पुराणातील वांगी: ककनमठ मंदिर
⛔ * गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणारे ककनमठ मंदिर! * — कौस्तुभ शेजवलकर (14 jun 2021) "गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या मंदिराची गोष्ट" ह्या ककनमठ मंदिरासंबंधीच्या संदेशात त्याचे लेखक, विनीत वर्तक, हे अनाहूतपणे किंवा सहेतुकपणे उपायोजित विज्ञान (applied science) आणि मूलभूत विज्ञान (pure science) यांत गल्लत करत आहेत. आधार घेऊन, अडखळत चालणारं लहान मूल, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल ह्या गोष्टी शिकल्यावर मग आधाराशिवाय चालायला लागत नाही तर ते आधी आधाराशिवाय चालायला लागतं आणि नंतर कधीतरी ह्या गोष्टी, न्युटनचे गुरूत्वाकर्षणाचे नियम वगैरे शिकतं. एवढंच कशाला, रस्त्यावर उंच ताणलेल्या दोरावर कसरतीचे खेळ करणारे कित्येक डोंबारी तर बहुधा जन्मात कधीही न्यूटन, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल यातल्या कशाशीही पाला न पडतादेखील न पडता आयुष्यभर कसरत करतात. त्यामुळे ककनमठ मंदिर हे आजही न पडता उभं आहे म्हणजे ते बांधणाऱ्या स्थापत्यकारांना गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि त्यांचं विज्ञान माहित होतं हा दावा, मूल आधाराशिवाय चालतंय, किंवा डोंबारी न पडता कसरती करतोय म्हणजे त्यांनाही गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि विज...