तांब्या पितळेच्या भांड्यांनी पाणी स्वच्छ होते?

तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?
ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.
२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.
हा मुद्दा होता, जर गावातील पाणी अश्या प्रकारे दुषीत अ सेल तर ही जनता हेच पाणी वापरून तग तरी कशी धरून आहे? जर ह्या पाण्या बद्दल जनतेला माहीती असती तर जनेतेने ते पाणी शुद्ध करण्यासाठी एका तरी treatment चा पर्याय निवडला असता. ह्या पर्यायत पाणी उकळवणे, पाणी शूद्धी करणासाथी ULTRA Violet
उपकरणाचां वापर करणे. पण ही ठरली जनता ज्यांची एका वेळेची जेवायची मारामार तेथे पाणी शूद्धीकरण
म्हणजे डोक्यावरून पाणी. ज्यांच्या घरात झीरो चा दिवा लावयला विज नाही तिथे ULTRA Violet उपकरण?
पण आमची ही सर्व्व जनता ह्या विशाणु जिवाणु ना पुरुन उरली. कशी? हा प्रश्न ह्या टीम ला पडला होता.
ह्या नंतर NATURE च्या झालेल्या संशोधन चा विषय बदलला हे तुमच्या लक्षात आले असेलच.
त्या NATURE च्या टीमने पितळेची भांडीच उचलली, पाण्या ची SAMPLES घेतली. प्रयोगशाळेत नेउन
रीतसर प्रयोग केले गेले व
निश्कर्ष असा नि घाला कि पितळे च्या भांड्यांत दुषीत पाणी २४ तासात पिण्या एवढे
शुद्ध होते, कुठलीही उर्जा न वापरता !!. कारण.... पितळे तील तांब्याचे अणु. ह्याच अणु मुळे पाणी शूद्धीकरण
होते. http://www.nature.com/news/2005/050404/full/news050404-14.html ह्या लेखात स्पष्टपणे नमूद केले आहे कि हा शोध NATURE च्या टीमने लावला व त्याचा उपयोग भारता सारख्या देशाला घ्यावयास हवा. खरं कि नाही??
आता विषय दुसरा: जस्त (ZINC) चा शोध Andreas Maggraff 1746 ला लावला. पण भारतात् जस्त (ZINC) ची निर्मीती (शूद्धीकरण) BC 400 च्या पूर्वी पा सून होतय! ह्या ZINC शूद्धीकरणाची पद्धत फक्त भारतीयांनाच अवगत होती. ह्या ZINC च्या खाणी चे अवशेष राजस्थानात अजुन ही पाहायला मिळतात. जर ZINC चे शूद्धीकरण व व्यापरी उत्पादन भारतात BC 400 पासून होत होते तर Andreas Maggraff ला ह्या शोधाच Credit कसे दिले गेले?
Zinc & Copper चे मिष्रधातू बनवणे फार मुश्कील काम, ह्याचे कारण ह्या धातूंचा Melting Temp. Copper
वितळे पर्यंत Zinc वितळून उडुन जाई. भारतीयानी एक स्पेशल प्रोसेस तयार करून Brass ला जन्म दिला.
भारत पितळेची भांडी जवळ जवळ १५००-१७०० वर्षा पासून वापरतोय. भारतातू न ही भांडी परदेशात गेली.
पितळेच्या भांड्यांपुर्वी तांब्याची भांडी भारतात उपलब्ध होतीच. मग पितळेच्या मागे का ? कारण तांब्याची
किम्मत, ती ईतकी जास्त होती कि जर तांब्या चे गुणधर्म सारखे ठेउन सर्वसाधारण जनतेला, पर्यायी धातूंची भांडी द्यावी हा च विचार ह्या मागे असला पाहीजे. त्या मुळेच देव पुजे साठी तांब्याची पण सर्व साधारण कामा साठी पितळेची हा पर्याय निघाला असावा !!!!
आता आपली जनता ही भांडी कशी वापरते ? पहेले पाण्याला जाऊन घागर पाण्या ने स्वच्छ धुते. हाती
राखुन्डी लागली तर ठीकच नाही तर माती, नारळाची किशी सुद्धा चालते. घागर मस्त चकचकीत झाली पाहीजे.
हे सर्व्वे आपली जनता परंपरेने करत आलीय. पण ह्याच भां ड्याच्या चकचकीत पणा मुळेच पाणी शूद्धीकरण
क्रिया सुरळीत होत होती.
ठोक्याचे भांडे !! तांब्या - पितळेची भांड्यांना आपण का ठोके लाउन घेत होतो ? उत्तर परत एकदा तेच, भांड्याचा चकचकीत पणा !
आताची परीस्थीती : ही तांब्या - पितळेची भां डी गेलीत अडगळीच्या खोल्यात. काही भंगारात काढली गेलीत.
त्या भांड्याची जागा आता फक्त वरुन चकचकीत दिसणार्या प्लास्टीकच्या भांड्यानी घेतलीय.
वरून चकचकीत दिसणारी प्लास्टीकची भांडी पाणी साठवुन ठेवण्या पलिकडे जाऊ शकतील ?
स्त्रोतः बरेच वर्षा पासुन मनात हा विषय घोळत होता. ह्या वि षया ची व्याप्ती फार मोठी आहे व सर्व जनतेची
ह्या विषया बद्दल जा गरुक ता करणे गरजे च आहे.
माहिती जाला वरुन,
http://www.inae.org/metallurgy/archives_pdf/smelt%20zinc.pdf

*तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो?*
*या पोस्टला उत्तर*

जगातील प्रत्येक संस्कृतींमध्ये मानवी जीवनाचा विकास होत असताना मानवी गरजेनुसार काही नवनवीन बाबी शोधल्या जातात. परंतु आमचंच कसं ‘लय वैज्ञानिक’ हे कसेही करून सांगायचे एक फॅड रूढ झाले आहे. असे करताना काही बाबी खर्‍या असल्या तरी त्यांना एवढा तिखट-मीठ-मसाला लावला जातो, खोट्या गोष्टी जोडल्या जातात, कि त्या बाबीची चवच निघून जाते. त्या खोट्याच वाटतात.  त्याचेच उदाहरण म्हणजे  पितळेच्या भांड्यांच्या बाबतीतली ही पोस्ट. त्या पोस्टचे विश्लेषण करू या:
१) आपण पितळेची भांडी का वापरतो हे पटवून देण्यासाठी ‘सर्वसाधारणपणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात.’ अशी सुरुवात लेखकांनी केली आहे. परंतु तांब्याची भांडी वापरण्याची एक फॅशन गेल्या काही वर्षांपासून जोरात चालू आहे याचा विसर लेखकांस पडला आहे. ती महाग असतात असे लेखकास वाटते. पण पितळेची तरी कुठे अत्यंत स्वस्त असतात?
२) भारतात ‘Nature’ची टीम आली होती असे ८ एप्रिल २००५ च्या लेखाच्या (लेखिका:रोक्स्यान खमसी) लिंकचा संदर्भ देऊन सांगतात आणि या Nature च्या टीमनेच पितळेच्या भांड्यात दूषित पाणी २४ तासात पिण्याएवढे शुद्ध होते हा शोध लावला असे सांगतात. परंतु :
अ) भारतात आलेली ही टीम नेचरचीच होती असे काही म्हटलेले त्या लेखात दिसत नाही.
आ) लेखात लिहल्याप्रमाणे या टीमचा म्होरक्या रॉब रीड, इंग्लंड मधील नोरदंबरिया विश्वविद्यालयाचा प्राध्यापक, हा आशियात सूर्यकिरणांचा पाण्यावर होणारा अॅंटीबॅक्टीरियल परिणाम, यावर संशोधन करण्यासाठी आला होता. तेंव्हा त्याने पाहिले की भारतीय लोक विहीरीचे आणि अस्वच्छ, प्रदूषित पाणी  पितात. आणि तेंव्हा त्याने असे *“ऐकले”* की लोक पितळेच्या भांड्यात पाणी ठेवतात कारण त्यांना काही आजारांपासून संरक्षण मिळते. बघा हं, “ऐकले”. 
इ) मग त्याने “ब्रिटन” मध्ये जाऊन त्याचे सहकारी पूजा टंडण आणि संजय छिब्बर यांच्या सोबत एक प्रयोग केला. एक पितळेचे भांडे व एक मातीचे भांडे यांत पाणी घेऊन त्यात सौम्य प्रमाणात Escherichia coli bacteria (ज्यामुळे हगवण लागते) मिसळले. त्या पाण्याचे नमुने ६, २४ आणि ४८ तासांनंतर काढून त्यात किती बॅक्टीरिया आहेत याची मोजणी केली. तेंव्हा पितळी भांड्यातील बॅक्टीरिया प्रत्येक मोजणीच्या वेळेस कमी होत गेले आणि शेवटच्या मोजणीच्या वेळेस त्यांचे प्रमाण नगण्य होते असा निष्कर्ष काढला आहे.
ई) त्यांनी भारतात सामान्य प्रदूषित पाणी घेऊन चाचणी केली असा उल्लेख आहे, पण त्याचे निष्कर्ष मात्र दिलेले नाहीत.
उ) यावरून असे म्हणता येईल की पितळी भांड्यात  Escherichia coli bacteria ४८ तासांनंतर जीवंत राहू शकत नाहीत. हे मान्य करूया.     
३) आता, वरील Escherichia coli bacteria वरील प्रयोगावरून सर्वच प्रकारचे बॅक्टीरिया मरतात असा निष्कर्ष काढता येईल का? पाण्यातील अन्य घातक बॅक्टीरियांचे काय? यावर चाचण्या झाल्याशिवाय पितळेच्या भांडयाविषयी सरसकट विधान करणे चुकीचे आहे. 
