हा भक्त प्रल्हादाचा अवतार आहे का? व्हायरल व्हिडीओमागचे सत्य काय?

     


हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये एका चुलीवर एक कढई ठेवली आहे. आणि त्या कढईमध्ये द्रव पदार्थ उकळत ठेवलेला आहे. तो द्रवपदार्थ पाणी आहे की तेल आहे, हे व्हिडिओ बघून समजत नाही. त्या उकळत्या द्रवामध्ये एक मुलगा हात जोडून बसलेला आहे. त्या मुलाच्या अंगावर कपडे नाहीत. फक्त खांद्यावर भगव्या रंगाचे एक उपरणे घेतलेले दिसत आहे. पाठीमागे लावलेल्या बॅनरवर 'भक्त प्रल्हाद' असे लिहिलेले दिसत आहे. लोक जयघोष करत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. यावरून एकंदरीत एक चमत्कार घडत असल्याचेचे भासवण्यात आलेले आहे. हा व्हिडीओ आपण खाली बघू शकता.



एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे जगामध्ये चमत्कार घडत नसतात. चमत्कारसदृश वाटणाऱ्या घटनांमध्ये काही हातचलाखी असते किंवा माहीत नसलेला कार्यकारण भाव असतो. तो कार्यकारण भाव माहित करून घेतला की अशा घटनांमागचे चमत्काराचे वलय गळून पडते. सदर व्हिडिओ पाहिला असता असे लक्षात येते की इथेही हातचलाखीचा आधार घेतलेला आहे. पाणी/तेल उकळताना चारही बाजूने उकळताना दिसायला हवे होते. परंतु कढाईमध्ये फक्त एकाच ठिकाणी बुडबुडे येताना दिसत आहेत.
चमत्काराचा दावा करणाऱ्या व्यक्ती नेहमीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा लपवण्यासाठी फुलांचा आधार घेतलेला आहे. कढईतील द्रवाच्या संपूर्ण पृष्ठभागावर फुले अंथरलेली आहेत. जेणेकरून कढईमध्ये केलेली हातचलाखी लोकांना दिसू नये. जर खरोखरच चमत्कार असता तर अशी लपवाछपवी करण्याची गरजच पडली नसती. कढई मध्ये फक्त पाणी/तेल ओतून उकळत्या पाणी/तेलामध्ये मुलाला बसवले असते. नेमकी काय लपवाछपवी केलेली आहे ते प्रत्यक्ष तपासणी केल्यावर उघड होऊ शकते. फक्त व्हिडिओ पाहून काही अंदाज वर्तवता येतील.


ही कढई खास बनवुन घेतलेली असावी. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कढई क्र. २ मध्ये कढाई क्र. १ अशा पद्धतीने बसवून जोडलेली असावी की दोन कढयांच्यामध्ये रिकामी पोकळी राहील. या रिकाम्या पोकळीत हवा किंवा उष्णतारोधक पदार्थ असू शकतो. दोन कढयांचा फक्त काठालाच एकमेकांशी संपर्क होत असल्यामुळे कढई नं. १ तापण्यासाठी खूप वेळ लागेल. आणि कढईतील द्रव उकळण्यासाठी तर त्याहूनही जास्त वेळ लागेल. कढईतील द्रव उकळत नाही आहे; तर पाईपद्वारे सोडलेल्या हवेमुळे द्रवातून बुडबुडे बाहेर पडत आहेत. पाईपद्वारे हवा सोडण्याची हातचलाखी दिसू नये म्हणून द्रवावर फुले पसरलेली आहेत.
दुसरी एक शक्यता वर्तवता येते. कढईमध्ये पाणी किंवा तेल यांच्या ऐवजी अतिशय कमी उत्कलनांक असलेला दुसरा एखादा पदार्थ असू शकतो. किंवा द्रवाचा उत्कलनांक कमी करणारा एखादा पदार्थ त्यामध्ये मिसळलेला असू शकतो. कमी उत्कलनांक असलेला पदार्थ उकळत असताना त्यात हात बुडवला तर माणसाला काहीही होणार नाही.

मुलगा कढईमध्ये पाटावर बसला असण्याचीही शक्यता आहे.
अर्थात, हे झाले तर्काने केलेले अंदाज. परंतु प्रत्यक्षात वेगळ्या पद्धतीचीही हातचलाखी असू शकते. प्रत्यक्ष तपासणी केल्यावरच ती उघड करता येईल. (चमत्काराचा दावा करणारे हे लोक तपासणी करायला नकार देतात हा इतिहास आहे.) परंतु हा चमत्कार नाही हे मात्र निश्चित.


टिप्पण्या

  1. Top 10 sports toto: Football prediction, sports toto - Sporting 100
    ‎Betting 토토 사이트 홍보 Tips & Betting Tips · ‎Free Betting Tips · ‎Football Tips · ‎Soccer Predictions

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य