३३ कोटी देव

 


*हिंदु धर्माची निंदा करणारे लोक, हिंदु धर्मात 33 कोटि देव म्हणुन मजा उडवतात। त्या बद्दल स्पष्टीकरण*👇


*प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?*


उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड'

असाच वाटत असतो 


पण , 


येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे.  


मुळात संस्कृतमधील  "कोटि"  या शब्दाचा

अर्थ करोड नसून 'प्रकार'  असा आहे. 


ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत.


 त्यांच्यात , 


८ वसू, 

११ रूद्र, 

१२ आदीत्य, 

१ इंद्र

१ प्रजापती 

असे पाच स्तर आहेत .


प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे.


अष्टवसूंची नावे - 

आप, धृव, सोम, धर, अनिल,  अनल, प्रत्यूष आणि प्रभास . 


अकरा रूद्रांची नावे - 

मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.


बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू


१ इंद्र

आणि १ प्रजापती


असे एकंदर 

८+११+१२+१+१ = ३३...


ही माहीती सगळ्याच ग्रूपवर शेअर करा.. 


जेणेकरून '३३ कोटि' चा चुकीचा अर्थ लावणे बंद होईल  


🙏🙏🙏






तेहतीस कोटी देव

प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?

या प्रश्नावर उत्तर देतांना पोस्ट-कर्त्याने ‘कोटी’ शब्दाचा अर्थ ‘करोड’ असा न घेता ‘प्रकार’ असा घेतला आहे. त्या नुसार तेहतीस ‘प्रकार’ ची नावे दिली आहेत. तसेच कोटीचा अर्थ करोड असा लावणार्‍या आपल्याच हिंदू बांधवांना ‘हिंदू धर्माला बदनाम करणारे महामूर्ख महाभाग’ असे संबोधले आहे.

जर पोस्ट कर्त्यांचे म्हणणे खरे मानले तर काही प्रश्न पडतात:  

1. कोटीचा अर्थ प्रकार व 33 प्रकारचे देव, हा शोध कुठे आणि कसा लागला? 

2. कोणत्या ईश्वराने हे 33 प्रकार (प्रत्येक प्रकाराचे कार्य कोणते?) निर्माण केले, त्याचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे?

3. त्यांना प्राप्त झालेले हे एवढे अगाध ज्ञान गेली हजारों वर्षे कुठे होते? 

4. या आधीचे समस्त हिंदू पूर्वज कोटीचा अर्थ करोड असाच लावत होते. ते सुद्धा ‘महामूर्ख महाभाग’ होते काय? आणि महामूर्ख असावेतच, कारण पोस्ट-लेखकाने हा नवीन शोध लावून ते सिद्ध केले आहेच. 


खरे तर, तेहतीस कोटी देवांची नावे विचारल्यावर ती सांगता येत नव्हती म्हणून हा मारून मुटकून लावलेला शोध दिसतो आहे. आणि शिरजोरी म्हणजे कोटीचा अर्थ करोड असा घेणार्‍यांना महामूर्ख संबोधण्याचा माज हे लेखक दाखवतात.  परंतु पुढील वेबसाइटवर कोटीचा अर्थ प्रकार नसून करोडच आहे असे सनातन धर्माचा व ग्रंथांचा आधार घेऊन ठासून सांगीतले आहे. या लिंक वरील मजकूर कृपया वाचवा:   

http://hindi.webdunia.com/sanatan-dharma-article/hindu-goddess-and-god-33-million-or-kind-116111000018_1.html 

आता मूळ पोस्ट लेखकाने व त्याचा प्रचार करणार्‍यांनी  आपली भूमिका स्पष्ट करावी व कोण मूर्ख आहे ते पण वाचन, चिंतन, मनन करून व मुळाशी जाऊन समजून घ्यावे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य