स्वत:ला तथाकथित अतिव विज्ञानवादी नास्तिक म्हणवून घेणारे तर सगळ्यात मोठे स्वार्थी लोकं असतात. विज्ञानाने निसर्गाचा समतोल बिघडला हे मान्य करायचं नाही आणि दोष देवाला द्यायचा ज्याला ही लोकं मानत नाहीत.
*"दगडाच्या देवाने अडचणीच्या वेळी मंदिराचे दरवाजे लावून घेतले, पोलीस, हॉस्पिटल, डॉक्टर हेच खरे देव आहेत" ह्या आशयाचा मेसेज फिरतोय.*
*कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यास सांगितल्याने नास्तिकतावाद्यांचे फावले आहे, लगेच धर्म बेकार असल्याचे आणि विज्ञानाच्या महतीचे संदेश चालू केले आहेत !*
*मात्र यामागील खरे कारण समजून घेतले आहे का?*
देवाने सांगितलं नव्हत विज्ञान वाद्यांना जगाचा संहार करणारे जेनेटिकली मॉडिफाईड विषाणु जैविक युद्धासाठी बनवायला...
देवानी अजिबात नाही सांगितले डुक्कर खा,कुत्री,मांजर,किडे मकोडे ,वटवाघूळ खा,
देवाने सांगितलं नव्हत मांसाहार करा,
देवाने सांगितलं नव्हत प्रदुषण करा, निसर्गाच वाट्टेल तस दोहन करायला,
देवाने सांगितलं नव्हत निसर्गाचा नाश करा आणि स्वतःचा विकास करा.
1. मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे?
तर काही नाही.👎
औषधच उपलब्ध नाही म्हणून 10000 हूनन अधिक बळी गेले, त्याला विज्ञानाचे अपयश कारणीभूत आहे ना !
2. आज जी काही काळजी घेण्यास सांगितले जाते, ती हिंदू धर्म अगोदरच सांगत होता, मात्र तेव्हा पाश्चात्य रीतीने वागणे म्हणजे आधुनिकता सांगत होते.
3. कोरोनाचा उद्भव कोणी केला?
धर्माने तर निश्चित नाहीच. तुमच्या त्याच तथाकथित विज्ञानाच्या अतिरेकी वापराचा जेनेटिकल मॉडिफाईड आणि अधर्मी अपवित्र आहार विहारांतून, विचारातून कोरोना तयार झाल्याचे आज स्पष्ट होत आहे.
4. कोरोनामुळे फक्त मंदिर बंद झाले का? तर नाही !
बंद तर.. विमानतळे, बस-रेल्वे स्थानके, मॉल, शॉपिंग सेंटर्स, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, थिएटर्स, आदि विज्ञानाने शोध लावलेली ठिकाणेही सर्व बंद आहेत। मग त्याचा दोष कोणाला - देवाला?
4. तशीही मंदिरे सुद्धा देवाने नव्हे, तर सरकारने बंद ठेवण्यास सांगितली आहेत. कुठेही लोकांनी घाबरून मंदिरात जाणे बंद केले होते का? तर नाही !
👉 *कोरोना मुळे मंदिरे बंद... असं म्हणणाऱ्यांसाठी*
☑️ *ह्या रोगाचा उगम कसा झाला?
या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर लक्षात येईल की मानवाने केलेल्या अनैसर्गिक चंगळवादी, अशुद्ध कृतींचा परिणाम म्हणजे असे आजार.*
☑️ *आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी शिकवलेली पवित्र आचार विचारांची जीवनशैली सोडून अहंकाराने निसर्गावर अधिराज्य करण्याच्या नादात आता स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.*
☑️ *दवाखाने झालेले आजार बरा करतात, परंतु असे आजारच होऊ नये याचे शिक्षण वैदिक हिंदू जीवनशैली आयुर्वेद देते आणि ही जी मंदिरे बांधली जातात ती असे पवित्र ज्ञान प्राप्त करण्याची ठिकाणे असतात. आपला आहार, विहार कसा शुद्ध व पवित्र असावा?
