ऋषी सुनक यांनी दिवाळी साजरी केली पण...
ज्या देशाने १५०वर्षे हिंदुस्थानावर राज्य केले. त्याच देशाचा पंतप्रधान आज हिंदू आहे. व हिंदू सणाचा आनंद पतंप्रधान निवासात साजरा करत आहेत. *हिंदू धर्माची ताकद आज जगाला दिसत आहे .यापेक्षा दीपावलीचा आनंद असू शकत नाही.*
तिकडे धर्म-आचरणाचे मुक्त स्वातंत्र्य असल्याने आणि अन्य अल्पसंख्यक धर्मांचा आदर केला जात असल्याने हे शक्य होत आहे. ख्रिस्ती बहुमतात आहेत म्हणून तिथल्या ख्रिस्ती लोकांवर ख्रिस्ती धर्माची जबरदस्ती केली जात नाही. "जय श्रीराम" बोल नाही तर मार खा, असा प्रकार तिकडे नाही. बसता उठता इथे जसे अल्पसंख्यक धर्मीयांविरुद्ध गरळ ओकले जाते तसे तिथे नाही. म्हणून तिथे हिंदू असल्पसंख्यक व्यक्ति प्रधान मंत्री बनू शकते. मुसलमान देखील बनू शकेल. आता तिथे हिंदू पंतप्रधान म्हणून 10 डाउनिंग स्ट्रीट या अधिकृत निवासात दिवाळी साजरी केली जात असेल आणि त्यासाठी इथले तथाकथित हिंदू हुरळून जात असतील तर त्यांनी पुढील व्हीडीओ पहावा. यामध्ये हे हिंदू पंतप्रधान चक्क ख्रिसमस ट्रीची लाइट पेटवून ख्रिसमस साजरा करीत आहेत. (https://www.youtube.com/watch?v=KEln48SuHmE )
तसेच याच पंतप्रधान निवासात ईद सुद्धा साजरी केली जाते याचाही व्हीडीओ पहावा. (https://theprint.in/world/prime-minister-rishi-sunak-extends-eid-wishes-to-muslims-in-uk-around-the-world/1531795/ )
हे सर्व पाहता इथल्या हिंदुत्ववाद्यांच्या व्याख्येनुसार सुनक हे लिब्रांडू, सिक्युलर, फुर्रोगामी ठरतात. पण डोळ्यावर हिदुत्वाचा फिल्टर फिल्टर लावलेल्या विकृत लोकांना फक्त त्यांचे तिकडे साजरे केलेले हिंदू सणच दिसतात. एवढा त्यांचा अभिमान वाटत असेल तर त्यांच्यासारखे लिब्रांडू, सिक्युलर, फुर्रोगामी होऊन दाखवावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा