*राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत.* _राजीव दीक्षित यांच्या आवाजात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबतची सत्यता_ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्याच्या अवघ्या नऊच दिवसांत राजीव दीक्षित यांच्या आवाजातील जवळपास साडेतीन तासांचा एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड झाला. ते ऑडिओ स्वरूपातील भाषण आहे. त्याला अगदी व्यवस्थित एडिट करून, ॲनिमेशन समाविष्ट करून हा व्हिडीओ युट्युबवर अपलोड केलेला आहे. (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूची ते वाटच पाहत होते का?) त्यापूर्वी कुणालाही माहीत नसलेला व्हिडिओ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतरच युट्युबला अपलोड झाला, यालाही एक कारण आहे. व्हिडिओ पाहताना पहिल्या काही मिनिटांत हे कारण उघड होते. ते कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये असलेली धादांत खोटी विधाने. त्या खोट्या विधानांना उत्तर देऊ शकणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात नसल्याचा फायदा घेण्यासाठीच जणू हा व्हिडिओ त्यांच्या मृत्यूनंतर युट्युबवर अपलोड केला असावा. खरे तर त्याचवेळी काही अंनिस कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आली होती. परंतु विरोधकांना उत्तरे देण्यात वेळ न घालवता कामावर लक्ष...
(१) एकाही नदीला शबनम, शबाना, रुखसाना असे नाव नाही, कारण गंगा यमुना नर्मदा सारख्या अनेक नद्या अनादी काळापासून आहेत. (२) अब्दुल, सलीम चे नाव एकाही पर्वताला देता आले नाही, कारण हिमालय, निलगिरी असे अनेक पर्वत अनादी काळापासून आहेत. (4) पींपळ वड,लिब सारख्या अनेक झाडांची नावे उर्दूमध्ये का नाहीत? (५) तुळशी, अर्जुन ,पळस अशा अनेक वनस्पतींची नावे उर्दूमध्ये का नाहीत? (६) आयुर्वेदाची औषधी प्रत्येकाला लागते, पण हे वेद नाव उर्दूमध्ये का नाही? (७) रहीम, अकबर हे नाव एकाही महासागराला देऊ शकले नाहीत, कारण प्रशांत, हिंदी महासागर सारखे अनेक महासागर अनादी काळापासून आहेत. (8) चार दिशांची नावे उर्दूमध्ये का नाहीत? (9) नेमक्या औषधाला रामबाण उपाय का म्हणतात, अल्लाबाण, येशूबाण का नाही? कारण :- मुघलांनी केवळ मंदिरे पाडून मशिदींची, गावांची आणि शहरांची नावे बदलली आहेत. नद्या, पर्वत, समुद्र यांची नावे अजूनही चिरंतन आहेत. हे शाश्वत सत्य आहे... यालाच म्हणतात सनातन...🚩🕉🙏🏻 ।। जय श्रीराम ।। ।। जय हिंदुराष्ट्र ।। ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ उर्दू भ...
सध्या *'काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य'* या शीर्षकाचा एक लेख सोशल मीडियामधून पसरतोय. त्यामध्ये म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. 1) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो. 2) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत अ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा