मुस्लिम सरकारी नोकर, चार बायका आणि पेंशन

*डोके थंड ठेवून वाचा.*

*विषयाची गंभीरता समजा.*


 समजा एक *मुस्लिम* गव्हर्नमेंट ची नोकरी करून जेंव्हा निवृत्त झाला आणि त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या जर चार बायकां असतील तर त्यांना पेंशन कसे देतात? 

*उत्तर* :-

नॉमिनेशन बघितलं जातं आणि नक्की केलं जातं की किती टक्के कुणाला द्यायचे ते.

नॉमिनेशन नसेल तर चौघीना 25% वाटून देतात.

एखादी मेली तर बाकीच्या तिघींचा 33.33% देतात.

दुसरी मेली तर बाकी जिवंत असणार्या दोघीं ना 50%वाटून देतात.

 तिसरी मेली तर शेवटची ला 100% पेंशन देतात.

 *आता विचार करा*..... की 

पहिली 60 , दुसरी 50 तिसरी 40 आणि चवथी 30  वर्षाची असतील तर  ,आणि सर्रास सगळ्या 70 वर्षे जगल्या तर  , एकूण 

10+20+30+40 =100 वर्ष  पेंशन मिळवणार.

  अन्य धर्माची पत्नी 10 किंव्हा जास्तीत जास्त 20 वर्ष पेंशन मिळवणार. 


 म्हणजेच चवथी पत्नी ही आयुष्यभर  पेंशन मिळविण्या साठी मुस्लिम वयस्करा शी रियायरमेंट पूर्वी लग्न करते. 

आता हा सर्व्हे करणं जरुरी आहे की किती टक्के मुस्लिम वयाच्या ५५ वर्षां नंतर शरीयतचा फायदा घेऊन ४ लग्न करतात ?..... जर ही टक्केवारी मोठी असेल तर सरकारी तिजोरीतून मुस्लिम महिलांची कायदेशीर सोय करण्याचं हे षडयंत्र आहे हे नक्की होईल.


कॉमन सिव्हिल कोड -

 Common Civil Code - का गरजेचे आहे , हे आता लक्षात येईल.


या पोस्टला उत्तर

सरकारी नोकर चार लग्न करू शकत नाही. जरी तो मुस्लिम असला तरी. मूळ प्रश्न आहे प्रत्येकी चार-चार बायका आणतात कुठून? मुस्लिमांमध्ये स्त्रियांची संख्या चौपट आहे का?


 दुसरे असे की पोस्टमध्ये कॅल्क्युलेशन चुकते आहे.

चारही बायकांना मिळून पेन्शन द्यायचेत असेल तर 100 % पेन्शन विभागून मिळेल. आणि चौथ्या बायकोला 30वर्षपासून 70वर्षापर्यंत म्हणजे एकूण 40वर्ष पेन्शन मिळणार. म्हणजे सगळ्या बायकांना मिळून 100वर्ष नाही तर 40वर्षच पेन्शन मिळेल...


 वाळवंटातील टोळी युद्धात पुरुष अधिक संख्यने मरत असत. मेल/फिमेल रेशो व्यस्त असे, अधिक संख्येतील स्त्रियांना किमान संरक्षणाची हमी मिळावी म्हणून कुराणात ही तजवीज असावी. पण प्रत्यक्षात आज ही परिस्थिती नाही. एक तर चार बायका परवडणे शक्य नाही. दुसरे म्हणजे भारतातील प्रमाण १००० (M ) : ९५० (F ) असे आहे. हे प्रमाण १०००:४००० असेल तर वरील मुद्दा रास्त ठरला असता. 


थोडक्यात भक्त फॅक्टरी ही निर्बुद्ध अर्धमानवांची टोळी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य