योग, ध्यानसाधना, सूर्यनमस्कार का करावेत? यासाठी, आरोग्यपूर्ण जीवनासाठी हिंदू जीवनशैलीने दिलेली ही देण आहे.*
☑️ *हिंदू संस्कृतीने शिकवलेले प्रत्येक मूल्य, प्रत्येक कृतीत खूप मोठा अर्थ लपलेला आहे.
हस्तांदोलनापेक्षा पेक्षा हात जोडून नमस्कार कधीही चांगला, हे आता जगाने मान्य केलंय. म्हणून आपली संस्कृती विसरू नका नाहीतर फक्त दवाखानेच उरतील.*
☑️ *शाळा, दवाखाने, संशोधन केंद्रे जरूर उभारावीत ती काळाची गरज आहेच. पण याचा अर्थ असा नाही की मंदिर नको. मंदिरे शुद्ध जीवन, आचार विचार शिकण्याची केंद्रे आहेत.*
☑️ *चुकीचे मेसेज पसरविण्यापेक्षा निसर्गाचे संवर्धन करा, सुंदर हिंदू जीवनशैलीचे आचरण करा आणि त्यात आपले योगदान द्या.*
राहिला प्रश्न मंदिरांचा तर नित्य पुजा, आरती, हवन सगळ काही सुरळीत सुरू आहे फक्त मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये आणि रोगाचा प्रसार होऊ नये त्यासाठी खबरदारी म्हणून ह्या उपाययोजना केल्या जातात एव्हढी साधी अक्कल नसेल तर कसले intellectual तुम्ही!
आणि पोलिस, हॉस्पिटल यांच्यातच काय तर मातीच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक जीवा मधे ईश्वर आहे अस आमचा हिंदु धर्म शिकवतो त्यामुळे आम्हाला ज्ञान कोणी शिकवूच नका!
आपलेच काही येडे हिंदु व्हॉटसअप वर कुठलाही मेसेज त्याच्या होणाऱ्या परिणामांची काळजी न घेता फॉरवर्ड करत असतात आणि आपण जगापेक्षा वेगळे आहोत अस भासवतात.
-
🕉️🚩🙏🏼
~~~~~~~
उत्तर
१)'विज्ञानवादी आणि नास्तिक लोक सगळ्यात मोठे स्वार्थी असतात' असे एक सरधोपट वाक्य या वरील पोस्टमध्ये आहे. ते जाणीवपूर्वक बुद्धीभेद घडविण्यासाठी फेकलेले असते. त्यांच्या मते विज्ञानाने निसर्गाचा समतोल बिघडला हे मान्य करायचे नाही हा तो स्वार्थ. मुळात विज्ञान हे निसर्गाची रहस्य शोधून काढते आणि त्याचा मानवी कल्याणासाठी वापर करते. त्यामुळे विज्ञानवादी व्यक्ती या मानवतावादी देखील असतात. मात्र या शोधांचा वापर कसा करावयाचा हे त्या वापरणाऱ्यावर अवलंबून असते. त्यात विज्ञानाचा काय दोष? अणूच्या शक्तीचा शोध लावणारा आईनस्टाईन (विज्ञानवादी) हा अणूबाँबचा वापर केला जावू नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करीत होता.आणि पोखरणमध्ये अणूचाचणी यशस्वी झाली तेव्हा 'आता पाकिस्तानला चांगला धडा शिकवता येईल' म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटणारी युद्धखोर मानसिकता असणारेच विज्ञानाला शिव्या देण्यातही पुढे असतात. विज्ञानाने लावलेल्या शोधांचा पुरेपुर वापर करत विज्ञानालाच दोष देणे ही या दुटप्पी भोंदूंची खासियत असते. संस्कार, सत्संग चँनल बघितले की याचा प्रत्यय येतो.
२)'दगडाच्या देवाने अडचणीच्या वेळी दरवाजे लावून घेतले' या आशयाची पोस्ट विज्ञानवादी किंवा नास्तिक व्यक्तीची नाही. तर तो अग्रलेख आहे "सामना" या वर्तमानपत्राचा.आणि सामना हे प्रखर हिंदूत्ववादी पक्षाचे मुखपत्र आहे.
