पोस्ट्स

खडे टाकणारा देव

इंजिनिअर व मजूर आपल्या देशातील जवळपास 99 टक्के देवभक्तांचा व देवाला गुंड ठरवून त्याचा अपमान करणारी ही वरील पोस्ट तर्कदुष्ट सुद्धा आहे. कारण : 1) यात इंजिनियरला ‘देव’ व मजुराला देवाकडे लक्ष न देणारा ‘भक्त’ असे कल्पिले आहे. ही कल्पनाच मुळात तर्कदुष्ट व गैरलागू आहे. इथे इंजिनियरला मजुराकडून काही काम करून घेण्यासाठी त्याचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. खरे तर अशा ठिकाणी एक घंटा लावलेली असतांना (जिचा दोर किंवा बटन वरती असते व त्याची गरज नेहमी भासते) ती वाजवायचे सोडून नाणी व नंतर खडा फेकणारा इंजिनियररूपी ‘देव’ मूर्ख व बिनडोक वाटतो. त्याने आधीच खडा फेकायचा होता ना! इथे मजूर शहाणा वाटतो. कारण लक्ष वेधून घेण्यासाठी कोणी पैसे फेकत नाही हे ज्ञान त्याला आहे व म्हणून तो पैसे उचलतो व खडा पडल्यावर लक्ष देतो. 2) देवाला सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, दयाळू, ‘चोच दिली आहे तर चारा देणारा’, वगैरे मानले जाते. परंतु, आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी देव, माणसाच्या आयुष्यात संकटाचा खडा टाकतो असे पोस्ट मध्ये लिहलेले आहे. असे असेल तर, ‘माझ्याकडे लक्ष दे, नाहीतर घालतोच तुला संकटात!’ अशी प्रवृत्ती अस...

विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक

......... || जय हरी || .........   " विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक" *या पोस्टला उत्तर (कंसात)* 1. विज्ञान प्रयोगातून विकसित होते, अध्यात्म योगातून प्राप्त होते. (विज्ञान केवळ प्रयोगातूनच नाही तर निरीक्षणातून, चिकित्सेतून निर्माण होते, अध्यात्म काल्पनिकतेतून निर्माण होते.) 2. विज्ञानासाठी साधने वापरली जातात, अध्यात्मासाठी साधना वापरली जाते. (विज्ञानसाठी केवळ साधनेच नाही तर डोकेही वापरले जाते, अध्यात्मात डोके अजिबात वापरले जात नाही.) 3. विज्ञानामध्ये शोध आहे, अध्यात्मामध्ये बोध आहे. (विज्ञानात शोध आहे तसेच शोधाची चिरफाड ही आहे, अध्यात्मामध्ये बाळबोधपणा आहे.) 4. विज्ञानामध्ये तत्त्वपरिक्षा आहे, अध्यात्मामध्ये सत्त्वपरिक्षा आहे. (विज्ञानात केवळ तत्व परिक्षाच नाही तर समग्र चिकित्सा आहे, अध्यात्मामध्ये सत्व-परीक्षेचे व्यक्ति-सापेक्ष ढोंग आहे.) 5. विज्ञानामध्ये व्यासंग आहे, अध्यात्मामध्ये सत्संग आहे. (विज्ञानात व्यासंग आणि शोधाचा ध्यास आहे, अध्यात्मामध्ये सम-दांभिकांचा सत्संग नावाचा सहवास आहे.) 6. विज्ञानामध्ये कर्तृत्व आहे, अध्यात्मामध्ये दातृत्व आ...

एका रेषेतील मंदिरे

एक विचित्र मेसेज फिरतो आहे। मंदिराचे महत्व सांगताना काही मंदिरे एकाच longitude वर येतात त्याला आश्चर्य म्हटले आहे। तो परिच्छेद असा- "हिमालयातील केदारनाथ ते दक्षिणेतील रामेश्वरम, श्री कलाशक्ती कांचीपुरम, थीलाई नटराजन, चिदंबरम हि सगळी शंकरांची देवळे किंवा मंदिर एका सरळ रेषेत आहेत. एकदम विज्ञानाच्या भाषेत सांगायच झाल तर 79 Deg E 41 min. 54 sec. Longitude." । वास्तविकत: ही माहिती खोटी आहे। कोणी शोधत नाही त्यामुळे फेकू लोकांचे फावते। खरी माहिती अशी- केदारनाथ 30°44′N 79°04′E । रामेश्वरम 9.288°N 79.313°E । कलाशक्ती कांचीपुरम 13°44′58″N 79°41′54″E । नटराजन चिदंबरम 11°23′58″N 79°41′36″E । यावरून लक्षात येईल की ही मंदिरे एका रेषेत नाहीत। एक longitude म्हणजे सुमारे 111 किमी अंतर होते हेही लक्षात घ्यावे। । पण 2-4 हजार किमी ची सरळ रेषा काढली तर 2-4 तरी सारख्या गोष्टी सापडतील। स्मशान पण सापडतील, स्वच्छता गृहे पण, दवाखाने पण। मग त्याचे पण असले कुचट अर्थ लावत बसणार काय? । बदमाश फेकू लोकांपासून अज्ञानी लोकांना वाचवले पाहिजे।

जगन्नाथ पुरीच्या कथित रहस्यांमागचे अज्ञान

जगन्नाथ पुरी येथील चमत्कारांबाबत उत्तर देत आहे.  जगन्नाथ पुरीच्या कथित रहस्यांमागचे अज्ञान  जगन्नाथ पुरी येथील तथाकथित ‘न उलगडणार्‍या रहस्यांची’ पोस्ट सध्या फिरत आहे, त्यास हे उत्तर:   पुरी येथील हे मंदिर जुन्या काळातील अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमूना आहे याबादधल शंकाच नाही. परंतु अशा या भव्य वास्तूला बिनबुडाच्या ‘चमत्कारांची’ जोड देऊन त्या काळातील मानवांनी केलेल्या अफाट कर्तृत्वाला खुजे करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो मात्र योग्य वाटत नाही.     या पोस्ट मधील भगवान श्रीकृष्णाच्या न जळालेल्या हृदयाच्या लगद्याची कहाणी ऐकून सहज उत्सुकता म्हणून नेटवरील विविध साइट्सचा धांडोळा घेतला. त्यांची लिंक देत आहे. त्यावरून पुढील निष्कर्ष निघतात:  1) जगन्नाथ पुरीचे प्रसिद्ध मंदिर हे खरे तर विष्णुचे आहे व त्यातील मुख्य मूर्ति विष्णूची आहे.  भगवान श्रीकृष्णाच्या न जळालेल्या हृदयाच्या लगद्याची कहाणी काही कुठे सापडली नाही.  इंद्रद्युम्न विषयी वाचायला मिळालेली कथा पूर्णतः वेगळी आहे.  2) जगन्नाथाची मूर्ति दर 12 वर्षांनी नाही तर...

'दशक्रिया' चित्रपटाच्या निमित्ताने

'दशक्रिया' चित्रपटाच्या निमित्ताने  त्या विधी आणि कर्मकांडांना छद्म वैज्ञानिक संदर्भ देऊन खऱ्याखोट्याची सरमिसळ करून लोकांना भ्रमित करणाऱ्या पोस्टचे केलेले हे मुद्देसूद खंडन -- जेट जगदीश. (^j^) >>> मृत्यू हा माणसाला नेहमी भयप्रद आणि मयताच्या नातेवाईकांना दुःखदायक आणि सैरभैर करणारा असतो. अश्या शोकाकुल लोकांकडून मृतदेहाची नीट विल्हेवाट लावली जाणे शक्य नसते. त्यासाठी एक तरी माणूस असा लागतो जो तुमच्या भावभावनांशी निगडित नाहीये, ज्याने मृत्यू आणि त्या भोवतालचा कल्लोळ अनेक वेळा बघितला आहे म्हणूनच तो त्रयस्थपणे हे काम करू शकतो. तो एक माणूस म्हणजे क्रिया कर्म आणि दशक्रिया विधी करून घेणारा ब्राह्मण. *खंडन : भावनांवर काबू ठेवून मृत्यू जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे समजून घेतले तर जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख जरी झाले तरी वास्तवाचा स्वीकार केल्याने दुःख हलके होते. मग यांत्रिक पद्धतीने विधी करणाऱ्या रोबो ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही हे कळते. आणि कुठलेही विधी न करता प्रेताला अग्नीच्या स्वाधीन करून त्याची योग्य विल्हेवाट लावता येते.* >>> अग्निसंस्कार करताना केलेल्या प्रत...

स्त्रियांच्या दागिन्यांचे छडमविज्ञान

*”आपली संस्कृती"* *"विपर्यास आणि सत्य”* *❌असत्य:* बसू नये देहाला थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का म्हणुन मैत्रिणींनो मंगळसूत्र व बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का *✔सत्य:* *मग पुरुषांना बसू नये थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का,* *म्हणून त्यांना मंगळसूत्र, बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का.* *❌असत्य:* मणक्याच्या आजारापासून रहायचे असेल जर लांब, तर मग घाला ना कंबरपट्टा, वाचवायला तुमच्या पाठिचा खांब !! *✔सत्य:* *कंबरपट्यांमुळे नाही वाचत तुमच्या पाठीचा खांब,* *डॉक्टरने दिलेले पट्टा वापर, आजार होईल बरा, सांगतोय ठाम.* *❌असत्य:* सायनस हा आजार आहे नाकाच्या हाडाचा म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा *✔सत्य:* *सौंदर्य म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा,* *दुरान्वयेनी ही संबंध नाही सायनस आजाराचा.* *❌असत्य:* कोकीळा गातांना लागते वसंत ऋतूची चाहूल, उष्णतेचा दाह कमी करते पैजण घातलेले पाऊल. *✔सत्य:* *पैंजणामुळे उष्णतेचा दाह होतो कमी, अशी देवू नका हूल,* *थंडीत पैंजणाचे काय करणार, अशी करू नका भूल.* *❌असत्य:* बांगड्या घातल्याने वाढते हाताच्या...

कुंकवाच्या अफवा

कुंकवाच्या अफवा... (^m^) (^j^) (मनोगते) 'महिलांनी कुंकू का लावावे ?' या फेसबुक आणि व्हॉटस्अँपवर धर्मअंध हिंदुत्ववाद्यांकडून पसरवण्यात येत असलेल्या पोस्ट्स बद्दल... सर्व प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की त्यांनी ही फेक स्टोरी बनवली आहे. कारण चारही वेदांमधे व उपनिषदात कुठेही स्त्रियांनी कुंकू लावावे असा उल्लेख सापडत नाही. त्यांच्या अनेक शतकानंतर लिहिले गेलेल्या रामायण या ग्रंथात देखील दशरथ गेल्यानंतर त्यांच्या 3 ही पत्नीनी कुंकू पुसले असे लिहिल्याचा कुठेही उल्लेख रामयणाच्या जुन्यातल्या जुन्या प्रतीत आढळत नाही. तसेच त्यावेळच्या उत्तर भारतातील आर्य संस्कृतीत कुठेही कुंकू अस्तित्वात नव्हते. हिंदू धर्मात कर्मकांड वाढीला लागल्यानंतर स्त्रियांना दुय्यम स्थानावर टाकण्यासाठी त्याकाळच्या पुरोहितांकडून कुंकू या सौभाग्य लेण्यांवर भर देण्यात आला. त्यासाठी छद्म विज्ञानाचा आधार घेऊन पिट्यूटरी ग्लैंड, एक्यूप्रेशर ही माहिती देखील भारतीयांना होती असे भासवण्यात आले. पण असा उल्लेख आयुर्वेदशी सम्बंधित चरक, सुश्रुत वग़ैरे कुठल्या ही ग्रंथात नाहिये. एक्यूप्रेशर ही चीनी वैद्यकीय विद्या आहे जी त्याका...