स्वप्नातील सांता

आज भल्या पहाटे,गाढ स्वप्नाळू झोपेत होतो.....

लांबून एक मनुष्यवजा आकृती माझ्याकडे येताना पुसटशी दिसु लागली....

लाल रंगाचा ठिपका आकार घेत घेत मोठा झाला.......
तो सांताक्लॉज होता...

मला म्हणाला, "वेक अप माय डिअर चाईल्ड, आय ह्याव ब्रॉट मेनी गिफ्ट्स अँड केक्स, आइस्क्रीम्स, चॉकलेट्स फॉर यु"...

मी :(मराठीत) मला भेटवस्तु आणि खाऊ का देतोयस? आपली काय ओळख?

सांता:   (थोडा विचार करुन इंग्रजीत)...'जीसस लव्हस् यु माय चाईल्ड, ही सेंट मी हिअर फॉर यु'... 'हि केअर्स यु',.. हि इज व्हेरी काइन्ड'

मी: "बरं बरं असेल ब्वा तो जीसस मामा दयाळु"... "मग मला आवडेल ती खेळणी देशील?"...

सांता: (मी भुललोय हे बघून आनंदाने मराठीत)..हो हो का नाही? सांग तुला कुठली खेळणी हवी आहे....

मी: मला ना आमच्या शाखेत असतो ना तसा छानसा मजबूत 'दंड' (काठी) दे, ज्याने मी दंडप्रहार करत असतो आणि शाखेतील खेळ खेळत असतो...

सांता:(कपाळावर आठ्या आणून)...."बाळा, माझ्याकडे दंड नाहीये," तु दुसरे काही माग, मी देईल"..

मी: बरं खेळणी जाऊदे, मला पुस्तक वाचायला खुप आवडतं, मला माझ्या आवडीची पुस्तकं देशील?"

सांता: (गालात हसत) "हो देईल ना," "कुठलं देऊ"?

मी: मला भगवद्गीता दे....

सांता: (रागात) " माझ्याकडे बायबल आहे, मी सगळ्यांना तेच देत असतो"..." तू पण तेच वाच', त्यातच तुझा फायदा आहे'..

मी: "मरू दे, खेळणी नको आणि पुस्तकही नको,"
"मला रंगीबेरंगी चित्रं काढायला आवडतं," "मला रंग दे"...

सांता: (त्रासलेल्या आवाजात) "सांग, कोणता देऊ"?

मी: "भगवा"....

आता मात्र, सांता जाम भडकला, म्हणाला
"तू  अशाच वस्तु का मागत आहेस ज्या मी देत नसतो"..... "जाऊ दे वस्तु बिस्तु... तुला खायला काय देऊ ते बोल"

मी: 'तिळगुळ दे", "आम्ही वडीलधारी व्यक्तींकडून तिळगुळ घेऊन त्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशीर्वाद घेत असतो"...." तू दे मला तिळगुळ"....

आता सांता उसळून म्हणाला " अरे दुष्ट कारट्या, तुला शिक्षाच केली पाहिजे, माझी नालस्ति करतोस काय"? "जीसस तुला नरकात टाकेल, तिथे तुला उकळत्या तेलात तुला तळतील, मग कळेल तुला"....

मी: (शांतपणे) " अरे पण थोडावेळापूर्वीच तर तू म्हणाला होतास ना कि जीसस खूप दयाळु आहे, तो माझी काळजी घेतो ".... आणि आता तर तू म्हणतोस कि जीसस मला क्रुर शिक्षा करेल"..असे कसे?"

सांता: (रागाने चेहरा लालबुंद करून) "जीसस फक्त त्याला शरण येणाऱ्या आणि तो सांगेल तसेच वागणाऱ्यांवर दया दाखवतो नाहीतर बाकीच्यांना क्रूर शिक्षा देतो"....

मी: " अरे नकोय मला तुझी खेळणी,नकोय मला तुझे पुस्तक, नकोय मला तुझा खाऊ...."

"सर्वे भवन्तु सुखिन: ची प्रार्थना करणारी माझी सनातन वैदिक संस्कृती आणि 'हे विश्वचि माझे घर' म्हणणारी आमची संतपरंपरा मला अंतर्बाह्य तेजस्वी आणि वैभवसंपन्न बनवण्यास सक्षम आहे,

"सांता मला किंचितसुद्धा गरज नाहीये तुझ्या भेटवस्तुंची
मला आशिर्वचन देण्यासाठी माझी मातृतुल्य 'संतांची मांदियाळी' आहे माझेकडे...."

हे ऐकताच सांता आपली हरणे जोडलेली बर्फाची गाडी उलटी फिरवून आल्या पावली परत गेला..

आणि मी झोपेतून डोळे उघडले,
असेच सर्वांचे डोळे उघडावे हिच ईच्छा......!

-संकेत कुलकर्णी

(कृपया, लेख शेअर केल्यास अधिक लोकांपर्यंत तो पोहोचेल)
~~~~~~~|~|
याला उत्तर

*सांता लोकांना भेटवस्तू वाटण्यासाठी निघाला होता...*

लांबून एक आकृती त्याचाकडे येताना दिसली...

तो भगवा रंगाचा ठिपका आकार घेत घेत मोठा झाला...

तो भगवा कट्टरवादी होता
सांताला म्हणाला काय रे लाल्या तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची ?

*सांता: अरे मी गिफ्ट द्यायला आलो आहे. तुला काय हवे...*

कट्टर: मला “दंड” हवा आहे, ज्यांनी मी इतर धर्मीयांमध्ये दहशत बसवू शकेल.

*सांता: असा दंड माझ्याकडे नाही, तू दुसरे काही माग...*

कट्टर: मग मला माझ्या आवडीचे आणि माझा फायदा होईल असे पुस्तक दे.

*सांता: मग मी तुला संविधान देतो. त्यामुळे तुझा काय सर्वांचा फायदा होईल*

कट्टर: नको आहे मला तुमचे संविधान, आम्ही फक्त मनुस्मृती मानतो. मला रंग देशील

*सांता: कोणता रंग*

कट्टर: कोणताही दे पण हिरवा देवू नको. आम्ही हिरव्यांचा द्वेष करतो.

*सांता: हिरव्या भाज्या तरी खोतोस का नाही ? भारताची प्रतिज्ञा म्हणताना “सारे भारतीय माझे बांधव आहे” म्हणतोस ना मग इतर धर्मांचा आदर करायला शिक. सच्चा भारतीय होऊन दाखव.*

*अरे तुला इतर कसली नाही तर विवेकी संस्काराच्या गिफ्ट ची गरज आहे. त्या साठी माझी गरज नाही, त्या साठी तू डोळ्यावर चढवलेली भगवी झापडे काढ. सत्याचा शोध घे, तुला तुझा सांता भेटेल.*

*हे ऐकताच कट्टरवादी डोके खाजवीत आल्या पावली परत गेला...*

*आणि मी झोपेतून डोळे उघडले असेच सर्वांचे डोळे उघडावे हीच इच्छा...*

अनिल करवीर
*चला उत्तर देवूया” टीम*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?