Uniform Civil Code समान नागरी कायदा
मूळ पोस्ट
#UniformCivilCode
समजून घेऊया...
समजा एका हिं*दू 40 वर्षीय इसमाने 10 वर्षांच्या बालिकेशी विवाह केला तर तो बालविवाह कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र आहे, कारण ??- हिंदू कोड बिल, हिंदू विवाह कायदा = संविधान .
पण,...
समजा एका मु$लीम 40 वर्षीय इसमाने 10 वर्षांच्या बालिकेशी विवाह केला तर तो बालविवाह कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र नाही,कारण ?? मु$लीम लॉ बोर्ड,शरीया कायदा ? = No संविधान
एकाच गुन्ह्यासाठी, एकाच सेक्युलर देशात दोन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ??
एकाच सेक्युलर देशात एकाच वेळी एक जण संविधान पाळणार आणि दुसरा पाळणार नाही ?
ऐसा कैसे चलेगा मियां?
हिंदू बालिकेसाठी जो अन्याय आहे तो मु$सलमान बालिकेसाठीपण अन्यायच असला पाहिजे ना ?
इथे येतो UCC
Uniform Civil Code
सगळ्यांना समान कायदा,समान नियम म्हणजेच #UCC
#शिवानी गोखले
========
या पोस्टला उत्तर
#UniformCivilCode
UCC जरूर हवा पण अफवा आणि दिशाभूल यापासून दूर रहा: उदा. शिवानी गोखले यांची पोस्ट
१) उदाहरण देतांना १० वर्षे असे मुस्लिम मुलीचे वय गृहीत धरून ते लग्न शरियानुसार योग्य गृहीत धरले आहे. हे चूक आहे. शरियानुसार आणि न्यायालयांच्या निर्णयानुसार हे वय १५ वर्षे आहे. समान नागरी कायदा मागताना असा खोटारडेपणा का?
२) मुस्लिम मुलींचे वय शरियानुसार १५ वर्षे असून सुद्धा त्यांच्यात ४८ टक्के मुलींची लग्ने १८ वर्षांचे वय गाठण्याआधी होतात. हिंदूंना बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू असून सुद्धा ४९ टक्के मुलींची लग्ने १८ वर्षे वय गाठण्याआधीच होतात. ( https://india.unfpa.org/sites/default/files/pub-pdf/analytical_series_1_-_child_marriage_in_india_-_insights_from_nfhs-5_final_0.pdf )
देशात असलेले संविधान आणि विवाह कायदा मोठ्या प्रमाणात तोडून आपल्याच हिंदू बलिकांवर अन्याय करायचा आणि शरियावाल्यांच्या मुलींसाठी गळा काढायचा, ये दुटप्पीपणा और खोटारडेपणा कैसा चलेगा भाऊ?
आधी आहे ते कायदे पाळायला शिका आणि मग UCCविषयी बोला.
Great article! For more information on job opportunities, check out Naukri Kendra.
उत्तर द्याहटवा