*नास्तिकांना चपराक देणारे कोरोनाचे वास्तव....!* 

👏🏻👏🏻👏🏻👏🏻

 *कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यास सांगितल्याने नास्तिकतावाद्यांचे फावले आहे, लगेच धर्म बेकार असल्याचे आणि विज्ञानाच्या महतीचे संदेश चालू केले आहेत !*
*मात्र यामागील खरे कारण समजून घेतले आहे का?*
1. मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे, तर काही नाही. औषधच उपलब्ध नाही म्हणून 6000 हुन अधिक बळी गेले, त्याला विज्ञानाचे अपयश कारणीभूत आहे ना !
2. आज जी काही काळजी घेण्यास सांगितले जाते, ती हिंदू धर्म अगोदरच सांगत होता, मात्र तेव्हा पाश्चात्य रीतीने वागणे म्हणजे आधुनिकता सांगत होते.
3. कोरोनाचा उद्भव कोणी केला, धर्माने तर निश्चित नाहीच, तुमच्या विज्ञानाच्या अतिरेकी वापराच्या विचारातून कोरोना तयार झाल्याचे आज स्पष्ट होत आहे.
4. कोरोनामुळे फक्त मंदिर बंद झाले का, तर नाही !
बंद तर.. विमाने, मॉल, शाळा, सरकारी कार्यालय आदि विज्ञानाने शोध लावलेलेही सर्व बंद आहे, मग त्याचा दोष कोणाला - देवाला ?
4. तशीही मंदिरे सुद्धा देवाने नव्हे, तर सरकारने बंद ठेवण्यास सांगितली आहेत. कुठेही लोकांनी घाबरून मंदिरात जाणे बंद केले होते का ? तर नाही !
~~~~~~
याला उत्तर

*आस्तिकांना चपराक देणारे कोरोनाचे वास्तव*
१) 'जिथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होते' असे गर्वाने म्हणणारे अध्यात्म आता लपून बसले आहे.  विज्ञानाकडे कोरोनावरील उपाय नाही. आता विज्ञान थांबले आहे. पण अध्यात्म अजून काही सुरू झालेले नाही. जगभर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना आमचे अध्यात्म मात्र व्हाट्सअप वर मेसेज पाठवण्यापलीकडे काहीही करत नाही. आता तरी मान्य करा की देव तुमच्या कोणत्याही संकटामध्ये धावून येत नाही. धावून येतात ती फक्त माणसे आणि माणसांनी शोध लावलेले विज्ञानच. आता म्हणतील, तुमच्या विज्ञानाकडे तरी आहे का हो कोरोनावर उपाय? पण पुन्हा एकदा सांगतो, *"माझ्याकडे सगळ्या समस्यांवर उपाय आहे" असा विज्ञानाने कधीच दावा केला नव्हता. विज्ञान फक्त इतकेच म्हणते की आज मला इथपर्यंत माहिती आहे. यापलीकडे मला माहिती नाही. शोधण्याचा मी प्रयत्न करेन आणि ती माहिती शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीच वापरेन."*  पण अध्यात्मवादी मात्र आमच्याकडे सगळ्या समस्यांवर उत्तरे आहेत असे छातीठोकपणे सांगत होते आणि अजूनही सांगत आहेत.
 २) अध्यात्मवाद्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्याकडचे चांगले असेल ते आमच्याकडे आधीच होते असे म्हणणे. जसे, ते म्हणतात की आमच्याकडे विमानाचा शोध आधीच लागला होता. तसे ते आता सांगत आहेत की आमचा धर्म आधीच सांगत होता की आंघोळ करा, स्वच्छ राहा, लांबून नमस्कार करा, हस्तांदोलन करू नका, वगैरे. अरे भावांनो, लांबून नमस्कार करण्याची पद्धत केवळ हिंदू धर्मातच नाही, तर इतर धर्मात सुद्धा आहे. जैन, बौद्ध, शीख लोक सुद्धा नमस्कार करतात . प्रत्येक समाजात काही सामुहिक शहाणपणाच्या गोष्टी असतात आणि काही सामुहिक मूर्खपणाच्या गोष्टी सुद्धा असतात.  आंघोळ करणे, स्वच्छता पाळणे, अभिवादन करणे या गोष्टी सामूहिक शहाणपणाच्या गोष्टी आहेत. त्या धर्माचा भाग नंतर झाल्या. म्हणूनच या गोष्टी केवळ हिंदू धर्मातच सापडत नाहीत तर इतर धर्मात सुद्धा सापडतात. पण अध्यात्मवादी मात्र हे सगळे आमचेच आहे अशी टिमकी वाजवत आहेत.
 ३) कोरोनाचा उद्भव अविवेकाने केला.
 ४) कोरोना मुळे मंदिरे बंद करण्याची वेळ यावी ही किती मोठी नामुष्की आहे! जो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान त्याच्यावर अशी कोंडून घेण्याची वेळ यावी, यासारखा अपमान तो कोणता? अरे शक्तिमान आहेस तर कर ना नायनाट कोरोनाचा. पण तुझ्याने ते होणार नाही हे आम्हाला निश्चित माहित आहे. तुझे भक्त मात्र विमाने, मॉल, शाळा, बँका यांची उदाहरणे देत बसणार हे आम्हाला माहित आहे.