३)कोरोना विषाणू हा जैविक युद्धासाठी बनविलेला होता असा आरोप निराधार आणि गैरसमज पसरविणारा आहे. युद्धाची मानसिकता ही मानवतेविरोधीच आहे. पण दररोज ऊठसूट पाकिस्तान विरोधी भडक वक्तव्ये करणाऱ्यांचे समर्थन हीच मंडळी करतात आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतात हे पाखंडीपणाचे आहे.
४)यात मांसाहाराबाबत देखील अवैज्ञानिक नोंदी आहेत. खरेतर चीनमधल्या मासळी बाजारातून या विषाणूचा प्रादुर्भाव झाला. पण या प्राणी ,किटकांच्या यादीतून मासे सोयिस्कररित्या वगळले आहेत. कारण भारतातील कोकणासह द.भारत, प.बंगाल येथील बहुसंख्य लोकांचा मासे हा प्रमुख आहार आहे. अगदी धर्माच्या ठेकेदारांचा सुद्धा.(by the way माझे कुटुंब पूर्णतः शाकाहारी आहे.)
महत्त्वाचे ज्या हिंदू संस्कृतीच्या पवित्र आहार विहाराबद्दल येथे फार गौरवोद्गार काढले आहेत ती वैदिक संस्कृती शाकाहारी नव्हतीच. यज्ञामध्ये विविध प्राण्याचे अगदी घोडा, गायी यांचे बळी दिले जात व त्याचा भोजनात वापर होई.याचे कितीतरी पुरावे वेद,पुराणात मिळतात. जे बाबासाहेबांनी रिडल्स ऑफ हिंदूईझममध्ये दाखविले आहेत. खरेतर यज्ञांमधील हिंसेचा विट येऊनच या देशात बुद्ध आणि जैन हे अहिंसावादी तत्वज्ञान विकसित झाले हा इतिहास आहे. पण खोटा इतिहास सांगण्यातच आमची कर्तबगारी आहे.
५)मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे काय उत्तर आहे? असा एक शाहजोग प्रश्न यात आहे. सध्या जी काळजी आपण घेतोय आणि मास्क(जे देवाच्या मूर्तींना देखील लावले) सेनेटायझर, वैद्यकीय उपचार वापरतोयत ती सारी विज्ञानाची देण आहे. आणि जगभर जे संशोधन सुरू आहे ते सुद्धा वैज्ञानिकच करीत आहेत. तथाकथित प्रवचनकार, पाद्री, मुल्ला- मौलवी किंवा गायींचे धर्मरक्षक नाहीत.
६)आज जी काळजी घेण्यास सांगितले जाते, ते धर्म आधीच सांगत होता हे आपल्यालाच कुरवाळण्यात धन्यता मानण्यासारखे आहे. धर्मातील चांगल्या गोष्टींचे स्वागतच आहे. पण आम्हीच खरे आणि श्रेष्ठ असे म्हणण्यात इतरांना हिणविण्याचा अभिनिवेश असतो. आपले सर्वच खरे तर त्या काळात, देवीच्या रोगाला देवीचा कोप म्हणणाऱ्यांनी लसीकरण करायलाच नको होते.आणि सर्वधर्मिय धर्मगुरुंनी प्लेग सारख्या रोगांवर अंगारे-धुपारे करीत बसायला हवे होते.
आख्ख्या जगाला योग शिकवणारे रामदेव बाबा परदेशात जाऊन स्वतःवर उपचार करुन आलेच ना?
मंदिरातील नित्य पूजेला विरोध असण्याचे कारण नाही. उपासनेचे स्वातंत्र्य संविधानानेच दिलेले आहे. पण कोणताही धर्म सार्वजनिक आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था याच्या आड येत असेल तर त्या धर्माचा संकोच करण्याचा अधिकार देखील संविधानानेच दिला आहे.
तूर्तास एवढेच.
*क्रुपया हा वैचारिक मतभेद आहे. तो व्यक्तीगत घेऊ नये आणि परिणाम आपल्या मैत्रीपूर्ण नात्यात होवू नये.कारण धर्माच्या नात्यापेक्षा माणूसकीचे नाते श्रेष्ठ असते.*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा