'दशक्रिया' चित्रपटाच्या निमित्ताने
'दशक्रिया' चित्रपटाच्या निमित्ताने त्या विधी आणि कर्मकांडांना छद्म वैज्ञानिक संदर्भ देऊन खऱ्याखोट्याची सरमिसळ करून लोकांना भ्रमित करणाऱ्या पोस्टचे केलेले हे मुद्देसूद खंडन -- जेट जगदीश. (^j^) >>> मृत्यू हा माणसाला नेहमी भयप्रद आणि मयताच्या नातेवाईकांना दुःखदायक आणि सैरभैर करणारा असतो. अश्या शोकाकुल लोकांकडून मृतदेहाची नीट विल्हेवाट लावली जाणे शक्य नसते. त्यासाठी एक तरी माणूस असा लागतो जो तुमच्या भावभावनांशी निगडित नाहीये, ज्याने मृत्यू आणि त्या भोवतालचा कल्लोळ अनेक वेळा बघितला आहे म्हणूनच तो त्रयस्थपणे हे काम करू शकतो. तो एक माणूस म्हणजे क्रिया कर्म आणि दशक्रिया विधी करून घेणारा ब्राह्मण. *खंडन : भावनांवर काबू ठेवून मृत्यू जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे समजून घेतले तर जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख जरी झाले तरी वास्तवाचा स्वीकार केल्याने दुःख हलके होते. मग यांत्रिक पद्धतीने विधी करणाऱ्या रोबो ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही हे कळते. आणि कुठलेही विधी न करता प्रेताला अग्नीच्या स्वाधीन करून त्याची योग्य विल्हेवाट लावता येते.* >>> अग्निसंस्कार करताना केलेल्या प्रत...