दाभोळकर तेव्हा तुम्ही गप्प का?....
डॉ. नरेंद्र दाभोलकरांना लक्ष्य करणारी एक दिशाभूल करणारी कविता आणि तिला दिलेले उत्तर
पहिल्यांदा ती संबंधित कविता वाचा.
पहिल्यांदा ती संबंधित कविता वाचा.
दाभोळकर तेव्हा तुम्ही गप्प का?....
देवाला फूल चढ़वल जात
तेव्हा तुम्ही रागवता!
मग मेणबत्ती पेटवतेवेळी,
चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का?
दाभोळकर......
माझा गणपती घरी येतो
तेव्हा तुम्ही टिका करता!
त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा,
त्याचा मसीहा येतो त्यावेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर...
माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत!
त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी
त्यांची सुंता होते त्यावेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर.......
आमचे व्रत उपवास सण
तुम्हाला नकोसे होतात!
पण त्यांचा रोजाच्या वेळी,
यांचा गुडफ्रायडे वेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर.......
माझ्या शिक्षणात धर्माला जागा नाही
त्यांच मात्र धर्मावर शिक्षण बंधनकारक
ख्रिस्ती शाळेत येशु मूर्ती रूपान हज़र, त्यावेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर......
स्री शिक्षणातली हिंदू सावित्री कधी तुम्ही समजूनच घेतली नाही...
कारण मुस्लिम बुरख्यातुन तुम्हाला पाश्चमात्य नग्नता चांगली वाटली.....
आमचा एकपत्नी राम व त्याच कुटुंबनियोजन तुम्ही जगासमोर मांडलच नाही...
कारण एकाच पुरुषाच्या चार बायका व त्याची विस पोर तसेच दर सिजनला बायका बदलनारे पाश्चिमात्य तुमच्या मनाला जास्त भावले........
विचार करा दाभोळकर अन मग सांगा तेव्हा तुम्ही गप्प का?.............
माझी अंधश्रद्धा जगासमोर मांडली जरा चांगल्या गोष्टीपण मांडा!
म्हणजे देव न मानणारयां मधल देवपण मला कळेल
Whatts Apps वरुन साभार....
===========================
आता या कवितेला दिलेले उत्तर
दाभोलकरांना गप्प का ? असा प्रश्न विचारणाऱ्या
धर्मांध सनातन्यानो...
तुमची टिवटिव बंद करा...
देवपूजेला वा देवाला फुलं वाहण्याला दाभोलकरांनी विरोध केला असे किमान एक उदाहरण दाखवा,
नाहीतर तुमची टिवटिव बंद करा...
गणेशोत्सवाला दाभोलकरांनी विरोध केल्याचे एकही लिखाण वा भाषण दाखवा,
नाहीतर तुमची टिवटिव बंद करा...
शोषण न करणाऱ्या चालीरीतींना दाभोलकरांनी विरोध केल्याचा एक दाखला द्या,
नाहीतर तुमची टिवटिव बंद करा...
चमत्कारासाठी मदर तेरेसाला संतपद दिले तेव्हा पहिला विरोध दाभोलकरांनी केला,
तेव्हा का मुग गिळून गप्प बसलात...
विविध दर्ग्यामध्ये, चर्चमध्ये चालणारी भोंदूगिरी उघडकीस आणली. वसईतील मार्टिन बाबा सारख्या भोन्दुंची पोल खोलली,
तेव्हा का मुग गिळून गप्प बसलात...
जादूटोणा विरोधी कायदा झाल्यावर पहिला गुन्हा दाखल झाला तो मुस्लीम भोन्दुबाबा वर,
तेव्हा का मुग गिळून गप्प बसलात...
धर्माचा खरा अर्थ न कळलेल्या देशद्रोही माथेफिरूनी गांधींजी प्रमाणे दाभोलकरांचे शरीर गप्प केले. पण त्यांच्या विवेकी विचारांना कसे गप्प करणार...
लक्षात ठेवा...
जसा जसा हा समाज विवेकी होत जाईल, तसे तसे दाभोलकरांचे प्रगल्भ विचार पसरत जाणार आहेत...
संपविला देह जरी, संपणार नाही मती
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती...
-विज्ञानराव दृष्टीकोने
दुसरे एक उत्तर
मुळात अंनिसबद्दल केवळ ऐकलेली माहिती खरी मानून अशा पोस्ट लिहणाऱ्यांना खरं तर आम्ही दुर्लक्षित करतो, पण काही चांगल्या मित्रांनी, ती पोस्ट सत्यातेसाठी पाठवली तर स्पष्टीकरण म्हणून हे उत्तर,
मुळची पोस्ट तशीच ठेवून कंसात उत्तरे दिलेली आहेत.
दाभोळकर तेव्हा तुम्ही गप्प का?....
देवाला फूल चढ़वलं जातं
तेव्हा तुम्ही रागवता!
*मग मेणबत्ती पेटवते वेळी,*
*चौथर्यावर चादर चढ़वते वेळी*
तुम्ही गप्प्प का दाभोळकर......?
(देवाला फुल वाहण्यासाठी दाभोलकरांनी विरोध केल्याचे एकतरी उदाहरण दाखवा, त्यासाठी दाभोलकरांचे आँडीओ, विडिओ आणि लेखन पुरेसे उपलब्ध आहेत.
फुल, मेणबत्ती, चादर हे भारतीय घटनेने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य अंनिसला मान्य आहे)
माझा गणपती घरी येतो
तेव्हा तुम्ही टिका करता!
*त्यांचा शांताक्लॉज येतो त्यावेळी,*
*त्यांचा मसीहा येतो त्यावेळी*
तुम्ही गप्प का दाभोळकर...?
(गणपती घरी येतो म्हणून दाभोळकरांनी केलेली टिका दाखवा, उलट कितीतरी अंनिस कार्यकर्त्यांच्या घरी गणपती येतो, त्यांना संघटनेने कधीही त्याबद्दल विचारलेलं किंवा हिणवलेलं नाही.
सांताक्लाँज किंवा मसीहा, यांच्यामुळे वाहतुक कोंडी किंवा स्पिकरचा त्रास मला तरी दिसलेला नाही. गणपतीसाठी फक्त लालबाग/खेतवाडीत फैरफटका मारा. बरं हे प्रकार पूर्वापार चालत आलेले नाहीत, गेल्या १५/२०वर्षातील धर्माच्या नावाने घुसलेलं अतिक्रमण हे धर्माचा भाग कधी झालं?
माझ्या मुलांच जावळ उतरवणं
तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत!
*त्यांचं मुल मेरीच्या मांडीवर देते वेळी*
*त्यांची सुंता होते त्यावेळी*
तुम्ही गप्प का दाभोळकर.......?
(!कुणाच्या जावळाला दाभोळकर किंवा कोणी विरोध केलेला नाही, तर सुंता किंवा मेरीला का करावा?
पण अशा न केलेल्या गोष्टीबद्दल जाब विचारताना आपली "खोटं बोला, पण रेटून बोला" हि नितीही कळते.
तोही तुमच्या धर्माचा भाग मानावा का?)
आमचे व्रत उपवास सण
तुम्हाला नकोसे होतात!
*पण त्यांचा रोजाच्या वेळी,*
*यांचा गुडफ्रायडे वेळी*
तुम्ही गप्प का दाभोळकर.......?
(पुन्हा तेच....किती खोटं बोलालं?)
माझ्या शिक्षणात धर्माला जागा नाही
*त्यांचं मात्र धर्मावर शिक्षण बंधनकारक*
*ख्रिस्ती शाळेत येशु मूर्तीरूपानं हज़र,*
त्यावेळी तुम्ही गप्प का दाभोळकर......?
(तुमच्या शिक्षणात धर्माला जागा नाही, शाळेत गणपती, हंडी, आषाढीची वारी, एवढेच काय नवरात्रीची बिनडोक मँचिग शिक्षकांकडून केली जाते ते काय असते? याबाबत ते आणि तुम्ही सारखेच आहात. आणि खाजगी शाळातील अशा गोष्टीविरुध्द काही करता येत नाही, हि आमचीही खंत आहे,
त्यांना आणि तुम्हालाही आपापले धर्म घराबाहेर हवेतच कशाला? भारतीयत्व पुरेसे नाही का?)
स्री शिक्षणातली हिंदू सावित्री
कधी तुम्ही समजूनच घेतली नाही...
*कारण मुस्लिम बुरख्यातुन,* *व पाश्चमात्य नग्नता*
चांगली वाटली ना.... दाभोलकर....?
(मुर्खपणाच्या कवितेतला मुर्खपणाचा कळस, आम्ही सावित्रीमाईचे वारस, तुम्ही तर तेव्हाही तिला शिव्याशाप आणि शेण मारत होतात, आजही तेच करत आहात,
पाश्चात्त्य नग्नतेचं आम्ही कधी, काय समर्थन केलं तेही सांगा?)
आमचे एकपत्नी राम व त्यांचं
कुटुंबनियोजन तुम्ही जगासमोर मांडलंच नाही...
*कारण एकाच पुरुषाच्या ४ बायका व त्याची २० पोर,*
*तसेच दर सिजनला बायका बदलणारे पाश्चिमात्य. तुमच्या मनाला जास्त भावले का?........*
विचार करा दाभोळकर अन मग सांगा तेव्हा तुम्ही गप्प का?
(हि तुमची पोटदुखी मात्र कळाली, एकपत्नीला विरोध आणि बहुपत्नीत्वाचं किंवा कोणत्याही स्वैराचाराचं समर्थन केलेलं एकतरी उदाहरण सांगा, उगाच नसलेल्या गोष्टी सांगून,
लोकांना भडकवण्याचे धंदे सोडा!)
*माझी ती अंधश्रद्धा जगासमोर मांडलीत, मग इतरांची ती काय?*
*म्हणे सत्यशोधक*
कुराणातील काहीच असत्य नाही का?
अन् बायबलमध्ये तिथेही काहीच असत्य नाही?
*की सत्य शोधण्याचा व अपप्रचार करण्याचा छंद केवळ हिंदुत्वा पुरताच मर्यादीत ठेवणे तेवढे* सोयीस्कर वाटले का तुम्हाला दाभोळकर???
(महाराष्ट्र अंनिस सर्वच धर्मातील शोषण करणाऱ्या सर्वच अंधश्रध्दाना विरोध करत आलेली आहे. अगदी पुराव्यासहित उदाहरणेही मिळतील. वेळ काढून कोणत्याही शाखेत या, पण ज्यांना कळूनच घ्यायचं नाही त्यांना काय कळणार? भारतीय राज्यघटनेपेक्षा कोणताच धर्मग्रंथ आमच्यासाठी प्रमाण नाही. अंनिसच्या शाखेत यायचं नसेल तर ४००रु.भरुन अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राचे वर्गणीदार व्हा. वर्षभरात राज्यभर/देशभर चाललेले अंनिसचे लढे दिसतील, त्यात तुम्ही म्हणता तसा भेदभाव अंनिस करते कि, सर्वांशी समान वागते हेही कळेल.)
दुसऱ्या धर्मातील सण आले कि काही स्वयंघोषित स्वधर्मप्रेमी (खरे तर अधर्मप्रेमी) जागे होतात, आणि आपले अज्ञान मिरवत राहतात,
आता ख्रिसमस आहे तर हे...
अंनिस शोषण करणार्या अंधश्रद्धांना विरोध करते. हे लक्षात न घेता काहीच्या काही बोलत राहतात.
सांता बंता ही अंधश्रद्धा आहे हे सर्व ख्रिस्ती लोकांना माहिती आहे. कारण त्यांना तेवढी अक्कल आहे.
सांता बंता या अंधश्रद्धेने कुणाचे शोषण होत असल्याचे आढळल्यास व प्रकरण पुराव्यासह अंनिस कडे आणल्यास, अंनिस त्यावर नक्कीच कारवाई करणार!
ऊद्या संताक्लाॅज प्रमाणेच आमच्याकडे येणारे गुरूजी भेटवस्तु का देत नाहीत? उलट शिधा व दक्षिणा का घेऊन जातात? असा प्रश्न जनतेला पडल्यास काय करावे हे हि सांगा.
फक्त ‘आपले ठेवावे झाकून, दुसर्यांचे पहावे वाकून’ ही वृत्ती कुजकट कॉमेंट करणार्यांनी सोडावी!
बाकी काही नाही..
- चला उत्तर देवू या टिम.
महाराष्ट्र अंनिस
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा