🔴🔴🔴

*(३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर "अरे_कुठायत_ते ?" हा मेसेज व्हायरल होत आहे या मेसेजला "चला उत्तर देऊया" टीमने दिलेले उत्तर)*


(व्हायरल होत असलेला मेसेज)

👇🏼👇🏼👇🏼

#अरे_कुठायत_ते?

रात्री १० नंतर फटाके वाजवायचे नाही असा #आदेश (?) असूनही ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता फटाके वाजवून देणारे #पर्यावरणपुळके कुठेयत? कुठेयत त्या #शाळा त्या #समाजसेवी_संस्था, ती शाळेतली लहान असमंजस कोवळी मुले? शाळेतील लहान मुलांना #फटाके विरहित दिवाळी साजरी करायच्या शपथा देणारे #शपथवीर कुठेयत? शाळेतील लहान मुलांना #आवाजमुक्त दिवाळी साजरी करायच्या शपथा देणारे #शपथसुंभ कुठेयत? फटाका विरहित, आवाज विरहित, प्रदूषण विरहित ३१ डिसेंबर साजरा करण्याचा शपथा या लहान मुलांना शाळेशाळेत जाऊन देणार का?  कुठेयत ते मराठी, हिंदी चित्रपट आणि सिरीयल मध्ये काम करणारे #पर्यावरणरक्षक  #कलाकार?

अहो ३१ डिसेंबर जवळ येत चाललाय.. अरे कुठे आहात तुम्ही? असे गप्प का? पर्यावरण,प्रदूषण, ध्वनी प्रदूषण तुमची #डोळ्यात_प्राण आणून वाट पाहत आहे.    


*या मेसेजला "चला उत्तर देऊया" टीमने दिलेले उत्तर..*

👇🏼👇🏼👇🏼


*#अरे_कुठायत_ते अंधभक्त ?*


*⭕ रात्री १० नंतर फटाके वाजवायचे नाही असा शिंदे- फडणवीस सरकारचा आदेश (?) असूनही दिवाळीला रात्री १-२ वाजेपर्यंत लाखो रुपयाचे फटाके फोडून प्रचंड प्रदूषण करणारे, आणि ३१ डिसेंबरला दुसऱ्यांच्या नावे बोंबलणारे ?*


*⭕ कुठेयत ते, जे स्वतःचे ठेवतात झाकून आणि नेहमी दुसऱ्या धर्माचं पाहतात वाकून आणि पर्यावरणाची जराही काळजी नसलेले समाजसेवेचा आव आणणारे लोकं, पक्ष आणि संघटना.*


*⭕ कुठेयत ते, जेव्हा शिंदे-देवेंद्र फडणवीस शाळेतील मुलांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा अशी शपथ घ्यायला लावत होते, तेंव्हा त्यांना ३१ डिसेंबरला मुलांना शपथ घ्यायला का लावत नाही असे ठामपणे जाब विचारणारे आणि शिंदे-फडणवीस यांचा निषेध करणारे *देशभक्त (?).*


*⭕ कुठेयत ते, जे रात्री १० नंतर फटाके वाजवल्यामुळे पोलिसांचे  फटके खाल्लेले आणि जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीसखात्याबद्दल संशय व्यक्त करतात अशी लोकं.*


*⭕ कुठेयत ते, कि ज्यांना हे माहितच नसते (किंवा जाणून घ्यायचे नसते किंवा तेव्हढा अभ्यास नसतो) कि ग्रीन होप संघटना, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ( CPCB),  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  सारख्या पर्यावरण प्रेमी संघटना नुसत्या दिवाळीत नाही तर वाढदिवस,  कोणत्याही धर्माची लग्न, निवडणुका, समारंभ आणि  31 डिसेंबरच्या वेळी फटाके फोडू नका,  प्रदूषणमुक्त  सण-समारंभ साजरे करा, फटाकेमुक्त नववर्षाचे स्वागत करा असे आवाहन शाळा कॉलेजमध्ये, सोशल मिडियामध्ये दरवर्षी करीत असतात.*


*अहो, आपण सगळे प्रदूषणाच्या विळख्यात फसलेले आहोत, दिवाळी असो, ईद असो वा ३१ डिसेंबर असो, फटाके फुटल्यावर ऑक्सिजन किंवा ओझोन सोडत नाहीत तर विषारी व प्रदूषणकारी वायुच सोडतात. मंजुळ स्वरात न फुटता ध्वनिप्रदूषणहि होतेच. चला,आपण प्रदूषणाच्या विरोधात बोलूया, कोणत्याही धर्माचे सण-समारंभ फटाकेमुक्त साजरे करूया, यासाठी आपला महाराष्ट्र डोळ्यात_प्राण आणून वाट पाहत आहे.*


*#असो दिवाळी, असो ३१ डिसेंबर*

*#करू साजरे फटाकेमुक्त*


*चला उत्तर देऊया - टीम*

🛑🛑🛑

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली?