राम राम का म्हणावे ?


*राम राम का म्हणावे?* 

मराठी संस्कृती मध्ये *राम राम* 
बोलण्या मागे काय कारण असावे अस सर्वांनाच वाटत असेल.
पूर्वी पासून आपले वडील, काका, बाबा,मित्रपरिवार जेव्हा पण एकमेकासमोर आले की, 
*राम राम* ह्या पवित्र प्रेमाने शब्द् बोलन्या मागचे कारण काय असावे आणि महत्वाचे म्हणजे या शब्दाचा उच्चार दोन वेळाच का केला जातो,
कारण अस असावे की मराठी मुळाक्षरामध्ये *”र"* २७ वे अक्षर आहे.
*”आ”* हे २ रे अक्षर आहे आणि *”म"* हे २५ वे अक्षर आहे.
*२७+२+२५=५४* योगांचा शब्द तयार होतो म्हणजेच
एक वेळा *”राम"* म्हणल्याने ५४ योग् तयार होतात तर दोन वेळा *”राम"* म्हणल्याने *१०८* योग तयार होतात........

म्हणजेच आपण एक माळ
जाप केल्याचे पुण्य आपणास मिळते.
चला तर मग आपण पण ही परंपरा अशीच चालू ठेऊयात, आणि राम नामाचा जप चालू करुया. ॥जय श्री राम ॥🚩
~~~~~~~~~~~~~~~~~~~
” हिंदुंनी 'राम, राम' का म्हणावे❓
या हास्यास्पद पोस्टला *उत्तम जोगदंड* याचे उत्तर...

‘राम’ हे हिंदूंचे दैवत असले व अशा हिंदूंचा श्रद्धेचा अधिकार मान्य केला तरी, बादरायण संबंध या वाक्प्रचारास अगदी चपखलपणे लागू होईल अशा या तर्कहीन व  हास्यास्पद पोस्टचा समाचार घेणे आवश्यक ठरते. यासाठी पुढील मुद्दे विचारात घ्यावेत: 
१) मराठी मुळाक्षरांमध्ये ‘र’ हे अक्षर २७ वे आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे हे खरे असले तरी ‘आ’ हे दुसरे अक्षर असे जे म्हटले आहे ते पूर्णतः चूक आहे. कारण ‘आ’ हा स्वर आहे. दुसरे अक्षर ‘ख’ आहे. तरीही ‘आ’ ला दुसरे अक्षर मानायचे असल्यास, ‘र’ २७वे होणार नाही व इथेच या पोस्टचा १०८ योगांचा डोलारा ढासळेल. 
२) समजा लेखकास ‘आ’ हे दुसरे व्यंजन आहे असे म्हणायचे आहे असे आपण गृहीत धरूया. असे असेल तर, ‘मरा’ असे दोनदा म्हटल्यास १०८ योग तयार होतात.  तसेच १०८ हा आकडाच आणायचा असेल तर “फेकू” हा शब्द विचारात घेऊ या. फ हे अक्षर २२वे, ए हे अक्षर ७वे, क हे अक्षर १ले व ऊ हे अक्षर ६वे, म्हणजेच २२+७+१+६ = ३६. मग “फेकू” हा शब्द तीन वेळा उच्चारल्यावर ३६+३६+३६= १०८ योग नक्कीच तयार होईल. तसेच एका राष्ट्रीय आपत्तीची लोकांना जाणीव करून दिल्याचे समाधान सुद्धा होईल. 

थोडक्यात अशा आकडेशास्त्राच्या बावळट लटपटी करून रामाचे उदात्तीकरण होणे दूरच, उलट भक्तांचेच हसे होईल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?