 ५) आमचा धर्म आजार होऊ नये याचे शिक्षण देतो अशी टिमकी वाजवणारे इतिहास विसरतात. कॉलरा, प्लेग, पटकी, नारू या रोगांनी आपल्या धर्मातील लोकांना भुईसपाट केले होते. आठवते का? अहो भाऊ धर्माला धर्मच राहूद्या. त्याला शक्तिमान बनवू नका.
 ६) शाळा, दवाखाने यांची गरज आहे. पण मंदिरे पण हवीतच हा अट्टाहास कशासाठी? पोटा-पाण्याची सोय व्हावी यासाठीच ना? मंदिरांची संख्या खूप आहे. आता थांबा कुठेतरी. शाळा दवाखाने खूप कमी आहेत. ते वाढवायचे बघा.


दुसरे एक उत्तर

*नास्तिकांना_चपराक ❓❓❓*
*अश्या प्रकारे दिशाभूल करणारा मेसेज फिरत आहे.*

या साठी काही मुद्दे मांडले आहेत त्यांची उत्तरे खालील प्रमाणे...

⭕ मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे, तर काही नाही.

*✅उत्तर: आज तरी मेडिकल सायन्सकडे कोरोनावर उपाय नाहीत, पण भविष्यात मात्र त्याच्यावरील उपाय फक्त आणि फक्त आधुनिक विज्ञानच शोधू शकते. होम हवन करून कोणताच शोध लागला नाही.*

⭕ आज जी काही काळजी घेण्यास सांगितले जाते, ती हिंदू धर्म अगोदरच सांगत होता, मात्र तेव्हा पाश्चात्य रीतीने वागणे म्हणजे आधुनिकता सांगत होते.

*✅उत्तर: स्वच्छतेच्या सवयी हा शिस्त आणि नितीशास्त्राचा भाग आहे. त्याचा धर्माशी काय संबंध? उठसुठ प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडून आपण काय साध्य करू इच्छित आहात? फारतर त्याने धार्मिक अस्मिता जागरूक होईल. जर स्वच्छतेचे धार्मिक अंगाने एवढे महत्व होते तर गेल्या शतकापर्यंत पटकी, प्लेग आणि नारूच्या साथीने गावेच्या गावे रिकामी का झाली? विज्ञान प्रगत नव्हते तेव्हा हजारो लोकं विविध आजारांनी, साथींनी मृत्युमुखी का पडली, तेव्हा धर्म का उपयोगी पडला नाही. कारण धर्म वेगळा आणि स्वच्छतेचे शास्त्र वेगळे, हे लक्षात घ्या.*

⭕ कोरोनाचा उद्भव कोणी केला, धर्माने तर निश्चित नाहीच, तुमच्या विज्ञानाच्या अतिरेकी वापराच्या विचारातून कोरोना तयार झाल्याचे आज स्पष्ट होत आहे.

*✅उत्तर: कोरोना हा विज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे झाला या विधानाला कोणताही सबळ पुरावा नाही, सोशल मिडीया वर पसरणाऱ्या अफवांमुळे हा समज पसरला आहे.*

⭕ कोरोनामुळे फक्त मंदिर बंद झाले का, तर नाही ! विज्ञानाने शोध लावलेलेही सर्व बंद आहे, मग त्याचा दोष कोणाला - देवाला ?

*✅उत्तर: कोरोना वर उपाययोजना म्हणून लोकं एकत्र भेटल्याने या विषाणू पसरू शकतो हे सिद्ध झाल्याने विज्ञानाने एकत्र येण्यावर निर्बंध लादले  आणि कोरोनाच्या भीतीने भक्त लोकांनी सुद्धा मंदिरात जाणे टाळले, तेंव्हा आमचा धर्म, आमचे मंदिर सामर्थ्यवान आहे, कोरोना आमचे काही वाकडे करू शकत नाही असे का कुणी बोलले नाही !  त्यामुळे कुठलीही दैवीशक्ती कुठलाही शोध लावू शकत नाही हे सत्य आहे.*

⭕ आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी शिकवलेली जीवन शैली सोडून निसर्गावर अधिराज्य करण्याच्या नादात आता स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नःचिन्ह निर्माण झाले आहे.

*✅उत्तर: नमस्ते करणे हि फक्त हिंदूंची संस्कृती नव्हे तर बौद्ध, जैन, शीख सुद्धा नमस्कार करतात, हिंदू घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुवत असत असे सांगितले जाते पण नुसते हातपाय धुवून नव्हे तर साबण लावून धुतल्यावरच रोगाला अटकाव होऊ शकतो हे विज्ञानाने सांगितले.*

*त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी विज्ञानाचे सर्व फायदे घ्यायचे मात्र सर्व क्रेडिट मात्र धर्माला द्यायचे हा दुटप्पीपणा धर्मान्धानी सोडावा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा...*

*चला उत्तर देऊया - टीम*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?