता आयुष्यभर कसरत करतात. त्यामुळे ककनमठ मंदिर हे आजही न पडता उभं आहे म्हणजे ते बांधणाऱ्या स्थापत्यकारांना गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि त्यांचं विज्ञान माहित होतं हा दावा, मूल आधाराशिवाय चालतंय, किंवा डोंबारी न पडता कसरती करतोय म्हणजे त्यांनाही गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि विज...

मुस्लिम सरकारी नोकर, चार बायका आणि पेंशन

*डोके थंड ठेवून वाचा.* *विषयाची गंभीरता समजा.*  समजा एक *मुस्लिम* गव्हर्नमेंट ची नोकरी करून जेंव्हा निवृत्त झाला आणि त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या जर चार बायकां असतील तर त्यांना पेंशन कसे देतात?  *उत्तर* :- नॉमिनेशन बघितलं जातं आणि नक्की केलं जातं की किती टक्के कुणाला द्यायचे ते. नॉमिनेशन नसेल तर चौघीना 25% वाटून देतात. एखादी मेली तर बाकीच्या तिघींचा 33.33% देतात. दुसरी मेली तर बाकी जिवंत असणार्या दोघीं ना 50%वाटून देतात.  तिसरी मेली तर शेवटची ला 100% पेंशन देतात.  *आता विचार करा*..... की  पहिली 60 , दुसरी 50 तिसरी 40 आणि चवथी 30  वर्षाची असतील तर  ,आणि सर्रास सगळ्या 70 वर्षे जगल्या तर  , एकूण  10+20+30+40 =100 वर्ष  पेंशन मिळवणार.   अन्य धर्माची पत्नी 10 किंव्हा जास्तीत जास्त 20 वर्ष पेंशन मिळवणार.   म्हणजेच चवथी पत्नी ही आयुष्यभर  पेंशन मिळविण्या साठी मुस्लिम वयस्करा शी रियायरमेंट पूर्वी लग्न करते.  आता हा सर्व्हे करणं जरुरी आहे की किती टक्के मुस्लिम वयाच्या ५५ वर्षां नंतर शरीयतचा फायदा घेऊन ४ लग्न करतात ?......

क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं?

 क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं? हाँ १००% सच है!! भारत का रेडियो एक्टिविटी मैप उठा लें, हैरान हो जायेंगे! भारत सरकार के न्युक्लियर रिएक्टर के अलावा सभी ज्योतिर्लिंगों के स्थानों पर सबसे ज्यादा रेडिएशन पाया जाता है। ▪️ शिवलिंग और कुछ नहीं बल्कि न्युक्लियर रिएक्टर्स ही तो हैं, तभी तो उन पर जल चढ़ाया जाता है, ताकि वो शांत रहें। ▪️ महादेव के सभी प्रिय पदार्थ जैसे कि बिल्व पत्र, आकमद, धतूरा, गुड़हल आदि सभी न्युक्लिअर एनर्जी सोखने वाले हैं। ▪️ क्यूंकि शिवलिंग पर चढ़ा पानी भी रिएक्टिव हो जाता है इसीलिए तो जल निकासी नलिका को लांघा नहीं जाता। ▪️ भाभा एटॉमिक रिएक्टर का डिज़ाइन भी शिवलिंग की तरह ही है।[1] ▪️ शिवलिंग पर चढ़ाया हुआ जल नदी के बहते हुए जल के साथ मिलकर औषधि का रूप ले लेता है। ▪️ तभी तो हमारे पूर्वज हम लोगों से कहते थे कि महादेव शिवशंकर अगर नाराज हो जाएंगे तो प्रलय आ जाएगी। ▪️ ध्यान दें कि हमारी परम्पराओं के पीछे कितना गहन विज्ञान छिपा हुआ है। ▪️ जिस संस्कृति की कोख से हमने जन्म लिया है, वो तो चिर सनातन है। विज्ञान को परम्पराओं का जामा इसलिए पहनाया गया है ताकि वो प्रचलन बन जाए और ह...