माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य

सध्या *'काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य'* या शीर्षकाचा एक लेख सोशल मीडियामधून पसरतोय. त्यामध्ये म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली.
सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो.
1) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो.
2) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असेलही कदाचित. पण अशा लोकांची संख्या निश्चितच शंभरच्या आतच असेल. पण लेख लिहिणारे लेखक म्हणतायत की एकट्या पुण्यातून दोन-अडीचशे माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला समाधी उखडण्यासाठी चालला होता. जिथे ५० माणसे मिळणे अवघड होते तिथून अडीचशे माणसे कुठून मिळाली? याचा अर्थ ही कथाच बनावट आहे.
3) साहजिकच त्या लेखात सांगितलेल्या इतर गोष्टीही (अल्फा, बीटा, गॅमा किरण मीटरच्या साहाय्याने मोजणे वगैरे) खोट्या आहेत. त्या गोष्टी घडल्याच नाहीत.
4) सदर लेखामध्ये सांगितलेली घटना खरी असती तर लेखामध्ये समाधी उखडण्यासाठी आलेल्या लोकांची नावे दिली असती. परंतु लेखामध्ये त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव दिलेले नाही.
5) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विधायक धर्मचिकित्सेला महत्व देते...की जी धर्मचिकित्सेची परंपरा संतानी आपल्या परखड आणि वास्तववादी शैलीतून अभंगातून निर्माण केली. वरील बुद्दिभेदी खोटी घटना पूर्णपणे द्वेषातून आकसापोटी लिहली आहे...
6)सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेला लेखकांना एकही पुरावा जोडता आला नाही..त्यांनी बातमीच्या सत्यतेसाठी एखाद्या वृत्तपत्राची बातमी तरी पुराव्यासाठी उपलब्ध करुन द्यायला हवी होती.खरं तर अशा बुद्दिभेदी कथा रचुन बदनामी करने हेच या लेखाचे उद्दिष्ट दिसत आहे..
*सरतेशेवती माहितीसाठी...*
📌महाराष्ट्र अंनिसची चतुःसूत्री..
1)शोषण,फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धाना विरोध करणे...
2)वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रचार,प्रसार आणि अंगीकार करणे...
3)धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणे...
4)समविचारी संघटनाना जोडून घेणे...
📌संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम ,गाडगेबाबा,तुकडोजी महाराज या आणि अशा सर्व संतांनीच अभंगातून आणि प्रत्यक्ष कृतीतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया घातला आहे...मअंनिस याच संत-समाजसुधारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करते...
📌 तोडफोड करणे, विध्वंस करणे अशी अंनिसची कार्यपद्धती कधीच नव्हती आणि नाही.
📌तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात की,
*सत्य सत्यें देतें फळ|*
*नाहीं लागतची बळ||*
याचपद्धतीने आपणासमोर सत्य मांडले आहे...वैचारिक विरोधकांनी मुद्दाम पसरवलेल्या बुद्दिभेदी प्रचाराला बळी पडण्याआधी...
_मित्रहो...एकदा विचार तर कराल...?_
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद करू इच्छिते...*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?