पोस्ट्स

पुणेकर आणि शास्त्रज्ञ

*एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ* - तुम्ही मला देव दाखवा *पुणेकर* - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा *शास्त्रज्ञ* - थोड्यावेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल *पुणेकर* - तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल 😂😂 ============================= याला उत्तर  *शास्त्रज्ञ* - तुम्ही मला देव दाखवा. *पुणेकर* - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा. *शास्त्रज्ञ* - थोड्यावेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल. *पुणेकर* - तुम्ही आणखी थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल. *शास्त्रज्ञ*- मी सांगितलेल्या पद्धतीने ऑक्सिजनचे अस्तित्व  समजून घेतलेली लाखो उदाहरणे आहेत...  पण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने देव दिसल्याचे एकही उदाहरण नाही.😂😜😂 (अग्रेषित)
 *राखी विकत त्यांच्याकडूनच घ्या* *जे रक्षाबंधन साजरे करतात* *वाक्य लहान अर्थ महान* 🙏 *हिंदू धर्मरक्षक* 🙏 ======================== या पोस्टला उत्तर *राखी विकत त्यांच्याकडूनच घ्या* *जे रक्षाबंधन साजरे करतात आणि त्यांचाकडून सुद्धा घ्या जे साजरे करीत नाही…* *त्यांनाही कळू द्या रक्षाबंधनाचा खरा अर्थ...* *वाक्य लहान पण मानवतेचा अर्थ महान* 🙏 *जय संविधान* 🙏

महालक्ष्मी कॅलेंडर मधील भाकीत

घरात महालक्ष्मी कॅलेंडर असेल तर जुलै 2021 महिन्याचं पान उघडा, उजव्या हाताला 'पर्जन्य अंदाज' चा रकाना बघा.  8-9 महिन्यांपूर्वी सूर्याची स्थिती 22 जुलैला कोणत्या नक्षत्रात असेल, त्यावरून त्यांनी पावसाचा अंदाज लावला आहे. त्यात भरीस भर म्हणजे पूर येणार हे भाकीतही केलं आहे. त्यानुसार 22 जुलैला झालेल्या पावसामुळे कोकणात बहुतेक सर्वच ठिकाणी पूर आलेला आहे.  आता महत्वाचा मुद्दा, काही पुढारलेली लोकं, ज्यांचं मस्तिष्क अभिनव शैक्षणिक पद्धतीने तासून घेतलेलं आहे असे वास्तववादी लोक या हिंदू ज्योतिष शास्त्राला आणि पंचांगाला थोतांड म्हणून हिणवतात आणि हे पंचाग बघणाऱ्या विशारदांना किडमिडे गुरुजी म्हणून टोपण नावे ठेवतात.  मला अशा सो-कॉल्ड सुधारलेल्या लोकांना एवढंच सांगावस वाटत की ब्रिटिशांच्या मार्गदर्शनाच्या आणि शिक्षणपद्धतीचा कुबड्या घेऊन तुम्हाला वाटत असेल की तुमचा सर्वांगीण विकास झाला आहे तर खरं म्हणजे ते तुमचं वैचारिक अध:पतन आहे. हिंदू संस्कृती ही विश्वगुरु होती आणि भविष्यातही राहील, कुणी परकीय शक्तीने तिच्या बद्दल कितीही वाईट गोष्टींचा प्रचार केला तरी तिचे सत्व तुसभरही कमी होणार नाही. ...

*ईद आणि अंनिस* या विषयावरील पोस्टला उत्तर

*ईद आणि अंनिस* या विषयावरील पोस्टला उत्तर: –  उत्तम जोगदंड. बकरी ईद निमित्त अंनिसला टार्गेट करणारी आणि मुस्लिम विद्वेष ओकणारी एक पोस्ट आज समाज-माध्यमांवर फिरत आहे. ही पोस्ट वाचून, काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी हिंदू धर्माला किती इस्लामावलंबी केलंय, इस्लामची सावली बनवले आहे याची जाणीव होते आहे. विशेष म्हणजे स्वतःत कसलीही हिम्मत नसलेले हे लोक आपला मुस्लिम द्वेष व्यक्त करण्यासाठी अंनिसचा आधार घेत आहेत आणि एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता त्या पोस्टमधील एक एक मुद्द्यावर विचार करू या:  पोस्ट:  देवीपुढे कोंबड्याचा बळी देणे अंधश्रद्धा म्हणणारी 'अंनिस' आज बकरी ईदला आपल्या बायकोच्या पदरात लपून बसणार आणि एकदम २३ जुलैला बाहेर येणार! उत्तर :  *याचा अर्थ असा होतो की हिंदू लोक देवीपुढे कोंबडे/बकरे कापतात ही अंधश्रद्धा आहे हे अंनिसचे म्हणणे लेखकास मान्य आहे. तसे नसेल तर ईदला बकरी कापतात म्हणून हिंदू लोक देवीपुढे कोंबडे/बकरे कापतात असा तर्क लेखक करू इच्छित आहेत काय?  दुसरे म्हणजे, मुसलमानांच्या ईदला बकरी कापतात त्या प्रकाराला अंनिसवाले घाबरून जाऊन अंधश्रद्ध...

