स्त्रियांच्या दागिन्यांचे छडमविज्ञान

*”आपली संस्कृती"*
*"विपर्यास आणि सत्य”*

*❌असत्य:*
बसू नये देहाला थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का
म्हणुन मैत्रिणींनो मंगळसूत्र व बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का

*✔सत्य:*
*मग पुरुषांना बसू नये थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का,*
*म्हणून त्यांना मंगळसूत्र, बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का.*

*❌असत्य:*
मणक्याच्या आजारापासून रहायचे असेल जर लांब,
तर मग घाला ना कंबरपट्टा, वाचवायला तुमच्या पाठिचा खांब !!

*✔सत्य:*
*कंबरपट्यांमुळे नाही वाचत तुमच्या पाठीचा खांब,*
*डॉक्टरने दिलेले पट्टा वापर, आजार होईल बरा, सांगतोय ठाम.*

*❌असत्य:*
सायनस हा आजार आहे नाकाच्या हाडाचा
म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा

*✔सत्य:*
*सौंदर्य म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा,*
*दुरान्वयेनी ही संबंध नाही सायनस आजाराचा.*

*❌असत्य:*
कोकीळा गातांना लागते वसंत ऋतूची चाहूल,
उष्णतेचा दाह कमी करते पैजण घातलेले पाऊल.

*✔सत्य:*
*पैंजणामुळे उष्णतेचा दाह होतो कमी, अशी देवू नका हूल,*
*थंडीत पैंजणाचे काय करणार, अशी करू नका भूल.*

*❌असत्य:*
बांगड्या घातल्याने वाढते हाताच्या सौंदर्याची शान ,
त्याच बांगड्यांमुळे होते गर्भाशय सुरक्षित असल्या ची जाण.

*✔सत्य:*
*बांगड्यामुळे गर्भाशय सुरक्षित, याला शास्त्राचा आधार नाही हे तू जाण,*
*बांगड्यामुळे वाढते फक्त हाताच्या सौंदर्याची शान, हे ठेव तू भान.*

*❌असत्य:*
शारीरिक व मानसीक बदल.हा आहे एक भाग,
म्हणून जोडवि बीरोदी घालुन सूहासिनी सारखी बाई तू वाग !!

*✔सत्य:*
*जोडवि बीरोदी मुळे काही होते, हा विचार सोडून टाक,*
*शारीरिक व मानसीक बदल होणे,  हे तर निसर्गाचे चाक.*

*❌असत्य:*
शरीरातील रक्तप्रवाहासाठी टोचतात लहानपणीच कान ,
भारतीय संस्कृतीने दिला आहे, स्त्रियांना कानातले घालायचा मान

*✔सत्य:*
*रक्तप्रवाह थांबत नाही, जरी नाही टोचले लहानपणीच कान,*
*भारतीय संस्कृतीच्या नावाने मारती थापा, याचे ठेव भान.*

*दागिने वाढवती स्त्रियांचे सौदर्य, एवढेच मनी धरा रे,*

*बाकी सारे भ्रामक विज्ञान, भूलथापांना बळी पडू नका रे*

*म्हणून सांगतो “विज्ञानराव दृष्टीकोने” विवेकाची कास धरा रे*

                                       अनिल करवीर
                              (विज्ञानराव दृष्टीकोने)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?