४) आता यात आपण अगदी आनंदातिरेकाने हुरळून जाण्यासारखे काय आहे?
५) ‘पण आमची ही सर्व्व जनता ह्या विशाणु जिवाणु ना पुरुन उरली” असे लेखक म्हणतात (पितळेची भांडी वापरुन). परंतु एवढ्या आरोग्यसंपन्न, पुरून उरणार्‍या  लोकांचे १८०० ते १९३० च्या कलावधीत सरासरी आयुष्य ३० वर्षांखाली का होते? (https://www.statista.com/statistics/1041383/life-expectancy-india-all-time/) 
६) या शोधानुसार ४८ तासांनंतर विशिष्ट बॅक्टीरिया मारतात. म्हणजे मधल्या वेळेत ते बॅक्टीरिया अस्तीत्वात असतातच की! त्याने हगवण लागणारच की!
७) दुसरे विशेष म्हणजे आपण नेहमी ताजे पानी वापरण्याचा आग्रह धरतो. रोज सकाळी, म्हणजे २४ तासात आपण घरातले पाणी बदलतो. मग पितळेच्या भांड्यात फक्त २४ तास पाणी ठेऊन काय उपयोग?
८) पितळेच्या भांड्यांना कल्हई करून वापरतात. मग वरील संशोधनात जो दावा (पितळेतील तांब्याचे अणू पाण्यात उतरतात!) केला आहे तो कसा शक्य आहे? पितळेचे अणू काय कल्हईचा थर फाडून बाहेर पडतात काय?
९) भारत हे अगदी हल्ली-पर्यन्त अत्यंत गरीब राष्ट्र होते. (आजही विश्व बँकेच्या आकडेवारीनुसार २७ कोटी गरीब लोक आपल्या देशात आहेत. म्हणजे दर ५ माणसांत एक गरीब आहे.) हे सर्व लोक पाण्यासाठी मातीचेच माठ  वापरतात. (कुंभार जात त्यासाठीच तर होती ना?) दारोदारी मोठमोठे रांजण असतात. कारण पितळी भांडी घेणे परवडत नाही.
१०) दुसरीकडे आपण माठांचे देखील गुणगान करतो आणि त्यातील पानी आरोग्यास खूप चांगले असे ही म्हणतो. हा दुटप्पीपणा का बरे? (https://www.timesnownews.com/health/article/health-benefits-of-drinking-water-from-clay-pots-or-matka-good-for-digestion-metabolism-and-other-functions/444928#:~:text=The%20human%20body%20is%20acidic,in%20keeping%20the%20body%20healthy.)
११) पितळ किंवा अन्य धातूंची भांडी वापरण्यामागे हेही कारण असू शकते की माठातून पाणी पाझरते आणि लांबून भरून आलेले पाणी असे पाझरून वाया जाऊ नये. कारण भारतात अनेक भागात पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. 
१२) पुढे जस्त धातुविषयी लेखक लिहतात. भारतात जस्ताचा शोध आधी लागलेला असल्यास जागतिक व्यासपीठावर हा प्रश्न देशाच्या संबंधित खात्यामार्फत पुराव्यासह घेऊन जायला पाहिजे आणि Andreas Maggraff यास या शोधाचे दिले जाणारे श्रेय काढून घेतले पाहिजे. हे प्रयत्न लेखकांनी जरूर करावेत. त्यांच्याकडे पुरावे असतीलच.

तात्पर्य, पितळ या मिश्रधातूचा शोध जरी भारतात लागलेला असला, त्या बद्दल अभिमान असला, तरी तो शोध लावण्यामागे, जंतु मरतात हे कारण असल्याचा ठोस पुरावा मिळत नाही. गाडगी-मडकी फुटतात, त्याला टिकाऊ पर्याय असावा हे कारण मुख्यतः असावे. आणि आता जे संशोधन झाले (ते ही अर्धवटच) त्यावरून त्याचा संबंध लगेच तिकडे जोडणे म्हणजे, ‘पुरातन काळात आमच्याकाडे पण प्लॅस्टिक सर्जरी होती.....’ असा प्रकार वाटतो.

उत्तम जोगदंड


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?