परधर्म द्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या चुकीच्या प्रश्नांना खरी उत्तरे...

परधर्म द्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या चुकीच्या प्रश्नांना खरी उत्तरे... – उत्तम जोगदंड. सुशिक्षीत हिंदु मित्रानो खालील प्रश्न गांभीर्याने वाचा व त्यांची उत्तरे शोधा या धर्मांध  पोस्टला उत्तर :  1. आज जगामधे 56 देश अधिकृत इस्लामीक देश आहेत. 112 देश अधिकृत ख्रिस्तीयन देश आहेत. 11 देश अधिकृत बौध्द धर्मीय देश आहेत. वीस लक्ष लोकसंख्या असणारा इस्त्राइल अधिकृत ज्यु धर्मीय देश आहे. एक ते दोन लक्ष लोकसंख्या असणारे व तालुक्याएवढे क्षेत्रफळ असणारे मुस्लिम व ख्रिस्ती यांचे जगात अनेक देश आहेत, पण 100 कोटी हिंदु धर्मीयांसाठी संपुर्ण पृथ्वीतलावर एकही हिंदुराष्ट्र का अस्तित्वात नाही ? मुस्लिम व ख्रिस्ती यांच्या लहान देशाना देखील आदर व सन्मान मिळतो मग 100 कोटी हिंदुंसाठी हिंदुराष्ट्र का असु नये ? भविष्यात जगामधे धर्माच्या आधारावर तिसरे महायुध्द होण्यची शक्यता आहे अशा वेळी हिंदुंनी कोणाकडे मदतीच्या अपेक्षेने पहायचे ? उत्तर:  1. एक तर अधिकृत धर्म असलेल्या देशांची आकडेवारी चुकीची आहे. अधिक महितीसाठी पुढील लिंक पहावी (https://simple.wikipedia.org/wiki/State_religion#Hindu_countries)  एक हिंद...

पुराणातील वांगी: ककनमठ मंदिर

⛔ * गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणारे  ककनमठ मंदिर! * — कौस्तुभ शेजवलकर (14 jun 2021) "गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या मंदिराची गोष्ट" ह्या ककनमठ मंदिरासंबंधीच्या संदेशात त्याचे लेखक, विनीत वर्तक, हे अनाहूतपणे किंवा सहेतुकपणे उपायोजित विज्ञान (applied science) आणि मूलभूत विज्ञान (pure science) यांत गल्लत करत आहेत. आधार घेऊन, अडखळत चालणारं लहान मूल, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल ह्या गोष्टी शिकल्यावर मग आधाराशिवाय चालायला लागत नाही तर ते आधी आधाराशिवाय चालायला लागतं आणि नंतर कधीतरी ह्या गोष्टी, न्युटनचे गुरूत्वाकर्षणाचे नियम वगैरे शिकतं. एवढंच कशाला, रस्त्यावर उंच ताणलेल्या दोरावर कसरतीचे खेळ करणारे कित्येक डोंबारी तर बहुधा जन्मात कधीही न्यूटन, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल यातल्या कशाशीही पाला न पडतादेखील न पडता आयुष्यभर कसरत करतात. त्यामुळे ककनमठ मंदिर हे आजही न पडता उभं आहे म्हणजे ते बांधणाऱ्या स्थापत्यकारांना गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि त्यांचं विज्ञान माहित होतं हा दावा, मूल आधाराशिवाय चालतंय, किंवा डोंबारी न पडता कसरती करतोय म्हणजे त्यांनाही गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि विज...

मुस्लिम सरकारी नोकर, चार बायका आणि पेंशन

*डोके थंड ठेवून वाचा.* *विषयाची गंभीरता समजा.*  समजा एक *मुस्लिम* गव्हर्नमेंट ची नोकरी करून जेंव्हा निवृत्त झाला आणि त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या जर चार बायकां असतील तर त्यांना पेंशन कसे देतात?  *उत्तर* :- नॉमिनेशन बघितलं जातं आणि नक्की केलं जातं की किती टक्के कुणाला द्यायचे ते. नॉमिनेशन नसेल तर चौघीना 25% वाटून देतात. एखादी मेली तर बाकीच्या तिघींचा 33.33% देतात. दुसरी मेली तर बाकी जिवंत असणार्या दोघीं ना 50%वाटून देतात.  तिसरी मेली तर शेवटची ला 100% पेंशन देतात.  *आता विचार करा*..... की  पहिली 60 , दुसरी 50 तिसरी 40 आणि चवथी 30  वर्षाची असतील तर  ,आणि सर्रास सगळ्या 70 वर्षे जगल्या तर  , एकूण  10+20+30+40 =100 वर्ष  पेंशन मिळवणार.   अन्य धर्माची पत्नी 10 किंव्हा जास्तीत जास्त 20 वर्ष पेंशन मिळवणार.   म्हणजेच चवथी पत्नी ही आयुष्यभर  पेंशन मिळविण्या साठी मुस्लिम वयस्करा शी रियायरमेंट पूर्वी लग्न करते.  आता हा सर्व्हे करणं जरुरी आहे की किती टक्के मुस्लिम वयाच्या ५५ वर्षां नंतर शरीयतचा फायदा घेऊन ४ लग्न करतात ?......