सोमनाथ मंदिर
*सोमनाथ मंदिर ते उत्तर ध्रुव या सरळ रेषेत एकही भूभाग येत नाही व म्हणून आपले पूर्वज किती ज्ञानी होते अशा अर्थाची पोस्ट फिरते आहे त्यास हे उत्तर.*
हिंदुत्वाचा उदो उदो करतांना व आपले जुने ते सर्व काही विज्ञानच आहे हे सिद्ध करण्यासाठी खोटेपणाचा किती आधार घेतला जातो व आपल्याच धर्मबांधवांना किती मूर्ख समजले जाते याची हे पोस्ट म्हणजे ढळढळीत उदाहरण आहे. अशी पोस्ट लिहिणारे तथाकथित हिंदुत्ववादी जर हिंदुत्वाची धुरा खांद्यावर वाहत असतील तर हिंदू धर्माची वाट लावायला ते स्वतःच समर्थ आहेत. कुठल्या शत्रूची गरज नाही. आता हे कसे ते पाहू या.
*1) सोमनाथ मंदिर हे हिंदूंचे पवित्र, पूज्य स्थळ आहे व ज्योतिर्लिंग आहे या बद्दल दुमत नसावे. हा श्रद्धेचा विषय आहे.*
*2) सोमनाथ मंदिर किती वेळा लुटले गेले तरी ते दर वेळी तश्याच वैभवाने उभे राहत होते अशी सुरुवात या पोस्ट मध्ये केली आहे. याचा लेखकाला अभिमान वाटतोय काय? प्रत्येक वेळेस हे वैभव मंदिरात कुठून येत होते? हे वैभव तिथे आहे हे शत्रूला कसे कळत होते? ते लुटतांना देवाच्या कोपाने शत्रूचे हात पाय झडून का नाही गेले? इथले शासनकर्ते ही लूट होतांना झोपा काढत होते काय? त्यांच्यात शत्रूला नामोहरम करण्याएवढी शक्ति नव्हती काय? मंदिर लुटायला कुणीतरी येतोय (वारंवार) हे कळण्या एवढी सुद्धा गुप्तचर यंत्रणा त्या वेळच्या शासकांकडे नव्हती काय? हे व अन्य अनेक प्रश्न निर्माण होतात.*
*3) सागराने या मंदिराचा उपमर्द केला नाही असे लेखकाचे म्हणणे आहे. मग आक्रमकांनी मंदिर लुटून मंदिराचा सन्मान केला आहे काय? पण ते असो. लेखक दुसरेच काहीतरी सांगत आहेत, त्या कडे वळूया. हा स्तंभ सहाव्या शतकापेक्षाही खूप जुना आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. अशा स्तंभांचे आयुष्य मोजण्याच्या शास्त्रीय पद्धती (कार्बन डेटिंग) आहे, ती आतापर्यंत उपयोगात का आणली नाही (स्तंभाचे खरे वय ओळखण्यासाठी) या बाबत लेखक मौन बाळगतो. असो, तो स्तंभ खूपच जुना आहे असे क्षणभर मानू या. परंतु सध्या उपलब्ध असलेला बाण स्तंभ हा जुन्या बाण स्तंभाची भ्रष्ट नक्कल आहे या बाबत लेखक काही लिहीत नाही. जुन्या बाण स्तंभाचे उपलब्ध चित्र व नवीन बाण स्तंभाचे चित्र हेच दर्शविते की नवीन स्तंभ बनवतांना त्यात फेरफार केले आहेत.*
*4) लेखकाने लक्ष वेधले आहे बाण स्तंभाकडे, ज्यावर कोरलेले आहे ‘आसमुद्रान्त दक्षिण धृवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’. याचा अर्थ लेखकाने असा लावला आहे की या “बिंदुपासून दक्षिण धृवापर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.” यावर काही उपप्रश्न? (अ) त्या काळात पृथ्वीची व्याख्या काय होती? सपाट की गोल? (ब) पृथ्वीला असे ध्रुव आहेत असे त्या काळात ज्ञात होते काय, असेल तर त्याला पुरावा काय आहे? हा पुरावा पाश्चात्यांनी ध्रुवा विषयी माहिती पुढे आणली त्या वेळी का दाखविला नाही? (क) त्या काळी अक्षांश रेखांश होते काय? (ड) त्या काळात समुद्र ओलांडणे हे पातक मानले जात असे. मग हे ध्रुव शोधायचे पातक कोणी केले? (ई) समुद्र प्रवास करणे पातक असतांना नौकानयन शास्त्र प्रगत होते हा दावा हास्यास्पद वाटतो. तसेच या दाव्यास आधार काय? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.*
*5) आता, बाण स्तंभाच्या बिन्दु पासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही असे लेखक म्हणतात. व यावरूनच त्यांनी जुन्याची भलामण केली आहे. हा दावा धादांत खोटा आहे. कारण, (अ) दक्षिण ध्रुव हा अंटार्क्टिका खंडाच्या भू भागावर किनार्यापासून कित्येक किलोमीटर आत आहे (पृथ्वी गोलाचा नकाशा पाहावा). स्तंभाच्या बिन्दुतून काढलेली सरळ रेषा प्रथम अंटार्क्टिका च्या किनार्याला लागेल व नंतर दक्षिण ध्रुवापर्यंत जाईल. (ब) पृथ्वी वरील कोणत्याही बिन्दु पासून ध्रुवापर्यंत (उत्तर व दक्षिण) जाणार्या रेषेला रेखांश म्हणतात. प्रत्येक रेखांश दोन्ही धृवांना मिळतो. सोमनाथ मंदिर हे 70.24 अंश पूर्व रेखांशावर आहे. या बिन्दुतून निघणारी सरळ रेषा, म्हणजे रेखांश हे “फ्रेंच सदर्न अँड अंटार्क्टिक लँड” या छोट्याश्या बेटावरुन जाते. या बेटाचा विस्तार 68.64 ते 70.54 अंश या रेखांशामध्ये आहे. याचे क्षेत्रफळ 400 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे. सोमनाथहून निघणारा रेखांश (70.24 अंश) सरळ या बेटावरुन जातो. गूगल मॅप वर हे बेट पाहता येईल. त्याचे अचूक रेखांश क्लिक करून पाहता येतात.*
म्हणून लेखकाचा हा दावा खोटा आहे. त्या स्तंभावरील दक्षिण ध्रुव व ज्योतिर्मार्ग हे शब्दच काय त्या स्तंभावरील वाक्यच नंतर घुसडलेले आहे असे स्पष्ट दिसते.
उत्तम जोगदंड
*"चला उत्तर देऊ या"* टीम 👊🏽

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा