कुंकवाच्या अफवा

कुंकवाच्या अफवा... (^m^) (^j^) (मनोगते)

'महिलांनी कुंकू का लावावे ?' या फेसबुक आणि व्हॉटस्अँपवर धर्मअंध हिंदुत्ववाद्यांकडून पसरवण्यात येत असलेल्या पोस्ट्स बद्दल...

सर्व प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की त्यांनी ही फेक स्टोरी बनवली आहे. कारण चारही वेदांमधे व उपनिषदात कुठेही स्त्रियांनी कुंकू लावावे असा उल्लेख सापडत नाही. त्यांच्या अनेक शतकानंतर लिहिले गेलेल्या रामायण या ग्रंथात देखील दशरथ गेल्यानंतर त्यांच्या 3 ही पत्नीनी कुंकू पुसले असे लिहिल्याचा कुठेही उल्लेख रामयणाच्या जुन्यातल्या जुन्या प्रतीत आढळत नाही. तसेच त्यावेळच्या उत्तर भारतातील आर्य संस्कृतीत कुठेही कुंकू अस्तित्वात नव्हते. हिंदू धर्मात कर्मकांड वाढीला लागल्यानंतर स्त्रियांना दुय्यम स्थानावर टाकण्यासाठी त्याकाळच्या पुरोहितांकडून कुंकू या सौभाग्य लेण्यांवर भर देण्यात आला.

त्यासाठी छद्म विज्ञानाचा आधार घेऊन पिट्यूटरी ग्लैंड, एक्यूप्रेशर ही माहिती देखील भारतीयांना होती असे भासवण्यात आले. पण असा उल्लेख आयुर्वेदशी सम्बंधित चरक, सुश्रुत वग़ैरे कुठल्या ही ग्रंथात नाहिये. एक्यूप्रेशर ही चीनी वैद्यकीय विद्या आहे जी त्याकाळी भारतात पोहोचलीच नव्हती. कुंकू लावण्याची सुरुवात ही द्रविड़ियन संस्कृतित दक्षिण भारतात झाली. तिथे देखील जी सिद्धपैथी आहे त्यात कुंकू लावल्याने कुठे पिट्यूटरी ग्लैंड सक्रिय होते आणि एक्यूप्रेशर सारखा परिणाम होतो वैगैरे एका शब्दानेही उल्लेख नाही.

जर त्याचे वैद्यकीय फायदे हेच कारण राहिले असते तर परम्परेने पुरुषांनी देखिल रोज कुंकू लावलेले दिसले असते. बरे, कुंकवाचे आरोग्यविषयक फायदे क्षणभर गृहीत धरले तरी एवढं कुंकू परायण आणि यज्ञ करूनही भारतात मलेरिया, रक्तक्षयासारख्या कितीतरी रोगांपासून लोक मोठ्यप्रमाणात मरतच होते.  त्या काळी या विविध रोगांवर योग्य वैद्यकीय उपचार नसल्यामुळे सर्वसाधारण आयुर्मार्यादा कमीच होती. आधुनिक विज्ञानातील शोधांमुळेच मानवी आरोग्य वाढीला लागले. हे विज्ञानाचे उपकार विसरून उलट कुंकवाचेच छद्म विज्ञान तयार करून हे धर्मअंध हिंदुत्ववादी, लोकांना संभ्रमात टाकण्याचे काम मात्र इमानेइतबारे करत आहेत.

आजच्या आधुनिक युगात कुंकू लावावे किंवा नाही हा प्रश्न महिलांवर सोडून द्यायाला हावा. मुळात त्याचा संबंध नावऱ्याच्या जीवनाशी जोडून स्त्रीला त्यात अडकवण्यात आले आहे. कुंकवाने दोघांपैकी कोणाचेही आयुष्य वाढत तर नाहीच पण बाईच्या कपाळावर कालांतराने कायमचा डाग वा खड्डा जरूर तयार होतो. कुंकू लावण्यासाठी खोटे किस्से आणि कथांची निर्मिति सनातनसारख्या कट्टर व धर्मांध हिंदुत्ववादी संघटना पराकाष्ठा  करताहेत. धार्मिकता व प्राचीनतेच्या गूढतेच्या आकर्षणाचे वलय चढवल्यामुळे सामान्य लोक मात्र या कुंकवाच्या छद्म सिध्दांताला बळी पडताहेत.

याच पुरुषी मानसिकतेने भाजप सरकारने कुंकवाला GST तून वगळले; पण स्त्रियांच्या सृजनतेचा आविष्कार असलेल्या मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनस् वर मात्र 12% GST लावून स्त्रियांच्या स्वच्छतेच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. यालाच ते 'सबका साथ, सबका विकास', असे समाजताहेत! विचार करा आणि या पुरुषप्रधान मानसिकतेचा कडाडून विरोध करून विवेकाचा आवाज बुलंद करा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?